पाव वाटी मूगाची डाळ (छिलकेवाली), पाव वाटी (मून्ग धुली ) डाळ, पाव वाटी मसुर डाळ, तुरीची डाळ पाव वाटी पेक्षा थोडी कमी, हरबरा डाळ पाव वाटी, मां की दाल ( काळ्या उडदाची डाळ)पाव वाटी, असतिल तर थोडे आख्खे मसुर
एक कांदा उभा चिरुन, बारिक चिरलेले आले १-२ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जीररेपुड, १ चमचा हळ्द, दोन हिरव्या मिरच्या, मेथ्या, (एक बडी विलायची, दालचीनी, मीरे भरडुन), मीठ चवीप्रमाणे
जीरे, साजुक तुप, ८-१० लसणच्या पाकळ्या चिरुन
सगळ्या डाळी धुवुन कुकरमध्ये शिजायला ठेवाव्या. सगळ्या मिळुन अंदाजे दीड वाटी डाळी असतिल, त्यात ५-साडेपाच वाट्या पाणी घालावे. शिजतानाच कांदा, आले, हळ्द व बाकीचा मसाला टाकावा. माझ्या कुकरमध्ये ५ शिट्ट्यात ही डाळ शिजते.नंतर फोडणीच्या कढईमध्ये तुप घेवुन त्यात जीरे व लसुण घालुन फोडणी करावी व ती कुकरमधल्या डाळीत घालावी. एक शीट्टी झाल्यावर डाळ तयार....
दाताखाली येणारे आले व लसणाचे तुकडे ह्याची चव वाढवतात. पंजाबात थंडीमध्ये हि डाळ नेहेमी केली जाते. त्यामुळेच ह्यात आले व लसुण मुबलक प्रमाणात घालतात...
अल्पना,
अल्पना, छान वाटतेय रेसिपी.
मून्ग धुली डाळ म्हणजे काय?
म्हणजे
म्हणजे साधी मूगाची डाळ बिना सालीची.... ह्यात आम्ही सालीची आणि बिना सालीची अश्या दोन्ही डाळी घालतो.. कधी कधी तर थोडे अख्खे मूग, राजमा (थोडावेळ) भिजवुन, शाबुत मा ( आख्खे काळे उडिद) घालुन थोडे अजुन वेगळा प्रकार करतो.. पण मग शिजायला जास्त वेळ लागतो..
आणि हो, ह्यात कान्द्याबरोबरच टोमॅटो पण घालता येतो, पण मला बिना टोमॅटोची चव जास्त आवडते...
ओके...वाटलं
ओके...वाटलंच मला बिनासालाची असावी पण म्हटलं कन्फर्म करु. थॅक्स ग
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
आहा, मस्तच! वाफाळत्या तुप
आहा, मस्तच! वाफाळत्या तुप भाताबरोबर ही मिक्स दाल म्हणजे सुख असेल
मस्त पाकृ.करुन पाहेन.
मस्त पाकृ.करुन पाहेन.
छायाचित्र द्यावेत. पाकृ
छायाचित्र द्यावेत. पाकृ आवडली.
अल्पना, मी बिग बझार ची मिक्स
अल्पना, मी बिग बझार ची मिक्स डाळ वापरते..त्यात अख्खे मसूर सोडून बाकी सगळं असतं.. मी तर काहिपण ढकलते ह्या डाळीत..आमसुल काय.अन चिंच, टोमॅटो काय..
अल्पना, छान आहे रेसेपी. चव छन
अल्पना, छान आहे रेसेपी. चव छन छान जमली. डाळ जरा जास्तच शिजली बहुधा. डाळी अख्ख्या दिसायला पाहिजेत ना?
सगळ्या डाळी अख्ख्या दिसणार
सगळ्या डाळी अख्ख्या दिसणार नाहीत. मुग लवकर शिजते, त्यामूळे ती गाळच होते. हरबर्याची डाळ, अख्खे मसूर किंवा अख्खी कडधान्य दिसतात मध्ये मध्ये.
डाळ शिजल्यावर फोडणी घालून परत
डाळ शिजल्यावर फोडणी घालून परत एक शिट्टी काढायची का?
हो. वरून फोडणी घालून नंतर परत
हो.
वरून फोडणी घालून नंतर परत शिट्टी काढण्याऐवजी जरा जास्तवेळ दाल उकळली तरी चालेल.