गवारीच्या पुर्‍या

Submitted by pltambe@yahoo.co.in on 11 April, 2014 - 20:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवारीच्या पुर्‍या

साहित्य : तीन वाट्या गव्हाची कणीक , २५० ग्राम गवार ,एक मोठा चमचा आले- लसणाची पेस्ट ,चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे , मीठ , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , दोन चमचे भाजलेले तीळ , तळणीसाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती : आगोदर गवार निवडून व धुवून घ्यावी , नंतर गवार प्रेशर कुकर मध्ये २ -३ शिट्या देऊन शिजवुन घ्यावी .
मिक्सर मध्ये शिजवलेली गवार, आले-लसणाची पेस्ट , मिरचांचे तुकडे , कोथिंबीर घालून वाटुन घ्यावी , तयार मिश्रणात तीळ आणि चवीनुसार मीठ घालून , त्यात मावेल तेव्हढी कणीक घालुन घट्ट मळुन घ्यावी , नंतर त्याच्या पु-या लाटुन तळाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
५-६ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

गरमा-गरम पुर्‍या कुठल्याही चटणी बरोबर खायला द्याव्यात.

माहितीचा स्रोत: 
बहिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त नवीन रेस्पी......आवडली.....