केळ्याचे रायते (कोशिंबीर)

Submitted by pltambe@yahoo.co.in on 9 April, 2014 - 20:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य: दोन मध्यम जरा जास्त पिकलेली केळी, एक वाटी घुसळलेले दही, चवीनुसार हिरव्या मिरच्यांचा ठेचा,चवीनुसार साखर व मीठ, एक टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर , पाव चमचा मोहोरीची पूड.

क्रमवार पाककृती: 

कृती: केळी सोलून घेऊन आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावे , घुसळलेल्या दह्यामध्ये १ ते २ चमचे पाणी घालून थोडे घोटून घ्यावे , बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे मिठ एकत्र करून हाताने चोळून घेऊन ते दह्यात मिक्स करावे , दह्यात मोहोरीची पूड , साखर, मिरचीचा ठेचा ,चुरडलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करुन मगच त्यात केळ्याचे तुकडे घालून पुन्हा चमच्याने चांगले हलवून एकजीव करावे.
जेवताना तोंडी लावणे म्हणून हे पिकल्या केळ्याचे चविष्ट रायते सर्व्ह करता येते.

वाढणी/प्रमाण: 
५ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

मोहरीची पावडर (पूड) घातली नाही तर उपासालाही चालू शकेल.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी खाल्लीये.. नॉस्टेल्जिक वाटलं !!! फ्लेवर करता भारतीय केळीच हवी Happy

मस्त लागते हे रायतं .बुफेमध्ये अंगुर बासुंदी नावाच्या पांढऱ्या पाण्यातल्या स्पंजाच्या गोळ्यांऐवजी हे का ठेवत नाहीत ?

मस्त लागते हे रायतं .बुफेमध्ये अंगुर बासुंदी नावाच्या पांढऱ्या पाण्यातल्या स्पंजाच्या गोळ्यांऐवजी हे का ठेवत नाहीत ?>>>>मला वाटते हे लगेच काळे पडते म्हणून

पण चव जबरी असते
बादवे तांबेकाका हे डापेना नाही बरं चालत!

जिज्ञासा म्हणतात त्याप्रमाणे आले ठेचून घातल्यास नक्कीच जास्त चांगले लागेल याची खात्री वाटते. पुढच्या वेळी तसे करून बघेन व छान लागले तर रेसिपीत तशी सुधारणा करेन.