साहित्य : एक जुड्डी अंबाडी पालेभाजी , १/२ वाटी तांदुळाच्या कण्या , ५,६ लसूण पाकळ्या , ३,४ लाल मिरच्या , फोडणीचे साहित्य तेल,मोहोरी,जिरे,हिंग,हळद , चवीनुसार मीठ व गूळ
कृती :
लसणाची फोडणी घातलेली अंबाडीची भाजी व ज्वारीची भाकरी हा माझा अतिशय आवडता मेन्यू आहे. . आणि म्हणूनच मीच त्याची झटपट होइल पाककृती आज येथे देणार आहे.
अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत , व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.
एका भांड्यात एक वाटी तांदुळाच्या कण्या घेउन त्या धुवून घेऊन त्यात अडीच ते तीन वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी व भांडं कुकरला लावावं. तांदुलाच्या कण्यबरोबरच अंबाडी मस्त शिजते व एकजीव होते.
कुकर झाल्यावर तांदळाच्या कण्या व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात.
कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेले कण्या व अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक दरदरून वाफ द्यावी.
ही भाजी त्यावर लसणाची फोडणी टाकून ज्वारीचा भाकरी बरोबर चापावी.