अंबाडीची भाजी (पालेभाजी)

Submitted by pltambe@yahoo.co.in on 27 March, 2014 - 11:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : एक जुड्डी अंबाडी पालेभाजी , १/२ वाटी तांदुळाच्या कण्या , ५,६ लसूण पाकळ्या , ३,४ लाल मिरच्या , फोडणीचे साहित्य तेल,मोहोरी,जिरे,हिंग,हळद , चवीनुसार मीठ व गूळ

क्रमवार पाककृती: 

कृती :
लसणाची फोडणी घातलेली अंबाडीची भाजी व ज्वारीची भाकरी हा माझा अतिशय आवडता मेन्यू आहे. . आणि म्हणूनच मीच त्याची झटपट होइल पाककृती आज येथे देणार आहे.
अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत , व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.
एका भांड्यात एक वाटी तांदुळाच्या कण्या घेउन त्या धुवून घेऊन त्यात अडीच ते तीन वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी व भांडं कुकरला लावावं. तांदुलाच्या कण्यबरोबरच अंबाडी मस्त शिजते व एकजीव होते.
कुकर झाल्यावर तांदळाच्या कण्या व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात.
कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेले कण्या व अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक दरदरून वाफ द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
५ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी त्यावर लसणाची फोडणी टाकून ज्वारीचा भाकरी बरोबर चापावी.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! सुरेख आणि सोप्पी पाकृ. अंबाडीची भाजी मैत्रिणीच्या डब्यातली खाल्ली होती. चव अजूनी रेंगाळतेय जीभेवर. Happy

झटपट पाककृती नक्कीच नाही. पण निवडणं, चिरणं वगैरे कष्ट घेण्यासारखी नक्कीच आहे. मी शिजवताना कण्यांबरोबरच किंचित तूरडाळ, मेथ्याही घालते.

आम्‍ही कण्‍यां ऐवजी बाजरी टाकतो बाजरी आधी 1 तास भिजवून ठेवावी व कुकरच्‍या शिटटया जास्‍त कराव्‍या बाजरी छान शिजते