Submitted by दिपु. on 26 March, 2014 - 03:14
आम्हाला एका जागेत गुंतवणूक करायची आहे.. जागा कोकणात आहे ज्यावर कंपनी स्वतः काही झाडे लावुन देईल..
मला फक्त एवढीच शंका आहे की कंपनी जेन्युअन आहे की नाही , जागा त्या कंपनीच्याच नावावर आहे का हे कसे तपासता येईल, अजुन काही व्हेरिफिकेशन करावे लागेल का?
प्लीज मदत करा लवकर.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
७/१२ वर कोणाचे नाव आहे हे
७/१२ वर कोणाचे नाव आहे हे तपासा. अजून एक ७/१२ अपडेटेड असतोच असे नाही.
दिपु., जागा त्या कंपनीच्याच
दिपु., जागा त्या कंपनीच्याच नावावर आहे का हे कसे तपासता येईल <<< त्या कंपनीला जागेचा ७/१२ नंबर विचारा आणि ती जागा ज्या गावात आहे तेथील तलाठी ऑफिसमधून ७/१२, सर्व फेरफार आणि ८ अ घ्या.
७/१२ नुसार तुम्हाला ती जागा त्याच कंपनीच्या मालकीची आहे ह्याची खात्री मिळेल. तसेच जर त्या कंपनीने त्या जागेवर लोन घेतले असेल तर त्याचा उल्लेख ७/१२ मध्ये असतो.
फेरफारमध्ये ती जागा अगोदर कोणाच्या मालकीची होती आणि ती त्या कंपनीला कधी विकली ह्याचे डिटेल्स मिळतील तसेच ईतरही बरीच माहिती मिळेल. ७/१२ च्या पेपरवर सर्कल केलेले नंबर्स असतात त्यांना फेरफार म्हणतात. त्या प्रत्येक सर्कलमधील नंबरचा तुम्हाला वेगळा पेपर दिला जाईल.
८ अ मध्ये त्या कंपनीची अजूनही प्लॉट असतील त्याच गावात तर त्याबद्दल माहिती मिळेल.
नक्की कोकणात कुठे आहे त्यावरून ईतर माबो नक्की मदत करतील.
कोकणात कुठे ते तरी सांगा..
कोकणात कुठे ते तरी सांगा.. मायबोलीवर भरपूर जण आहेत कोकणातले.. काहीतरे मदत नक्कीच होईल त्यांची..
कंपनी प्राइवेट लिमिटेड आहे
कंपनी प्राइवेट लिमिटेड आहे का
तसे असेल तर एमसीए च्या वेबसाईटवरून डिटेल्स तपासता येऊ शकतील
त्यापेक्षा फ्लॅट मधे गुंतवणुक
त्यापेक्षा फ्लॅट मधे गुंतवणुक करा.........किमान स्वतःचा फ्लॅट असेल ..
कोकणात आरवलीजवळ रातांबी
कोकणात आरवलीजवळ रातांबी म्हणून गाव आहे, तिथे आहे जागा..
काल ७/१२ ऑनलाईन काढलेत ज्या जागांचे सर्व्हे नं कंपनीने दिले होते.. ते कुणा माणसांच्या जागेवर आहेत.. आज तिकडे पाठवलय दीराला चौकशी करायला. .बघु काय कळते ते..
धन्स मदत केल्याबद्दल. .अजुन काही असेल तर नक्की लिहा.
७/१२ ऑनलाईन काढलेत ज्या
७/१२ ऑनलाईन काढलेत ज्या जागांचे सर्व्हे नं कंपनीने दिले होते.. <<< ७/१२ चे लेटेस्ट अपटेडस ऑनलाईन होण्यासाठी कमीत कमी ३ महिने लागतात किंवा त्याहूनही जास्त महिने लागतात. त्यापेक्षा त्या गावामधील तलाठी ऑफिसमध्ये जाऊन चेक करण योग्य.
दिपु.... वरचा आरती या
दिपु....
वरचा आरती या सदस्येचा सल्ला अगदी योग्य आहे. रातांबी गावच्या तलाठी कार्यालयात आर.टी.आय. अर्ज करावा लागला तरी कर. उद्या विकतची डोकेदुखी घेतली असे होऊ नये यासाठी गिन्न्या सोडण्याअगोदरच जमिनीबाबतचा जो काही झमेला आहे तो संबंधित कार्यालयाकडून लेखी स्वरुपात घे. हल्ली बर्याच ठिकाणी महिला तलाठी आहेत पदावर....त्या तुला नक्कीच मदत करतील. सुरुवातीलाच कागदपत्रासाठी पाचपन्नास रुपये गेले तरी हरकत नाही.
प्लान्टेशन कंपन्यांमध्ये पैसे
प्लान्टेशन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून हजारोंनी आपले हात पोळून घेतले आहेत.
अशी गुंतवणूक करताना कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल सेबीने दिलेल्या सूचना
http://shivgiri.com/ ह्या
http://shivgiri.com/ ह्या मधील रबर प्लँट मध्ये गुंतवायचा विचार आहे..