१. स्पाँज केक : ३५० ग्रॅम (बेकरीत मिळतो तो मध्यम आकाराचा)
२. अर्धा लिटर दुध
३. कस्टर्ड पावडर : ४ टेबल स्पून
४. स्ट्रॉबेरी क्रश किंवा जॅम : लागेल तसा
५. केळ्याच्या चकत्या
६. सफरचंदाच्या पातळ फोडी
७. संत्र्याच्या बारीक बारीक फोडी
८. डाळींब, खजूर, काजू, पिस्ते जे काय आवडेल आणि उपलब्ध असेल ते.
९. पाव वाटी साखर
१. स्पाँज केकचे स्लाईस करून घ्यायचे आणि ते काचेच्या पसरट ट्रेमध्ये किंवा बेकींग ट्रे मध्ये मांडून घ्यायचे. (लहान सर्व्हिंग बोलमध्ये हे केलं तरी चालतं म्हणजे देताना परत ते काढावं लागत नाही.)
२. त्यावर स्ट्रॉबेरी क्रश किंवा स्ट्रॉबेरीचा जॅम जरासा पातळ करून लावून घ्यायचा.
३. त्याच्यावर केळं आणि सफरचंदाच्या चकत्यांचा थर द्यायचा. आंबट (Citrus) फळं ह्यात घालायची नाहीत.
४. एकीकडे दुधात साखर घालून ते उकळायला ठेवायचं.
५. थोडं दुध आणि कस्टर्ड पावडर ह्यांची पेस्ट करून घ्यायची आणि दुध उकळलं की ते सतत ढवळत ही पेस्ट मिसळायची. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. कस्टर्ड घट्टसर झालं की गॅस बंद करायचा.
६. हे गरम कस्टर्ड केक आणि फळांच्या थरावर ओतायचं.
७. वर केक स्लाईसेसचा दुसरा थर द्यायचा.
८. आता केक+फळं+कस्टर्ड असलेलं भांडं फ्रिजमध्ये सेट करायला ठेऊन द्यायचं. साधारण दिड तास ठेवायचं.
९. सर्व्ह करताना सगळ्यात वरच्या केकच्या थरावर इतर फळे (संत्रे, अननस, डाळींब वगैरे) घालायची आणि थोडं थंडं केलेलं कस्टर्ड घालायचं. सगळ्यात वर सुकामेवा घालून सजवायचं.
१. खूप उत्साहं असेल तर केक घरी करू शकता.
२. केकचे स्लाईस खूप जाड करायचे नाहीत म्हणजे कस्टर्ड त्यात नीट मुरतं.
३. फ्रिजमध्ये सेट करायच्या आधी फक्त केळी आणि सफरचंद घालायची. Citrus fruits घालायची नाहीत. सफरचंद जरा करकरीत असतात आणि त्यामुळे बाकी सगळ्या मऊ गोष्टींमध्ये छान लागतात.
४. सेट झालेल्या केक कस्टर्डवर वरून थोडसच अजून कस्टर्ड घालायचं (नाहितर "तो काय वरण भात नाहीये कालवून खायला !" असले टोमणे ऐकायला मिळतात.)
५. अंब्याच्या दिवसांमध्ये हापूसच्या फोडीही मस्त लागतील.
६. लहान सर्व्हिंग बोलमध्येही डायरेक्ट सेट करू शकता आणि नंतर परत वाढण्यासाठीचं दुसर्या मोठ्या ट्रेत करायचं. आम्ही तसच केलं होतं. फक्त फ्रिज मध्ये जागा खूप व्यापली जाते.
७. स्पायची जेवणानंतर हे गार केक कस्टर्ड मस्त लागतं.
८. सेट होण्याचा वेळ वर धरलेला नाही.
रेसेपी छान! ट्रायफल
रेसेपी छान! ट्रायफल पुडींगसारखंच आहे (का तेच आहे? फक्त नाव वेगळं?).
कमी खटपटीची झकास पाककृती.
कमी खटपटीची झकास पाककृती. फोटो मस्तंय.
>>"तो काय वरण भात नाहीये कालवून खायला !"
हा एकदम आवडता प्रकार. फक्त
हा एकदम आवडता प्रकार. फक्त त्यात केळं अजिबात आवडत नाही. आंब्याच्या फोडी मस्तच लागतील.
मस्त आहे रेसिपी. मुलांच्या
मस्त आहे रेसिपी. मुलांच्या पार्टीकरता वगैरे मस्त लागेल.
मस्त!
मस्त!
सही आहे हे!
सही आहे हे!
मस्त आहे आम्ही केळी टाकत
मस्त आहे
आम्ही केळी टाकत नाही कारण काळी पडतात थोड्या वेळात. तुम्हाला हा प्रॉब्लेम आला नाही का?
५-७ वर्षांपूर्वी सीसीडी मध्ये एक मेन्यु आयटम होता त्यात चॉकलेट की प्लम स्पाँज केक वर व्हॅनीला आईसक्रीम चा स्कूप टाकुन देत. चांगलं लागत होतं मला आवडलं होतं
सुपर डुपर रेसिपइ...
सुपर डुपर रेसिपइ...
ट्रायफल पुडींगसारखंच आहे (का
ट्रायफल पुडींगसारखंच आहे (का तेच आहे? फक्त नाव वेगळं?) >>> आहे खरं सारखं.. पण ट्रायफल पुडींगमध्ये कस्टर्ड नसतं ना बहुतेक ? (मी एकदाच खाल्लय त्यामुळे आठवत नाहीये).
तुम्हाला हा प्रॉब्लेम आला नाही का? >>>> केळी नव्हती काळी पडली. कदाचित अजून जास्त वेळ ठेवलं तर पडतील.
संत्र हि सिट्रस फळ आहे....किवा गार कस्टर्ड वरति घालण्यासाठि चालेल अस मला वाटते... >>> हो बरोबर आहे. तसच लिहिलय ना वर.
सगळ्यांना धन्यवाद प्रतिक्रियांसाठी...:)
आम्हीपण हे ट्रायफल पुडींग
आम्हीपण हे ट्रायफल पुडींग म्हणून खातो
अरे वा! मस्तय हे!
अरे वा! मस्तय हे!
अरे मस्त!!! यावर जेलीपण घातली
अरे मस्त!!! यावर जेलीपण घातली की मऽऽऽस्त लागतं.
मस्त दिसतय ...
मस्त दिसतय ...:)
भारी आहे. करणार नक्की बरीच
भारी आहे. करणार नक्की
बरीच व्हेरिएशन्स करता येतील यात.
फोटो मस्त आहे... एकदम
फोटो मस्त आहे... एकदम तोंपासु! करणार नक्कीच. यात द्राक्षं, स्ट्रॉबेरी पण छान लागतील का?
जॅम पातळ कसा केला?
पहिलं पुष्प कुठलं होतं? शोधायला हवं.
ह्यातलं माझं आवडतं व्हेरिएशन
ह्यातलं माझं आवडतं व्हेरिएशन : केक + कस्टर्ड + जेली + आवडती फळं + wafer crackers - crunchier the better, choco-chips!
Ice-cream scoop is a Must!
यात द्राक्षं, स्ट्रॉबेरी पण
यात द्राक्षं, स्ट्रॉबेरी पण छान लागतील का? >>> द्राक्ष घातली होती.. वरच्या फोटोत दिसतायत.. चांगली लागतात..
स्ट्रॉबेर्या नाही घातल्या.. घाला आणि सांगा..
जॅम पातळ कसा केला? >>> थोSSडसं पाणी घालून चमच्यानी फेटला.. खूप घटट असेल तर सगळीकडे नीट लागत नाही आणि मग जास्त लावला जातो..
पहिलं पुष्प कुठलं होतं? >>>>
आम्ही अटलांटा गटगांना अशी (एक्झॉटीक) पुप्ष करून सगळ्यांना (कंपल्सरी) खाऊ घालायचो..
पूनम.. कस्टर्डच्या जागी रबडी हे वेरिएशन पण मस्त लागेल..
सगळ्यांना (कंपल्सरी) खाऊ
सगळ्यांना (कंपल्सरी) खाऊ घालायचो.. फिदीफिदी>>> आम्हाला कुठे खाऊ घातलंय? मग आम्हाला कसं समजणार??
उग्गाऽऽऽच रबडीचा तगादा लावत बसतात...

अरे हो....मि बदल केला आहे....
अरे हो....मि बदल केला आहे....
फोटो भारी दिसतोय. काल नव्हता
फोटो भारी दिसतोय. काल नव्हता ना?
होता फोटो काल.
होता फोटो काल.
वाह! फारच तोंपासू
वाह! फारच तोंपासू
मी एकदाच खाल्लय त्यामुळे आठवत
मी एकदाच खाल्लय त्यामुळे आठवत नाहीये >> हो का? कुठे बरं :फिदी:??
मस्त रे! हापूस आंबे टाकून खा ह्याच्यावर. काय सही लागेल!! हापूस टाकले की सगळंच सही लागतं म्हणा!
आम्हाला कुठे खाऊ घातलंय? >>>
आम्हाला कुठे खाऊ घातलंय? >>> या की कधीही! अख्खा पुष्पगुच्छच देऊ..
रबडीचा तगादा पौ ना..
सिंडे.. फोटो होता तेव्हाच,,
मो.. काय आठवत नाही आता.. फार दिवस झाले खाऊन..