Submitted by pltambe@yahoo.co.in on 23 March, 2014 - 05:42
माझ्या घराच्या १२ ' x १० ' गच्चीमध्ये ५ वर्षांपूर्वीपासून मी एक मातीविरहित जैविक बाग केली आहे व त्यात आत्तापर्यंत मी शुअर ५० पेक्षा जास्त प्रकारची फुलझाडे,फळझाडे,भाज्या,पालेभाज्या ,शेंगभाज्या लावून त्यांचे उत्पन्न ही मिळवले आहे.
पण गेल्या सहा महिन्यांपासून कुणाची तरी दृष्ट लागल्याने माझ्या ह्या बागेत करंगळीएव्हढ्या जाडीच्या आल्या झाल्या असून त्यामुळे झाडांची पाने आपोआप सुकून नष्ट होऊ लागली आहेत. सोबत मी त्या आलयांचा काढलेला फोटो देत आहे.तो बघून जर कोणी या आल्याचा नायनाट कसा करता येईल हयाबद्दल मला मार्गदर्शन करेल तर मी आभारी होईन.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणाची तरी दृष्ट लागल्याने
कुणाची तरी दृष्ट लागल्याने माझ्या ह्या बागेत करंगळीएव्हढ्या जाडीच्या आल्या झाल्या>>>> पंधरा दिवसांच्या अंतराने १ भाग गोमूत्र +३ भाग पाणी मिसळून झाडांवर फवारणी करा.झाडांची छाटणी जरुर करा.कदाचित त्यावर अंडी असू शकतील.अधून मधून हळदीचे पाणी फवारा.
माझ्यामते ही वाळवी असावी
माझ्यामते ही वाळवी असावी ....
ही अळी घेऊन एखाद्या नर्सरीत जाऊन त्यांचा सल्ला घेणे - कारण वाळवी ही फार विचित्र कीड असते - मुळांवर हल्ला करुन ती सर्व रोपे नष्ट करते...
मी करतो तो उपाय, सुटी तंबाखु
मी करतो तो उपाय, सुटी तंबाखु आणायची, थोडी उग्र असते ,ती थोडी कुंड्यात टाकायची. त्यावासाने किडे हटतात ,अळ्या जातील बहुधा.
फोटो वरुन वाळवीच वाट्ते. जर
फोटो वरुन वाळवीच वाट्ते. जर वाळवी असेल तर काळजी घेतलेली बरी. ही किड झाडांना , कागदाला, पुस्तकांना व. लागते. एकदा लागली की नायनाट करणे कठिण. लगेच तज्ञ माणसाला गाठुन उपाय करुन घ्या.
माझ्या घराच्या १२ ' x १० ' गच्चीमध्ये ५ वर्षांपूर्वीपासून मी एक मातीविरहित जैविक बाग केली आहे व त्यात आत्तापर्यंत मी शुअर ५० पेक्षा जास्त प्रकारची फुलझाडे,फळझाडे,भाज्या,पालेभाज्या ,शेंगभाज्या लावून त्यांचे उत्पन्न ही मिळवले आहे
ह्याच्या बद्दल इथे लिहा ना. मातीविरहीत म्हणजे नक्की काय? वाळवी ला पोषक असे ह्यात काही आहे का?
हे बहुतेक हुमनी आहे बहुतेक .
हे बहुतेक हुमनी आहे बहुतेक . जरा क्लोज अप क्लिअर टाका. वाळवी नक्कि नाही आहे. तंबाखु वगैरे घातल्याने गांडूल मरतात. जैवशेतीवाले (नॉन केमिकल) त्यावर वेखंडाचे पाणी वापरतात. काही प्रकारचे फंगस ही किड नष्ट करतात. अजुन एक, काही यीस्ट पण वापरतात असे ऐकिवात आहे.
http://www.cals.ncsu.edu/cour
http://www.cals.ncsu.edu/course/ent425/library/spotid/coleoptera/familie...
हे याचेच भाइबंद आहेत. tyaatalaa 2 nM chaa kiDaa baghaa.
हे बहुतेक ग्रब्ज आहेत.
हे बहुतेक ग्रब्ज आहेत.
जमिनीत आहेत का झाडांवर आहेत
जमिनीत आहेत का झाडांवर आहेत ?
घरच्या भाजीपालाच्या बागेत मलेथिऑन वगैरे रासायनिक विषे मारू नका .
वाळवी आहे समजून फ्युरान तर अजिबात नको .
काही दिवस पडीक ठेवणे ,मिरच्यांचे पाणी मारणे
अथवा मैद्याची पातळ खळ फवारणे .ती वाळल्यावर आकसून बरेच तुडतुडे ,मावा ,भुंगे इत्यादी मरतात .
निवांट पाटिल यांनी दिलेल्या
निवांट पाटिल यांनी दिलेल्या लिंक मधल्या 'जापनीज बीटल्स' चे हे (स्वाती२ म्हणते त्याप्रमाणे) ग्रब्ज आहेत. लवकरात लवकर याचा बंदोबस्त करा. आमच्या इकडे यांना 'जून बग्ज' असंही म्हणतात. साधारण मेच्या शेवटी येतात, जूनच्या तिसर्या आठवड्यापर्यंत असतात आणि सगळी बाग होत्याची नव्हती करून टाकतात. खालच्या लिंक्स बघा. गुगलवर अजूनही भरपूर माहिती सापडेल.
http://ohioline.osu.edu/hyg-fact/2000/2001.html
http://www.gardeners.com/Control-Japanese-Beetles/5163,default,pg.html
http://www.organicgardening.com/learn-and-grow/japanese-beetles
साधना, ह्याच्या बद्दल इथे
साधना, ह्याच्या बद्दल इथे लिहा ना. मातीविरहीत म्हणजे नक्की काय? >>>+१
माती विरहीत :नारळाची शेंडी
माती
विरहीत :नारळाची शेंडी ,काथ्या ,भुस्सा इत्यादी कुंडीत भरायचे .कुंड्या
हिरव्या जाळीच्या अथवा हरितगृहात टांगायच्या/ठेवायच्या .ऑर्किडसाठी चांगले
.पाण्याचे फवारे ठेवून गारवा ठेवायचा .(गुहागरला मोदी यांचे आहे)
पालेभाज्यांसाठी चालेल .जुनी मच्छरदाणी (6X6) वापरता येते पण उन्हाने एक
वर्षात जिरते .
मोकळया उघड्या जागा मात्र वेलभाज्यांसाठी लागतात कारण परागीभवन किटकांकडून
व्हावे लागते त्याशिवाय कार्ले ,दुधी वगैरे येणार नाहीत .पण त्याचबरोबर इतर
किटकही येऊन पानांवर अंडी घालतात .त्यांच्या अळ्या पाने खातात .
बंदिस्त वाढवायचे असल्यास रोज सकाळी नर फुलांवर ब्रश फिरवून पराग गोळा
करायचे आणि मादी फुलांवर झटकायचे असे परागीभवन आपण करावे लागते .आपल्या
छोट्या वाफ्यांपुरते शक्य आहे एकरी शेतीसाठी नाही .
घरची बाग म्हणजे रासायनिक किटकनाशके न वापरणे .सरळ भाजी उपयोगात आणता आली
पाहिजे .
खत: शेणखत पाण्यात भिजवून त्याचा चहाच्या रंगाचा द्राव फक्त वापरणे .
यसआरडी, ऊत्तम माहिती...
यसआरडी, ऊत्तम माहिती... धन्यवाद.
प्रमोद जी कुठल्या प्रकारचे फुलझाडे,फळझाडे,भाज्या तुम्ही लावल्या आहेत..
सविस्तर सांगाल का? जमल्यास फोटो पण टाका....
बी यांना विचारा
बी यांना विचारा
साधना व Sayali
साधना व Sayali Paturkar
तुम्हाला माझी अशी विनंती आहे की कृपया मायबोलीवरील 'घराची बाग' या सदरात जाऊन माझा एक जुना
लेखनाचा धागा "आमचे पर्यावरण रक्षणाचे उपक्रम व इतर मुलूखावेगळे छंद " प्रमोद् ताम्बे 28 March, 2014 - 19:08 पहा,ज्यात मी सविस्तर लिहिले आहे.
माती विरहित म्हणजे कुंडी म्हणून थर्मोकोलच्या खोक्याला तळात व सर्व बाजूंनी १० मी.मी. ची भोके पाडून घेऊन त्यात नारळाची शेंड्या,उसाचा रस काढून झाल्यावर उरतो तो चोथा,करवंट्यांचे बारीक तुकडे,विटांचे बारीक बारीक तुकडे, वाळलेला पाला पाचोळा,यांचे ३" जाडीचे थर दाबून बसवणे व प्रत्येक थरावर मूठभर बाजारात मिळणारे बायो-कल्चर (एक प्रकारचे विरजण) पावडर घालावी सोबत थोडीशी लिंबोळ्याची पावडर घालावी. कुंडी वरुण ३" मोकळी ठेवावी. मग मध्यभागी थोडासा खड्डा करून त्यात बाजारात मिळणारे रोप बाहेरची प्लास्टिकची पिशवी फाडून टाकून लावावे. पन्हा बाजूला केलेला कचरा त्यावर ओढून घेऊन मग पाणी घालावे.
काही दिवसांनंतर घरातील सर्व प्रकारचा (ज्याचे जैविक विघटन होईल असा) ओला कचरा टाकायला सुरुवात करावी, यात चहाचा चोथा,कोथिंबीर,मेथी,पालक,शेपू,चाकवत,मुला,अंबाडी,हरभरा इ. पालेभाज्यांची देठे , मटाराची साले,फळांची साले ,वालाची (डाळिंब्यांची) टरफले,नखे,केसांचे गुंतवळ सुद्धा चालते, एव्हडेच काय मेलेले उंदीर,घुशी व झुरळे टाकली तरी चालते.
मी बागेत आंबा,पेरु,केळी,चिक्कू,अंजीर,पपई,डाळिंब अशी फळझाडे शेवगा,हादगा,अळू,रताळी,पावटा (वाल), टोमॅटो, भेंडी,वांगी, पुदिना,कढीपत्ता,गवती चहा ,मिरच्या,मेथी,पालक, कोथिंबीर,कारली आशा भाज्या व गुलाब,मोगरा,जाई,रातराणी,कुंद,मदनबाण.अबोली,हजारी मोगरा,सोनचाफा, ब्रह्मकमळ,शेवंती, सदाफुली, निशिगंध, मे फ्लॉवर अशी फुलझाडे लावली होती / आहेत.
हयाविषयी मी एक सचित्र लेखच लिहीत असून पुरा झाल्यावर मी तो स्वतंत्र लेखन धागा म्हणून टाकणार आहे. थोडीशी वाट बघा.