झी मराठी बघण्यासाठी अमेरिकेतले मार्ग

Submitted by वाट्टेल ते on 20 March, 2014 - 10:52

झी मराठी आणि इतर मराठी channels बघण्यासाठी अमेरिकेत सध्या काय options उपलब्ध आहेत? आई वडील आणि सा.बा. येणार आहेत ३-४ महिने त्यामुळे नितान्त गरज आहे.
- आपली मराठी - हे बघतोच पण सलग TV बघण्याचा - जाहिरातींसकट बघण्याचा अनुभव बरा होईल असे वाटते.
- पूर्वी ही मन्डळी आली असताना अनेक वेळा watchindia चे subscription घेतले होते आणि माझा तरी watchindia चा अनुभव खूपच बरा आहे. पण सध्या त्यांची website चालू नाही का? त्यांचे ipad app आहे, त्यातून सरळ त्यांच्या facebook ला जातय, आहे का सध्या कोणाकडे हे? आणि मी अनेक ठिकाणी ते scam वगैरे आहे असे वाचले, त्यामुळे क़ळत नाही. local सगळी मन्डळी एक तर आपली मराठी वरून बघतात नाहीतर बघतच नाहीत.
- डिश - मला शक्यतो हा option नकोय. web based काही असेल तर बरे.

सुचवाल का ? धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉचइंडीयाचा दोनदा वाईट अनुभव आला. एकदा तो रिसिव्हर चालायचाच बंद झाला. कुठलेही चॅनल्स दिसेनात. मागच्या वर्षी सॅमसंग टीव्हीवरचे अ‍ॅप घेतले तरी तीच कथा. त्यावेळेस तर सबस्क्रिप्शन बंद करण्यासाठी सुद्धा कटकट झाली होती. कुठेही फोन नंबरच नाही. वेबसाईटवर कुठेही सबस्क्रिब्शन बंद हा ऑप्शन नाही. इमेल सुद्धा १० वेळा केल्यावर एकदाचे बंद केले त्यांनी. वैताग नुसता.

यप टीव्ही बरे आहे असं ऐकले आहे. फार पूर्वी अगदी दोनेक महिन्यासाठी वापरले होते, बरे वाटले होते.

मला ठाऊक आहे तुम्हाला मराठीच हवे आहे. परंतू असं काही नसेल तर डीशवर्ल्डटीव्ही फार बेस्ट. एकतर त्यांच्याकडे सोनी आहे(जे इतर ठिकाणी शोधूनही मिळत नाही) सर्व चॅनल्स अगदी एचडी क्वालिटी. व शिवाय विलो टीव्ही मिळते. डिश वगैरे भानगड नाही. स्मार्टटीव्ही असेल तर अ‍ॅप आहे, नाहीतर लॅपटॉपवर पण पाहता येते.

TVFORUMONLINE.COM . इथे बर्‍याच मराठी चॅनेल्स दिसतात. मी एक दोन सॅम्पल म्हणून बघितल्या. तुम्हाला नक्की काय बघायचे आहे, बातम्या का काय ते त्यात आहे की नाही हे माहित नाही.
शिवाय गूगल क्रोम ($३५) ला घेतले तर पीसी टीव्ही ला जोडून मोठ्या स्क्रीनवर पण बघता येईल. क्रोम नसेल तर साधी HDMI cable पण जोडून सगळे टीव्ही वर बघता येईल.

या भानगडी माझ्या सारख्या अमेरिकेतल्या माणसाला सुद्धा जमल्या. त्यामुळे भारतातल्या अत्यंत हुषार्र लोकांना नक्की जमेल.
फक्त मराठी हिंदीच काय अमेरिकन टीव्ही त बघण्यासारखे मला काही सापडत नाही.

झक्कींना गुगल क्रोमकास्ट म्हणायचे आहे. ते देखील अतिशय उपयुक्त आहे. युट्यूबवर सगळं काही मिळतं, त्यामुळे क्रोमकास्ट वर कास्ट करून कार्यक्रम बघणे अगदी सोपे होते. परंतू तुम्हाला जाहीरातींसकट चॅनल्स बघायचे असल्याने ते सुचवले नाही.

Youtube यु ट्युब वर झी टी व्ही बघु शकता . १५ दिवस फुकट नन्तर $१० प्रती माह.

सगळ्यांना धन्यवाद. हे सर्व मला बघण्यासाठी नसून येणार्या मंड्ळींसाठी आहे. ते काही का बघेनात. त्यात बघण्यासारखे काहीही नसते असे मलाही वाटते, या मंड्ळींना पण असेच वाटत असावे पण सवयीचा गुलाम माणुस.
माझ्याकडे apple tv आहे त्यामुळे iphone, ipad वर प्ले केले की त्यांना tv वर बघता येईल. त्यामुळे पी सी वगैरे जोडण्याची गरज नाही. पूर्वी याच पद्दतीने watch india बघितले होते पण आता यप्प हा option चांगला वाटत आहे.

अमेरिकेत "जादु ३ " नावाचा सेट टॉप बॉक्स मिळतो . आठ महिन्यापुर्वी तो २०० डॉलर्स ला मिळत होता आता फक्त
१७९ डॉलर्स ला मिळतो. ह्या सेट टॉप बॉक्स साठी एकदाच पैसे खर्च करावे लागतात. पण यावर भारतातील सर्व मराठी / हिन्दी /गुजराथी / अन्य सर्व च्यनेल तर दिसतात शिवाय पाकिस्तानी च्यनेल सुद्धा दिसतात . जून २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या आठ महिन्याच्या अमेरिकेतील वास्तव्यात , " जादू " चाच , करमणुकीसाठी आम्हाला आधार होता. त्यावर यू ट्युब सुद्धा पहाता येते . पाकिस्तानात दाखविली गेलेली " अस्लम भाई अँड कंपनीकी , लग गयी वाट " हि एक निखळ मनोरंजन करणार्‍या सिरीयल चे तब्बल १०० भाग आम्ही तेथेच पुर्ण पाहिले.
इंटरनेट वर चालणारा हा सेट टॉप बॉक्स ,जगभरात , जेथे इंटरनेट कनेक्शन आहे तेथे तेथे तो वापरता येतो. मुलाने सांगितले म्हणून भारतात परत येतांना , आम्ही हा सेट टॉप बॉक्स , घेवून आलो आहोत . येथेही तो सुरु आहे. अमेरिकेत त्यावर लेटेस्ट हिन्दी सिनेमे सुद्धा दिसत होते.

हा सेट टॉप बॉक्स वजनाला अतिशय हलका असून ,तळहाता वर मावतो इतका लहान आहे , पण कामगिरी मात्र महान आहे. एक मात्र लक्शात घ्यावे कि अमेरिकेत हा ११० वोल्ट्स वर सुरु होतो , भारतात २३० वोल्ट्स असल्याने
५० वॉटस ऑउट्पुट देणारा कन्वर्टर वापरणे आवश्यक आहे तोही फार महाग आहे असे नाही.

आम्ही यप टिव्हीचं एक महिन्याचं पॅकेज घेतलं आहे. चांगला आहे अनुभव. मध्येच हँङ होणे वगैरे प्रकार नाहीत.

यप टीव्ही आम्हीही गेले वर्षभरापेक्षा जास्त काळ बघत आहोत (म्हणजे मधे मधे बंद करतो :P). बहुतांश वेळा काही प्रॉब्लेम नसतो. कधीकधी स्क्रीन फ्रीझ होणे वगैरे होते. पण एक्झिट करून परत चालू केले की चालते. मस्त सर्विस आहे.

zeefamily.tv ला एक फुकट Account काढा.. झी चे सगळे चॅनेल पहाता येतात..

http://www.zeemarathi.com/videos
इथे सगळ्या झी मराठी च्या मालिका बघता येतील. रोज नवे एपिसोड अ‍ॅड होतात. जुने देखील बघता येतात.

गोगा त्यांच्या डिस्क्लेमर मध्ये पहा. ते म्हणाले तुम्चा ट्रायल पिरीयड संपला तर आम्ही तुम्हाला कळ्वु किंवा कळवणार नाही मग तुम्हाला जे बिल येईल ते भरावे लागेल.

बिल पाठवायला त्यांच्याकडे माझा फक्त ईमेल पत्ता आहे. क्रेडीट कार्ड नाही.. तेव्हा पाठवलेच बील तर ... कुठे जाईल? Happy

कोडी प्लेअर इन्स्टॉल केल्यास झी मराठी चा अ‍ॅडऑन मिळतो. सर्व कार्यक्रम तारखेनुसार आणी एपिसोडवाईस बघता येतात. प्लस अमेझॉन फायर स्टीक (~$४०) असेल तर त्याद्वारे टीवी वर ही पाहता येतात...

शक्यतो "वाट्टेल त्या" किंवा "अनोळखी साईट्स" पेक्षा पैसे भरुन (किंवा युट्युब इ,) असेल ते सेफ आहे. इतर साईट्स वरुन ट्रोजन, मॅलवेअर इ. येण्याची शक्यता असते.
आम्ही तिथे असताना वॉच इंडीया पहायचो (वहिनी साहेब Happy ) तेव्हा बर्‍यापैकी सर्विस होती.

भरत, भारतातील रेस्टॉ मधे पाश्चात्य संगीत असते (ते "सांद्र" वगैरे :)) पण येथील पॉश देशी रेस्टॉ मधे देशी संगीत असते, तसाच प्रकार असेल Happy

जोक्स अपार्ट, आम्हाला सध्यातरी यप टीव्ही आवडतो. $१५ महिन्याला. बघण्याचे बरेच पर्याय आहेत. भारतातील वेळेप्रमाणे, अमेरिकेत अ‍ॅडजस्ट केलेल्या वेळेप्रमाणे, ऑन डीमाण्ड ई.

हो.. झी फॅमिली आता स्लिंगकडे गेले. Sad
तसंही आम्ही विशेष पाहात नव्हतो, पण कधी मधी बातम्या लावल्या जायच्या. आता बहुतेक यप्प किंवा स्लिंगच.