शेपू ची दशमी

Submitted by नम्रता निकम on 7 March, 2014 - 17:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेपू , हि . मिरची , लसूण , गव्हाचे पीठ , oat, मीठ , ओवा,पाणी

क्रमवार पाककृती: 

शेपू , हि . मिरची , लसूण , गव्हाचे पीठ , oat, मीठ , ओवा,पाणी
शेपू निवडून , धुवून, बारीक चिरून घेणे
त्यात लसुण , मिरचीचा ठेचा , मीठ आणि कपभर oats घेणे
मावेल तसे गव्हाचे पीठ घेऊन पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक मळून घेणे … १५ मि . नंतर पराठे लाटून तेल/ तूप लावून भाजणे

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी आणि पौष्टिक पाकॄ.
पण कृपया प्रमाण लिहा ना. किती हिरव्या मिरच्या/लसूण घ्यायच्या? गव्हाच पीठ कपभर?

बाह! काय दिसतेय दशमी Happy शेपू जीव की प्राण आहे, त्यामुळे कोणत्याही फॉर्म मध्ये खायला मिळाला तरी आनंदच Happy

लोक शेपू खातात ह्याचं मला आश्चर्य वाटतं..
मी मुंबईत असताना एका ठिकाणी खानावळ लावली होती. माझे काही मित्र तिथे आधीपासून जेवायचे.
पहिल्याच आठवड्यात डाळीत शेपू पाहून मी त्यांना म्हणालो, 'मी शेपू खात नाही.. मी दह्याबरोबर भात जेवेन (दही पानात असायचेच)'. त्यानंतर डाळीत शेपू पडली की मला वरण वाढायचे. बाकीचे शेपू आवडत नसताना (आधी सांगितले नाही म्हणून) गपचुप खायचे, आणि बाहेर आल्यावर माझ्यावर चिडायचे... Happy

हेहेहे हिरा. मला शेपूच्या चवीची कैरी आवडते. शेपूची भाजी मात्र जरा नाक मुरडतच खाल्ली आहे. पण पराठा चांगला लागेल असं वाटतंय.