सायकल गिअर्स १०१
बरेच जण गिअरची सायकल घेतात पण ते गिअर्स नेमके कसे वापरायचे आणि त्याच्या राईडसाठी फायदा कसा करून घ्यायचा हे बर्याच जणांना माहिती नसते.
सायकल बाबत काही नियम.
१. कधिही थांबलेल्या सायकलच्या गिअर्सशी खेळ करायचा नाही. कोणी करत असेल तर त्याला विनम्रपणे असे नको करू हे सांगायचे.
२. गिअर्स हे आपल्याला अचानक मदत करू शकत नाहीत. त्यासाठी रस्ता अॅटिंसिपेट करावा लागतो. म्हणजे चढ दिसत असेल तर आधीच लोअर गिअर मध्ये सायकल आणणे आवश्यक आहे.
३. लिसन टू युवर बॉडी, प्लेन रस्ताही कधी कधी फसवा असू शकतो. पायावर ताण आला की गिअर्स बदलायचे.
४. कधीही "कोस्टिंग" करू नये. म्हणजे विना पेडल उतारावरून येणे, पेडल न मारताच सायकल बराच वेळ चालवणे करू नये. त्याने आपला व्यायामाचा उद्देश साध्य तर होतच नाही शिवाय मस्त पैकी टेंपो आलेला असतो तो जाऊ शकतो.
केडन्स म्हणजे काय?
केडन्स RPM ( Revolutions per minute ) मध्ये मोजतात. सायकलच्या पेडलचे एक पूर्ण वर्तूळ म्हणजे एक RPM. RPM मोजायला सायक्लोमिटर वगैरे मिळतात. पण तो आपणही मोजू शकतो. कसा? तर एका प्लेन रस्तावर तुम्ही सायकल चालवायला सुरूवात करा. साधारण १० एक मिनिटांच्या वॉर्मापनंतर हे गणित करा.
१ मिनिटाच्या वेळात एका पायाचे किती वर्तूळ होतात ते मोजा. त्याला दोन ने गुणले म्हणजे तो तुमचा केडन्स!
हायर गिअर मध्ये RPM कमी भरतात, तर लोअर गिअर मध्ये RPM जास्त भरतात. (पेडल स्पिन). ह्या माहितीचा उपयोग काय? तर कुठला गिअर कधी आणि कसा बदलायचा ते आपल्या केडन्स वरून ठरते. थोडक्यात आपली बॉडीच आपल्यासाठी गिअर निवडत असते, पण आपण त्याला नंबर मध्ये इंटरप्रिट करू शकत नाही. ते करण्यासाठी मी खाली काही ठोकताळे (माझ्या अनुभवानुसार) देतो. १००% तेच वापरायला पाहिजे असे नाही.
गिअर्स १०१ ! कोणता गिअर कधी?
गिअरच्या सायकला दोन डिरेलिअर असतात. आपला डावा हात हा समोरचे गिअर कंट्रोल करतो तर उजवा हा पाठीमागचे. बहुतेक सायकल्सना समोर ३ गिअर असतात तर पाठीमागे सात किंवा ८. क्वचित समोर ४ गिअरवाली सायकल पण असते.
प्रत्येक गिअरचे स्वतःचे असे महत्व आहे. आणि प्रत्येक राईड मध्ये ह्यातील प्रत्येक गिअर तुम्हाला तुमची राईड आणखी चांगली करण्यास मदत करू शकतो.
समोरचे गिअर्स ( डाव्या हाताचे)
३ = वेग आणि कमी RPM
२ = मध्यम = लिझर राईड = एव्हरीडे गिअर
१ = जास्त आरपिएम = कमी श्रम आणि जास्त पेडल स्पिन - चढावरच वापरायचा.
पाठीमागचे गिअर्स (उजव्या हाताचे)
१ , २ आणि ३ = चढावर कामाचे. खूप कमी वेग आणि जास्त पेडल स्पिन, जेवढा कमी गिअर तेवढा वेग कमी.
४-५ = मध्यम गिअर = नेहमीच्या वापरासाठी असणारे गिअर
६- ७ = वेग हवा असल्यास.
मी इथे काही नियम देतो. प्रत्यक्ष परिस्थितीत आपला केडन्स काय हे तुम्हाला व्हिल / लेग स्पिन वरनं कळतं आणि तुम्ही तो गिअर पुढे / मागे करून बदलू शकता.
प्लेन रस्ता : सुरूवात २-४ ने करा. १० मिनिटे झाल्यावर किंवा हे खूप लो वाटल्यास मग २-५ आणि अजून पुढे २-६ ( २-७ नका टाकू). रोजच्या पाँईट टू पाँईट राईड साठी हा मिडल गिअर बरा आहे. ह्यात तुम्हाला खूप जास्त वेग मिळणार नाही.
प्लेन रस्त्यावर खूप जास्त वेग हवा असेल तर तर : सायकलची सवय आहे हे गृहित धरले आहे. तर, सुरूवात २-४, २-५ ने करून पुढे गेल्यावर २-६ आणि मग ३-४, ३-५ मध्ये घ्या. तिथून आणखी स्पिड हवा असेल तर ३ ठेवून मागचा गिअर वाढवत न्या.
छोटा चढ - चढावरचा थंब रुल डाव्या हाताच्या कंट्रोल समोरचा गिअर २ मध्ये टाका. मग पाठीमागचा ३ किंवा ४ मध्ये, अगदीच झेपत नसेल तर २-२ (पण २-२ ची वेळ छोट्या चढावर आली तर तुमचा स्टॅमिना खूप कमी आहे, तो वाढवा.)
मोठा चढ आणि एखादा घाट : चढ अॅटिंसिपेट करून समोरचा गिअर २ मध्ये आणि पाठीमागचे (ऊजवा हात) ४ नंतर ३ नंतर २ आणि त्याही नंतर चढ चढता येत नसेल तर मग समोरचा गिअर १ मध्ये टाकायचा. तिथे हे कॉम्बिनेशन वापरत. १ -४, १-३ १-२
चढ चढायचा स्टॅमिना कसा वाढवावा?
आधी साधारण २० मिनिटे सायकल नेहमीप्रमाणे चालवा. मग एक मायनर चढ असलेला रस्ता शोधा. तिथे समोरचा गिअर २ मध्ये टाकून कधीही चालवू नका. आता समोरचा गिअर ३ असायला हवा आणि पाठिमागचे कॉम्बो ४. तर मग ३-४ ने सुरू करा, तो प्लेन (पण थोडा चढ असलेला) ३-४ ने चढा, वेळ मोजा, मग परत येऊन ३-५ मध्ये टाका आणि परत तो चढ चढा. असे करताना तुम्हाला लक्षात येईल की जो चढ तुम्ही आधी २-४ चढत होता तो आता ३-४ ने सहज चालवत आहात. पण ह्याला मेहनत लागते आणि तोच तो रस्ता परत परत चढावा लागतो.
चढावर गिअर बदलता येतात. त्यासाठी सायकल मोशन मध्ये ठेवावी लागेल. डेड स्पिड मध्ये (थांबल्यावर) बदलायचे नाहीत.
उतार : उतारावर डावीकडचा ३ वर करून उजवीकडे बिनधास्त ३-७ पर्यंत जा. घाटातनं ३-७ वर जी मजा असते ती काही और! कोस्टिंग करण्यापेक्षा ३-७ मध्ये पेडल मारत राहायचे. खूप चांगला कंट्रोल मिळतो आणि भन्नाट वेगाने खाली येता येते.
वर हे जे गणित दिले आहे तेच असतं का? तर नाही. हे सर्व माझ्या अनुभवावर आधारित आहे. जसेच्या तसे तुम्हाला लागू होईलच असे नाही. कुठला गिअर कधी बदलायचा हे तुमचा स्वतःचा केडन्स ठरवतो. म्हणजे ज्या वेगात तुम्ही पेडल मारत आहात तो वेग. तो वेग तुम्हालाच कळतो की जास्त आहे की कमी? आणि सायकलचे गिअर्स तो जास्त / कमी करायला मदत करतात.
मी जे वर थंब रुल्स दिलेते ते थंब रुल्स ब्रेक केल्यावर जो वेगळाच अनुभव येतो ती एक मजा असते. म्हणजे एखादा छोटा नेहमीच्या रत्यावरील चढ जर तुम्ही ३-५ मध्ये (कमी RPM) पार करू शकत असाल तर आपोआपच तुमचा स्टॅमिना वाढलेला असतो. आणि तुम्ही मग सह्याद्री मधील छोटे / मध्यम घाटही लिलया पार करू शकाल.
एकदम उपयुक्त माहिती.
एकदम उपयुक्त माहिती.
घाटातल्या उतारावरून ३-७ ने येताना जो काही वेग आणि उच्च कोटीचे नियंत्रण मिळते त्याला खरोखरच तोड नाही.
रच्याकने - मी आज ऑफीसला सायकलवर आलोय, अन्तर अंदाजे ७ किमी आहे, वेळ स्वयंचलित दुचाकीवर लागतो तितकाच लागला
उपयुक्त माहीती, वाचून पुढच्या
उपयुक्त माहीती, वाचून पुढच्या वेळी अंमलात आणेन
अरे वा, हे तू माझ्यासाठीच
अरे वा, हे तू माझ्यासाठीच लिहितोयस असं वाटतंय मला!! आत्ता तरी वाचून जमेल असं वाटतंय.. आणि जमेलच. तू खुप व्यवस्थित, सहज समजेल असंच सांगतो आहेस. प्रचंड धन्यवाद...
हर्पेन, मस्त. मी तेच ठेवलंय डोळ्यासमोर. मलाही रोज - निदान आठवड्यातून ३-४दा तरी यायचंय. माझं ऑफिस तर ५ किमी आहे जेमतेम. आणि बराचसा रस्ता रिकामा मिळतो. पुण्यात हे एक सुखच.
सई नक्की जा मग, जितके वेळा
सई नक्की जा मग, जितके वेळा सायकल चालवशील तितक्या लवकर गियर वापरावर प्रभुत्व मिळवशील
मी गियर्स वापरताना पहिला
मी गियर्स वापरताना पहिला आठवडा २-३ कॉम्बिनेशनने सुरुवात केली. दर आठवड्याला एक-एक गियर वाढवत न्यायचा आणि आता ३-५ वर जोमाने सायकल हाकलतो..
राईडवरुन आल्यानंतर कळत नाहीये, पण मागच्या डिल्युलरमध्ये काही बिघाड झाल्यासारखा वाटतोय. ६ वा गियर टाकताच येत नाहीये. आता गियर सेटिंग करुन घ्यायला लागेल..
(No subject)
गियर्ड सायकल नसलेल्यांनी काय
गियर्ड सायकल नसलेल्यांनी काय टीप्स पाळायच्या सांगू शकशील का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43034
वेल ईथे पहा...
केदार सॉरी रे तुझ्या धाग्यावर माझी सायकल फिरवतोय
आशु - धन्स..
आशु - धन्स..
अरे सॉरी काय त्यात. सायकल
अरे सॉरी काय त्यात. सायकल महत्वाची, धागा नाही.
BTW काल मग मी सिहंगडला एकटाच गेलो आणि सरही केला. आणि दुसरे म्हणजे टोटल १०० + ची राईड पण केली.
सही रे केदार.. मी घरी गेलो
सही रे केदार..
मी घरी गेलो होतो.. ठरलेल्या कार्यक्रमांसाठी.. तुझ्यापासून काय लपवणार..
आता येत्या विकांती येता येईल की नाही ते पण नक्की सांगता येणार नाही..
धन्यवाद धागा काढल्याबद्दल.
धन्यवाद धागा काढल्याबद्दल. जरा निवांत वाचेन सगळ्या टिप्स.