पाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.
अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.
आणि जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत नि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.
महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा भरतो करोडो लोक तेथे स्नान करून पावन होतात. परंतु गोदावरी नदी हि अत्यंत प्रदूषित झालेली आहे. मेगासेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह ह्यांनी ‘कुंभ मेळ्यात मुख्यमंत्र्यांनीच आधी स्नान करून आचमन करून दाखवावे असा उपरोधिक टोला लावला आहे.’ ह्या वरून बोध घेवून सरकारने नद्या प्रदूषित होवू नये म्हणून पावले उचलणे गरजेचे वाटते.
कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांनीच आधी स्नान करून दाखवावे!---जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे आव्हान; गोदावरीतील प्रदूषणाकडे बोट
http://www.loksatta.com/mumbai-news/river-pollution-chief-minister-shoul...
यावे यावे जनाब. मुख्य
यावे यावे जनाब. मुख्य प्रतिसाद नंतर लिहीतो.
धन्यवाद.
शतकास शुभेच्छा !
http://mpcb.gov.in/images/kum
http://mpcb.gov.in/images/kumbhdetailed.pdf
हे धक्कादायक आहे .
हे धक्कादायक आहे .
(No subject)
माझ्या मते पाणी प्रदूषण करणे
माझ्या मते पाणी प्रदूषण करणे हि लोकांची भयानक सवय आहे त्याबाबत लोक जागृती व्हायला हवी
मुख्य प्रतिसाद नंतर लिहीतो.>>>>जेम्स बॉन्ड प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. हे पाणी प्रदूषण रोखण्याबाबत तुमच्याकडे काही विधायक सूचना असल्या तर जरूर सुचवाव्यात
कुंभमेळ्यासविरोधकरूनलांगुलचाल
कुंभमेळ्यासविरोधकरूनलांगुलचालन्कर्ताहातका?
एका देशाचे नागरिक आपण.
एका देशाचे नागरिक आपण. स्वातंत्र्य लढाही साऱ्यांनी मिळून लढलाय. आपल्याला सारे सारखे कसले लांगुलचालन नि कसले काय.
आदरणीय राहुल गांधींनी महिला
आदरणीय राहुल गांधींनी महिला सबलीकरणाबरोबर नदी शुद्धीकरणावरदेखिल लक्ष द्यायला हवेय.
म.शा. ला आलेखांचे वावडे आहे
म.शा. ला आलेखांचे वावडे आहे का? पुर्वी आणि नंतरचे प्रदुषण यावर चांगले आलेख दिले असते तर अधिक बरं झालं असतं. असो.
अश्या जागी अश्या तज्ञांचे मत ऐकुन त्यावर योग्य ती कृती करणारा नेता हवा, केवळ हायकमांड म्हणतील तेच करायचे, असा वाला जमणारच नाही.