१. १ मोठे पिकलेले केळं
२. १ कप ऑरेंज ज्यूस
३. १/२ कप बारीक चिरलेले अक्रोड
४. १/४ कप जवस (अळशी)
५. १/२ कप रवा
६. १ कप कणिक
७. १/४ कप तेल
८. २ अंडी
९. २ चमचे वॅनिला एसेन्स
१०. १.५ चमचा बेकिंग पावडर
११. १/२ चमचा बेकिंग सोडा
१२. साखर (ऑप्शनल)
१. ४०० डि फॅ किंवा २०० डि से. ला अव्ह्न प्रीहीट करावा.
२. जवस भाजून त्याची पूड करून घ्यावी.
३. केळ, ऑरेंज ज्यूस आणि तेल मिक्सर/ब्लेंडर मधून एकत्र काढून घ्यावे. साखर हवीच असल्यास आपल्या आवडीनुसार घालावी मग ब्लेंडरमधून काढावे.
४. एका पसरट भांड्यात अंडी फोडून एकजीव करून घ्यावी. त्यात वॅनिला इसेन्स टाकून नंतर त्यात केळ, ऑरेंज ज्यूस आणि तेलाचे मिश्रण टाकून नीट एकत्र करून घ्यावे.
५. दुसर्या भांड्यात कणिक, जवसाची पूड, रवा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण करून घ्यावे.
६. ४ व ५ स्टेप्समधील मिश्रणे नीट एकत्र करावी.
७. आता त्यात अक्रोडचे तुकडे घालावे.
८. केकच्या पॅनला थोडेसे तेल लावून त्यामध्ये मिश्रण घालावे व ४० मिनिटे बेक करावे. ३० मिनिटानंतर एकदा चेक करावे. तसही केक होत आला की मस्त सुवास येतोच. त्यावरून अंदाज येऊ शकतो.
९. नेहेमीप्रमाणे केक अवनमधून काढण्याआधी आतपर्यंत सुरी घालून नीट बेक झाल्याची खात्री करुन घ्यावी.
१०. केकपॅन थंड झाले की केक सर्व बाजुंनी मोकळा करून प्लेट्मधे काढावा.
११. नुसता खायला छान लागतो. पण गोड हवचं असेल तर केकच्या स्लाईसवर मध अथवा आपल्या आवडीचे सिरप घालावे. मध घालून फार मस्त लागतो.
१. पूर्ण रेसिपीमध्ये साखर ऑप्शनल आहे. केळ आणि ऑरेंज ज्युसचा छान स्वाद लागतो. रेडीमेड ऑरेंज ज्यूस वापरणार नसाल तर संत्र्याचा ज्यूस करताना राहिलेला चोथाही घालावा. केक खाताना जाणवत नाही. ऑरेंज ज्यूस फार आंबट असेल तर तेवढ्यापुरती २ चमचे साखर घालावी.
२. अंडी, जवस आणि अक्रोड यामधे ओमेगा३ असल्याने ओमेगा३ केक नाव द्यावे असे वाटत होते.
३. गार झाल्यावर फ्रिजमधे ठेवावा.
अनयुज्ज्वल पदार्थ आहे .. ४००
अनयुज्ज्वल पदार्थ आहे ..
४०० डिग्री ला ४० मिनीटे म्हणजे फार जास्त होत नाही का?
सशल अर्धा तास तरी लागतोच. मी
सशल
अर्धा तास तरी लागतोच. मी केला तेव्हा अर्धा तासानंतरही आतमअधून झाला आहे असे वाटेना. मला तापमान आणि वेळ याचा फारसा अंदाज नाही. मी ब्रेड्साठी जो पॅन वापरतात त्यात केला. कदाचित गोल पॅन वापरला तर वेळेत फरक पडेल का कल्पना नाही. तसे कृतीत लिहावे बहूतेक.
अरे वा .. फोटो छान आहे .. मी
अरे वा .. फोटो छान आहे ..
मी आतापर्यंत २५ मिनीटं ते १ तास असं बेकींग टाईम बघितला आहे वेगवेगळ्या केक्स् , ब्रेड्स् च्या रेसिपीत पण टेम्परेचर सहसा ३५०, किंवा क्वचित ३७५ बघितलं आहे .. ४०० पहिल्यांदाच बघितलं म्हणून प्रश्न पडला ..
धन्यवाद सशल !
धन्यवाद सशल !
फोटो छान आहे. इथे 'लो कॅलरी
फोटो छान आहे.
इथे 'लो कॅलरी बनाना ब्रेड'ची जी कृती आहेत त्यात मी केळ्यांचं प्रमाण कमी करून ऑ ज्यु घालून करते. मस्त लागतो त्यामुळे चवीची कल्पना आहे. या पद्धतीने करून बघेन.
मस्तं पाककृती. फोटोपण
मस्तं पाककृती. फोटोपण आवडला.
केळ्याला काही नॉन-फळ सब्स्टिट्यूट आहे का?
वा...माधवी छान पदार्थ आहे.
वा...माधवी छान पदार्थ आहे. जवसाची अॅडिशन छान हेल्थी!
धन्यवाद सिंडरेला,
धन्यवाद सिंडरेला, मानुषी.
माझ्याकडे थिक ऑरेंज ज्युस होता म्हणून घातला पण बहुतेक कुठलाही चालु शकेल असे वाटतेय. रंगात फरक पडेल. पुढच्या वेळी रास्बेरी ज्युस घालून करायचा विचार आहे.
मस्त रेसिपी आणि फोटो. अक्रोड
मस्त रेसिपी आणि फोटो. अक्रोड म्हणजे वॉलनटस ना?
ज्या शेपमध्ये कापला आहात त्याने ब्रेड वाटतोय केकपेक्षा.
केक मस्त आहे. फोटोही सुरेख
केक मस्त आहे. फोटोही सुरेख आहे.
रिअलचे ज्युस पॅक मिळतात त्यातलं ऑरेंज ज्युस घेतलं तर चालेल का? (संत्र्याचा रस काढायचा कंटाळा)
खूपच मस्त आणी हेल्दी वाटतेय
खूपच मस्त आणी हेल्दी वाटतेय रेसिपी.
व्वा ... म स्त...केक म्हनजे
व्वा ... म स्त...केक म्हनजे माझा फेवरेट.....फोटो सूंदर...
अंडी न घालता करता येईल का?
अंडी न घालता करता येईल का? बे.पा.चे प्रमाण बदलेल ?
धन्यवाद सगळ्यांचे! फोटो
धन्यवाद सगळ्यांचे!
फोटो आवडल्याचे सांगितल्याबद्दल विशेष आभार. मोबाईलमधूनच काढलाय. मला वाटले होते एवढा काही खास आला नाही आहे.
मंजूडी, ज्यूस पॅक मधले ज्यूस चालेल नक्कीच.
देवकी, अंडी न घालता ही करता येइल. बे पा चे प्रमाण बदलावे लागेल की नाही कल्पना नाही. पण मला वाटते नाही बदलले तरी चालावे.
माधवी. धन्यवाद ! नक्की करून
माधवी.
धन्यवाद ! नक्की करून पाहीन.मस्त पाकृ आहे.
चवीची कल्पना येतेच आहे. छानच
चवीची कल्पना येतेच आहे. छानच लागणार. फोटोही छानच आहे.
वॉव.. टेस्टी लागत असणार
वॉव.. टेस्टी लागत असणार नक्कीच.. मस्त आहे रेसिपी आणी फोटो
@सशल मला वाटते कि ति 400
@सशल
मला वाटते कि ति 400 degree farenheit mhanat aahe..ani tu celcius bolat ahes..karan 350 farenheit mhanje 180 degree celcius hotat..
छान दिसतोय! पण का कुणास ठाऊक
छान दिसतोय! पण का कुणास ठाऊक मला संत्र आणि केळं असे एकत्र आवडत नाही.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
मस्त.. ट्राय करून पाहिन..
मस्त.. ट्राय करून पाहिन..
मस्त!
मस्त!
मी आज हा केक केला. खुप छान
मी आज हा केक केला. खुप छान झाला आहे. फोटो नंतर टाकेन. 180 डि. से. ला ४० मिनीटे बेक केला.
धन्यवाद. आभा नक्की फोटो
धन्यवाद. आभा नक्की फोटो टाका.
माझ्या विपूत मानुषी यांनी लिहिलेली एक कल्पना इथे देत आहे. मला आवडली
संत्री जर थोडी जाड सालीची, उत्तम प्रतीची (हे लिहिण्याचे कारण....भारतात छोट्या गावात नेहेमीच उत्तम प्रतीची मिळतीलच असं नाही) आणि ताजी असतील तर...
सालं काढून त्याच्या पट्ट्या कापून त्या पाकवायच्या. व बरणीत भरून फ्रीजमधे ठेवायच्या. ़
आणि या केकमधे या पाकवलेल्या पट्ट्यांचे बारिक तुकडे आणि याला जर पाक उरला असेल तर तोही थेंबभर घालायचा. अप्रतीम संत्रा स्वाद येतो केकला.