पंचतारांकित अध्यात्म

Submitted by सचिन पगारे on 4 February, 2014 - 11:02

भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.

मोठमोठ्या शामियान्यात त्यांचा सत्संग चालतो. सध्याच्या काळात बुवा बनणे हा किफायतशीर व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी ह्या बाबांचे भक्त असतात. बाबांच्या सेवेला सेवकांचा ताफा, प्रवासासाठी आलिशान गाड्यांचा ताफा,कोट्यावधींचे आश्रम असे बाबांचे स्वरूप असते.सेलिब्रिटी लोकांचा समाजावर प्रभाव असतो त्यांचे अनुकरण म्हणूनही बरेच जण अशा बाबांची भक्ती करतात. बाबांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या एकूण आपण २१ व्या शतकात राहतोय कि १० व्या शतकात असा प्रश्न पडतो.

विज्ञान, शास्त्र जसजशी प्रगती करत आहे तस तसे अंधश्रद्धेचे स्वरूपही बदलत चालले आहे. अंधश्रद्धाही आता अत्याधुनिक बनत चालल्या आहेत.देशातील भोळ्या भाबडी जनता सोडाच समाजात उच्च पदावर असणारे व्यक्ती ज्यांच्याकडून समाजाला एका आदर्शाची गरज असते तेही अशा बाबा बुवांच्या कच्छपी लागलेले बघून त्यांची कीव येवू लागते.

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये' .हे वाक्य सत्यात उतरवणारे सध्याच्या काळात जण कोणी असेल तर हे सध्याचे पंचतारांकित साधू नि संत ह्यात शंकाच नाही. पूर्वीचे भावपूर्ण अध्यात्म हे लयास जावून हे नवेच पंचतारांकित अध्यात्म उदयास आले आहे आणि त्यालाही भरपूर मागणी आहे . एखादा शिकलेला असेल तर आपण त्याला सुशिक्षित म्हणून ओळखतो. पण पुस्तकी ज्ञान असले तरी ती व्यक्ती सुशिक्षित असेलच असे नाही हे ह्या बाबांच्या भक्तांकडे पाहून पटते.

ह्या भोवतालच्या अंधश्रद्धा पाहून पद्मश्री नरेंद्र दाभोलकर सर ह्यांच्या कार्याची किती आवशक्यता आहे ह्याची जाणीव होते.पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरवून गेली..

आजच्या काळात जर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी खरोखरच एखाद्या गुरूची आवशक्यता असेल तर तो गुरु गाडगे महाराजांसारखा असावा..

आसाराम १० हजार कोटींचे धनी

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu/articleshow/29...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पगारे साहेब तुमच्या नव्या धाग्याची आम्ही सलमानच्या नव्या चित्रपटासारखी वाट पहात असतो. शे-दोनशे पोष्टींची तर बेगमी होऊनच जाते. त्यामुळे तुमचा नवा धागा दिसला की आम्ही लगबगीने धावत जाऊन पोस्टींचे अर्घ्य वाहतो.बाकी माबोकरांच्या भांड्कुदळ स्वभावाचा तुम्ही जो अभ्यास केलाय त्याला तोड नाही. कोणता पिक्चर हिट जाणार याबाबत तुमचा अंदाज दाद देण्यायोग्यच......

आगे बढो....

आता बाबा समर्थक आणि बाबा विरोधक आपापली कुमक घेऊन येतीलच. तुम्ही आपली चहाची गाडी लावलीच आहे. दोन्हीकडची गिर्हाईके मिळतील तुम्हाले बाप्पा ....

पगारे साहेब,

तुमचा मुद्दा एकंदरीत पटला. पण एक सांगू? कायदेशीर विचार करायचा झाला तर आसाराम बापूंनी वा रामदेव बाबांनी जी संपत्ती गोळा केलीये, ती पांढरी आहे. तिची तुलना काळ्या पैशाशी होऊ शकत नाही. जसे आपण आधुनिक संतांवर तुटून पडलात तसेच भ्रष्ट नेत्यांवरही तुटून पडावे ही विनंती. एका पक्षाने आपल्या एका नेत्याच्या प्रतिमासंवर्धनावर ५०० कोटी रुपये खर्च करायचे ठरवले आहे. त्यावर आपली टिप्पणी अपेक्षित आहे.

आ.न.,
-गा.पै.

मी विचार करतोय, आता स्वामी विजयानंद बनावं... काही कोर्स-बिर्स असेल तर नक्की सांगा.... Happy
भक्तगणांना सुवर्णसंधी, तात्काळ संपर्क करा.

कायदेशीर विचार करायचा झाला तर आसाराम बापूंनी वा रामदेव बाबांनी जी संपत्ती गोळा केलीये, ती पांढरी आहे. >>>> गामा जी, म्हणजे हे आपल्या भक्तांनी दिलेल्या देणगीची पावती वगैरे देतात कां? किंवा त्याच्या ब्रांडच्या औषधांच्या विक्रीचे VAT paid bill वगैरे देतात अशी आपली समजुत आहे कां??

कायदेशीर विचार करायचा झाला तर आसाराम बापूंनी वा रामदेव बाबांनी जी संपत्ती गोळा केलीये, ती पांढरी आहे. तिची तुलना काळ्या पैशाशी होऊ शकत नाही >>>>

याचा पुरावा आहे का ?

एका पक्षाने आपल्या एका नेत्याच्या प्रतिमासंवर्धनावर ५०० कोटी रुपये खर्च करायचे ठरवले आहे.>>> एका पक्षाच्या नेत्याच्या प्रत्येक सभेवर २० ते ५० कोटी खर्च होत आहे असे ५० च्या वर सभा झालेल्या आहेत .. इतके पैसे कुठुन आले यावर आपली टिप्पणी अपेक्षित आहे.. तसेच प्रतिमा संवर्धनावर गेली ४ वर्षांपासुन विदेशी कंत्राट दिलेले आहे जे एका वृत्तवाहिनीवर देखील दाखवले गेले आहे त्याचे पैसे देखील कुठुन आले . यावर देखील "विशेष टिप्पणी" अपेक्षित आहे..... Biggrin

पगारे साहेब तुमच्या नव्या धाग्याची आम्ही सलमानच्या नव्या चित्रपटासारखी वाट पहात असतो. शे-दोनशे पोष्टींची तर बेगमी होऊनच जाते. त्यामुळे तुमचा नवा धागा दिसला की आम्ही लगबगीने धावत जाऊन पोस्टींचे अर्घ्य वाहतो.>>>>>>>:हहगलो:

आता बाबा समर्थक आणि बाबा विरोधक आपापली कुमक घेऊन येतीलच. तुम्ही आपली चहाची गाडी लावलीच आहे. दोन्हीकडची गिर्हाईके मिळतील तुम्हाले बाप्पा ....>>>>:हहगलो:

पगारे तुम्हाला इतकेच समजायला पाहीजे की महामानव किन्वा असामान्य व्यक्तीमत्वे शतकातुन एकदाच फक्त एकदाच निर्माण होत असतात. बाकी तुमच्याशी एकदम सहमत. मस्त लेख आणी आटोपशीर आढावा.:स्मित:

आज सकाळी थंडी खूपच जास्त वाटली. पण आता उकाडा जाणवू लागला आहे. पाणीकपातही सुरू झाली आहे. तर ते असो.

पाणीकपातही सुरू झाली आहे>>>>:हहगलो: चहात पाणी जास्त घालता नाही आले वाट्टे. जाऊ दे दूध पण ५० रुपये झालेय.:फिदी:

सचिन पगारेजी,

आपण कॉग्रेसवर धागे काढण्याऐवजी चावुन चोथा झालेल्या विषयांवर का बाफ काढत आहात? यामुळे माझ्यासारख्या आपल्या चाहत्यांची घोर निराशा होत आहे. राहुल गांधी यांच्या मुलाखतीच्या बाफवर आपण आलातच नाहीत. आपला "सब्जेक्ट" मी घेतला यावर आपल्याला राग आला असेल तर क्षमस्व. त्यामुळे मी "प्रियांका गांधी हेच भारताचे भविष्य" या विषयावर बाफ काढण्याचा विचार रद्द केला आहे. आपल्या पुढच्या विनोदी बाफची आतुरतेने वाट पाहत आहे.

धन्यवाद.

मला देखील "करण थापर" यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या "सब्जेक्त" वर बाफ काढण्याचा विचार आहे.. तो सुध्दा तुफान विनोदी असेल याची शक्यता आहे.. Biggrin

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व व सर्वांनी कृपया उदार स्पिरिटमध्येच हा प्रतिसाद घ्यावा अशी विनंती!
====================

माबो ऑर्गनायझेशन चार्टः

राष्ट्रपती - वेबमास्टर

उपराष्ट्रपती - झक्की

पंतप्रधान - अ‍ॅडमीन

गृहमंत्री - चिनूक्स

व्यापार व वाणिज्यमंत्री - साजिरा

परराष्ट्रमंत्री - फारेण्ड

संरक्षणमंत्री - इब्लिस

अर्थमंत्री - बी

कोळसामंत्री - गापै

कायदा व सुव्यवस्था - वीरप्रतापसिंग लोटे

आंदोलन स्पेशालिस्ट - सचिन पगारे

क्रीडामंत्री - रिया

उर्जामंत्री - डेलिया

भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख - भरत मयेकर

सौहार्दमंत्री - मामी

दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख - स्वाती आंबोळे

दळणवळण मंत्री - मंदार जोशी

नॉनकन्व्हेन्शनल एनर्जी - अशोक

अधिकृत प्रवक्ते - असामी

सांस्कृतीक मंत्री - फकिर

आरोग्यमंत्री - साती

शिक्षणमंत्री - वरदा

दुर्बल घटक विकास मंत्री - दाद

शीर्षक "पन्चतारान्कित अध्यात्म" असे आहे, पण सम्पुर्ण लेखात "अन्धश्रद्धा" असाच उल्लेख आला आहे.
सचिनजी पगारेजी, अध्यात्म म्हणजेच अन्धश्रद्धा असेच तर तुम्हाला सुचवायचे नाहीये ना?
नेमके काय ते उलगडून सान्गा बोवा.
[ पण तो अजेण्डा तर मिशनरी/अन्निसवाले/कम्युनिस्टान्चा आहे, तुम्ही कसे काय तिकडे घसरलात - आयमीन तिकडे कसे काय वळलात? ]

बायदिवे, http://www.maayboli.com/node/47447#comment-3023146 इथले "विपश्यना" हे देखिल तुमच्या मते पन्चतारान्कित अध्यात्म/अन्धश्रद्धेमधे मोडते की कसे ते निश्चितपणे सान्गा बघु. उगिच मोघम उत्तर नको.

दळणवळण मंत्र्यांना 'पर्यटन'विकास खातेही द्यावे अशी मी पंतप्रधानांना विनंती करतो.
त्याच बरोबर 'वीरप्रतापसिंग लोटे'(वय आठ आठवडे) या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याने तिथे माझी वर्णी लागावी ,यासाठी बालकल्याण आणि स्त्री 'सब''ली'करण मंत्री 'बेफिकिर' यांनी लॉबिंग करावे अशी विनंती करतो.

Pages