पनिनी मेकर/ग्रिल

Submitted by ज्ञाती on 28 January, 2014 - 19:35

पनिनी मेकर या उपकरणाविषयी व त्यात करता येण्याजोग्या पाककृती शेअर करण्यासाठी हा धागा. स्वागत!!

पानिनी मेकर वापरून करायच्या २०० पाककृती http://paninihappy.com/panini-101/ या ब्लॉगवर आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केव्हाचा शोधत होते हा धागा.

सीमा, छान फोटो. बघ बाई, ह्या बायकांना जे दिसत नाहिये ये काय आहे ह्याचीच माहिती हवीये. (मलापण). Proud

तर, माझा 'पामे' आला. ३ वेळा वापरुन झाला व निकाल उत्तम आलाय. सर्वजणीना धन्यवाद. हा घ्यायचा होताच पण 'पुश' मिळत नव्हता.

sandwitch panini इतके कुरकुरीत, हलके होते की प्रचंड आवडले.
ताज्या पोळ्या करुन, भाजी भरुन रोल पानिनी केले ते पण झक्कास झाले. चिज न घालता पण चिकटते.
पेस्तो वगैरे कृत्या शोधुन ठेवल्यात. पण त्या आधी स्वतः करुन पहाते व आवडल्या तर इथे लिहीन.

आता मला भाज्या चविष्ट ग्रिल करायच्या युक्त्या तेवढ्या सांगा. मी केल्या पण आधी मसाला लावला तरी विशेष चव आली नव्हती. त्या इतर गोष्टींबरोबर रोलात गेल्याने चांगल्या लागल्या पण नुसत्या खायला नाही आवडल्या.

अनुश्री, इथे पहा. हा घेतला.
http://www1.macys.com/shop/product/calphalon-1832450-5-in-1-electric-gri...

दिसतोय का?

आणि हे काय, भाज्या ग्रिल करत नाही का कोणी? Happy

सीमा, तुझ्या फोटोत दिसतय की. सांग की.

सुनिधी,
मी पनीर, झुकिनी, सिमला मिरची आणि मश्रूम्स ग्रिल केले आहेत. झुकिनीच्या Peeler वापरून लांबट चकत्या(?) केल्या. त्यावर मीठ, मीरपूड लावून ग्रिल केलं. पनीर, मश्रूम्स आणि सिमला मिरची दही-लिंबूरस-शानचा मसाला लावून थोडावेळ मॅरीनेट करून ग्रिल केलं. चांगलं लागलं. माझी एक मैत्रिण अ‍ॅस्पॅरागसपण ग्रिल करते. मी अजून केलं नाहीये.

वांग्याचे काप पण छान होतात ह्यावर. हवं तर नेहेमी प्रमाणे पीठ लावून किंवा फक्त थोडं ऑलिव ऑईल, तिखट , मीठ , क्रश्ड लसूण आणी कोथिंबीर.

अरे देवा. रॅप बरोबर काय असनार? चिप्स. Proud

सुनिधी अगं त्या रॅप मधल्या सगळ्या भाज्या ग्रील केलेल्याच आहेत. बेल पेपर्स, बटाटे (हो ते पण मी ग्रील करते बरेचदा) आणि झुकीनी आहे त्यात.

अरे देवा. रॅप बरोबर काय असनार? चिप्स>> गुड... जीवाला चैन नव्हतं ते काय आहे ते कळेस्तोवर Happy

Happy चिप्सच निघाल्या शेवटी...

थँक्स सर्वांना. वांगं परवा केलं पण जरा निबर झालेले असे वाटले. पुन्हा पहाते.

हे पुर्णच अवांतर आहे तरी लिहिते (तुम्हाला माहिती नसेल तर उपयोग होईल असे वाटते) -
आमच्या इथे market on the move असा बाजार दर शनिवारी भरतो. ते लोक बर्‍याच grocery दुकानातुन त्यांना नको असलेल्या (पण चांगल्या राहिलेल्या) भाज्या घेतात व ५-६ ठिकाणी त्या विकायला बाजार भरवतात. तिथे १० डॉलरला तब्बल ६० पौंड वजनापर्यंत भाज्या विकत घेता येतात. अर्थात सर्व प्रकारच्या भाज्या नव्हेत पण तरी वांगी,झुकिनी,रंगीत मिरच्या, squash असे कायकाय मिळते.
लोक ६० पौंड घेतात व मग ३-४ कुटुंबे मिळुन वाटुन घेतात. ऑर्गॅनिक पण असतात कधीकधी. बघा, तुमच्याकडे असे काही असेल तर. भरपुर बचत होईल.

Pages