तृणरस काढायचं मशीन पुण्यात कुठे मिळेल?

Submitted by ठकुबाई_सुपरफास्ट on 27 January, 2014 - 01:52

मला गव्हांकुरचा रस कसा काढायचा या बद्दल जास्त माहिती हवी आहे.
मी आठवड्यातून फक्त १ वेळ तो रस बनवते. त्यासाठी सध्या मिक्सर वापरत आहे परंतु त्यात पाणी घालावे लागते. आणि म्हणावसं रस निघत नाही.
याशिवाय मी फळांचा रस काढायचं मशीन मधून पण ट्राय केल पण ते पण जमत नाही ( गव्हांकुर (quantity) जास्त नसतात)
इथे कोणाला तृणरस काढायचा अनुभव आहे का? थोडस सर्च केल्यावर गुगलवरती खाली दिलेली मशीनचे फोटो मिळाले पण ते कुठे मिळतील या बद्दल कोणी मार्गदर्शन करेल का ?
Fruit-Juicer-Big-.jpg

हे ट्राय केल आहे

wheatgrass_juicer.jpg

हे हव आहे पुण्यात/ऑनलाईन , कुठे मिळेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मशीन म्हणजे फळांचा (उदा. मोसंबी) चा रस काढणारे आहे का? असल्यास रसवाले भैय्या सांगु शकतील.

हे मशीन पुण्यात मंडईमध्ये एक काकडे ब्रदर्स असे किंवा काकडे भांडी दुकान असे काय नाव आहे तेथे मिळेल ग .
विचारुन बघ.