यंदा २६ जानेवारी निमित्ताने आमच्या बिल्डिंगमध्ये पाककृती स्पर्धा आयोजित केली होती.मटरचे गोड व तिखट पदार्थ -त्यात ७०% मटरचा वापर करायचा होता.त्यात मी ही कचोरी केली होती. एका रेस्टारेण्ट चे मालक-- शेफ ,फ्रेन्की कॉर्नर ची मालकिण व बिल्डिंगमधलेच एक असे तीन प्ररिक्षक होते .पदार्थाची चव्,प्रेझेंटेशन्,मटरचा वापर अशा तीन गोष्टींवर गुण दिले गेले..माझ्या वहिनीला गोड पदार्थ--ग्रीन पीज बॉल्स ला पहिले बक्षिस मिळाले..तसेच माझ्या रेसिपीला पहिला क्रमांक मिळाला आहे. खवैय्या माबोकरांसाठी कचोरीची कृति शेअर करीत आहे.
र्खस्ता मटर कचोरी + स्मोकी टोमॅटो-गार्लिक,मिंट चटणी + चिंचे+ खजुर्+गूळ चटणी + शेव.
कचोरीची प्राथमिक तयारी व दोन्ही चटणी तयार असल्यास मुख्य कचोरीला फारसा वेळ लागत नाही.
कचोरी साठी साहित्यः--
कव्हर--
२ कप मैदा.
३/४ वाटी गरम तेलाचे मोहन.
१ टी स्पून ओवा.
चवीपुरते मीठ.
लागेल तसे पाणी.
सारण--
मटर दाणे -१ १/२ कप.
२ हिरवी मिरची चिरलेली, अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे.
१ टी स्पून - तिखट ,मीठ, गरम मसाला,बडीशोप,चाट मसाला.व धनेपूड.
१/२ टी स्पून हिंग,
२ टी स्पून भाजुन भरडलेले धणे-जिरे..
अर्ध्या लिंबाचा रस,
१ टेबलस्पून तेल व फोडणीसाठी मोहोरी-जिरे.
२ टेबलस्पून डाळे [चण्याचे] थोडेसे गरम करुन याची मिक्सरमधे बारीक पुड करुन घ्यावी.
२ टेबलस्पून डेसिकेटेड खोबरे,
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी.
कचोरी तळण्यासाठी तेल.
स्मोकी टोमॅटो-गार्लिक,मिंट चटणी साठी साहित्यः--
२ लाल टोमॅटो,
४ लसुण पाकळ्या,
३-४ हिरव्या मिरच्या.
१ वाटी कोथिंबीर,[देठासकट]
१ वाटी पुदिना [देठासकट]
१/२ लिंबू,
१ टी स्पून जिरे,
१ टी स्पून सपाट -सेंधव मीठ,
१टी स्पून सपाट- मीठ.
चिंच -खजुर-गूळ चटणी साठी साहित्यः--
अर्धी वाटी प्रत्येकी चिंच , बिया काढलेला खजुर व गूळ.
सजावटीसाठी:--
लवंगीची शेव आणि त्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला.
कचोरी वरचे आवरण तयार करण्यासाठी मैद्यात गरम तेलाचे मोहन व मीठ घालुन हाताने छान एकत्र करा मैद्यात मोहन सगळीकडे छान लागले पाहिजे.नंतर लागेल तसे पाणी घालुन मैद्याचा गोळा तयार करा.[पोळ्यांसाठी करतो तसा] हा गोळा पातळ ओल्या फडक्याखाली झाकुन ठेवा.साधारण २० मिनिटे मुरला पाहिजे.
आता सारण तयार करायचे आहे.त्यासाठी मिक्सरच्या भांडयामधे हिरवी मिरची,आले व २ टेबलस्पून मटरचे दाणे घालुन बारीक वाटुन घ्यावे .नंतर त्यात बाकी उरलेले मटार दाणे घालुन सर्व मिश्रण थोडे जाडसर/भरड वाटुन घ्यावे..आता एका पॅन मधे फोडणी साठी तेल गरम करुन त्यात जिरे,बडीशोप व हिंग घालावे.लगेचच मटर दाण्यांची भरड घालुन परता.आता त्यात तिखट-मीठ-भरडलेले धणे,जिरे,धनेपुड्,गरम मसाला,चाट मसाला ,डेसिकेटेड खोबरे व डाळ्याची पूड घालुन मिश्रण छान परता.एक मिनिटानी गॅस बंद करुन मिश्रणात लिंबाचा रस व कोथिंबीर घाला.
हे मिश्रण थंड झाले कि त्याचे लहान लहान गोळे तयार करा..कचोरी साठी सारण तयार झाले आहे.
तसेच भिजवलेल्या मैद्याचा गोळा छान मळुन त्याचेही सारणाच्या आकाराचे गोळे करा.
आता मंद गॅसवर कढईत तेल तापायला ठेवा.
मैद्याची एक गोळी लाटुन त्यात .सारण भरुन पेढ्याचा आकार द्या.दोन्ही हाताच्या तळहातावर थापुन कचोरीचा आकार द्या.[अशाच सर्व कचोर्या तयार करुन ओल्या कापडा खाली झाकुन ठेवा.] कढईतील तेलात एकावेळी २ किंवा ३ कचोर्या तळण्यासाठी टाका .[कढई व तेलाचे आकारमान पाहुन.] व गॅस लगेच बंद करा..कढईतील तेलात कचोरी सोडली कि तळाशी जाते व कचोरी खालुन तळली गेली कि ती आपोआप तेलावर तरंगते याच वेळेस गॅस चालु करुन मंद आच ठेवायची आणि झार्याच्या मदतीने कचोरीची साइड उलटवायची.छान खरपुस रंगावर अशाच रितीने सर्व कचोर्या तळुन ,टिशु पेपर वर काढुन घ्याव्या..
स्मोकी टोमॅटो-गार्लिक, मिंट चटणी---
मध्यम गॅसवर दोन्ही टोंमॅटो व लसूण पाकळ्या, त्यांचे साल थोडेसे काळे होईल इतपत भाजुन घ्या.यासाठी स्क्रूवर किंवा सुरी चा वापर करा.
टोमॅटो व लसूण साले काढुन चिरा. मिक्सरच्या भांड्यात लसुण्,आले,मिरची,जिरे व २-३ टोमॅटोच्या फोडी घालुन बारीक वाटा.त्यानंतर त्यात कोथिंबीर ,पुदिना व बाकी टोमॅटो फोडी सेंधव.साधे मीठ व लिंबूरस घालुन बारीक वाटा.लागेल तसे पाणी घालुन सरसरीत चटणी तयार करा.या चटणीला भाजलेल्या टोमॅटो व लसणीचा मस्त फ्लेवर येतो.टोमॅटो असला तरी कोथिंबीर-पुदिन्यामुळे चटणीला हिरवा रंग येतो.
चिंच-खजुर-गूळ चटणी:--
गरम पाण्यात भिजवलेले चिंच व खजुर आणि गूळ मिक्सरमधे वाटुन घ्या.हे मिश्रण चाळणीतुन गाळुन घ्या.लवंग शेव मधे थोडीशी कोथिंबीर चिरुन घाला.
आता कचोरीचे सुरीने चार भाग करा.पूर्ववत जमवुन त्यावर हिरवी चटणी.चिंच चटणी त्यावर शेव घालुन आस्वाद घ्या.
.
१]सारण व चटणी तील हिरवी मिरचीचे प्रमाण चवीप्रमाणे घ्यावे.वरील प्रमाणात बेतशीर तिखट होते.
२]दोन्ही चटण्या व सारण आधी करुन ठेवावे.
३] कचोरी खस्ता ,खुटखुटीत असावी तसेच अजिबात तेलकट नसावी.यासाठीची खरी मेख कचोरी तळण्यातच आहे.त्याकरीता वर लिहीलेल्या टिप प्रमाणे करावे.
४]थंड कचोरीही खस्ता लागते.
व्वा
व्वा ..कचोरी.....मस्तच..........
छान टिप्स आहेत. तळणे
छान टिप्स आहेत. तळणे कौशल्याचे काम आहे खरे.
२६ जानेवारी अजून आला नाहीये
२६ जानेवारी अजून आला नाहीये ना? मग आधीच घेतली का स्पर्धा.
हि रेसीपी आधी कुठे लिहिली होती का माबोवर? वाचल्यासारखी वाटते खस्ता कचोरी.
खस्ता अस नाव का असत ????
खस्ता अस नाव का असत ????
रेसीपी आधी कुठे लिहिली होती
रेसीपी आधी कुठे लिहिली होती का माबोवर? वाचल्यासारखी वाटते खस्ता कचोरी.>> मि पण वाचली आहे.
अभिनंदन... वहीनींचे पण !
अभिनंदन... वहीनींचे पण !
सुलेखाताई एकदम झकास दिसतेय
सुलेखाताई एकदम झकास दिसतेय कचोरी. तुमचे आणी तुमच्या वहिनीन्चे अभिनन्दन. कृती एकदम सुटसुटीत मस्त!
मनःस्विनीने पण लिहीलीय खस्ता कचोरी. शोधा आता तिची पण.
खुप 'खस्ता' खायची तयारी
खुप 'खस्ता' खायची तयारी नसल्याने डेक्कनजवळच्या शेगावच्या कचो-या आणून खाल्ल्या... आता या नंतर कधीतरी.
अभिनंदन सुलेखा, वहिनीचेपण.
अभिनंदन सुलेखा, वहिनीचेपण.
छान दिसतेय कचोरी.
छान दिसतेय कचोरी.
वा! मस्त अभिनंदन! रेसिपी
वा! मस्त अभिनंदन! रेसिपी नक्की करुन पाहाणार. जमले तर वहिनीची पण रेसिपी टाका.
मस्त!
मस्त!
पाककृती आणि फोटो, दोन्ही
पाककृती आणि फोटो, दोन्ही मस्तं!
सारण फारच चवदार वाटतंय. तळण करायचं नसेल तर हे भरून पराठे करता येतील.
मुद्देसुद लिखआन ! कचोरी
मुद्देसुद लिखआन ! कचोरी चविश्त चतनी .रेचिपी आव्दली.
वाह! सुलेखा किती सुंदर
वाह! सुलेखा किती सुंदर दिसतायत कचोर्या...
मस्त दिसताहेत कचो-या...
मस्त दिसताहेत कचो-या... खावेश्या वाटणा-या.
खस्ता अस नाव का असत ????
पदार्थाच्या मागे लावलेला हा शब्द मराठी नाहीय. हिंदी खस्ता म्हणजे मराठीत खुसखुशीत. मराठीत खस्ता म्हणजे हिंदीत जे काय असेल ते.... मला आठवत नाहीय नेमका शब्द आता आणि ज्यांनी काढल्यात त्यांना हिंदीत माहित नस्सले तरी काही फरक पडत नाही, मराठीतल्या खस्ता काढुनच दमतात बाया इथे.
पदार्थ खस्ता (हिंदीतला) व्हावा यासाठी खुपच खस्ता (मराठीतला) काढाव्या लागतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
हि रेसीपी आधी कुठे लिहिली होती का माबोवर? वाचल्यासारखी वाटते खस्ता कचोरी.
लो कॅलरी खस्ता कचोरी. मी केलीय ही आणि ही सुद्धा अतिशय सुंदर होते.
http://www.maayboli.com/node/8976
(मनु कुठे गेली कोण जाणे.. दिडेक वर्ष झाले असावे तिला गडपुन.)
साधना.. खस्ता .. अगदी
साधना.. खस्ता ..
अगदी खर्र्य!!!
वाह..सुलेखा... एकदम बढिया.. इंदौर-उज्जैन ची याद कसोशीने आली>>>>>>>>>
आणी तुझं आणी तुझ्या वहिनीचं खूप अभिनंदन!!!!!!!!!
मस्त रेसिपी. तुझं आणी तुझ्या
मस्त रेसिपी. तुझं आणी तुझ्या वहिनीचं अभिनंदन!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पदार्थ खस्ता (हिंदीतला) व्हावा यासाठी खुपच खस्ता (मराठीतला) काढाव्या लागतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.>