२ कप जुना तांदूळ (बासमतीच घ्यावा असे काही नाही आंबेमोहर किंवा कोलम पण चालेल)
१ १/४ वाटी मोड आणून सोललेले वाल
२ कप उभा चिरलेला कांदा
१ कप चिरलेला टोमाटो
ठेचलेला लसुन १ टीस्पून
राई १ टीस्पून
जिरे १ टीस्पून
हिंगे १/४ टीस्पून
हळद १/२ टीस्पून
मसाला ४/५ टीस्पून
गोडा मसाला २ टीस्पून
तेल ५/६ टीस्पून
गरम पाणी ४/५ कप
मीठ चवीनुसार
कोथिंबीर आणि खवलेले ओले खोबरे सजावटीसाठी
१.तांदूळ आणि वाल धुवून बाजूला ठेवावेत
२.एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी ती तडतडली की त्यात जीरे लसुन कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा
३. नंतर त्यात हळद हिंग आणि मसाला टाकून परतावा, त्यात वाल टोमाटो आणि गोडा मसाला टाकून परतून घ्यावे
४. नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा परतून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून १५/२० मिनिटे भात शिजवून घ्यावा
५. नंतर हलक्या हाताने हलवून दोन वाफा काढाव्यात खिचडी तयार.
६. वरून कोथिंबीर खोबरे आणि थोडेसे तूप घालून गरमागरम वाढावी.
अस्सल कोकणी चवीसाठी २ कप पाणी आणि २ कप नारळाचे दुध वापरावे
मस्त......
मस्त......
मस्त आहे. आम्ही ह्याला
मस्त आहे. आम्ही ह्याला डाळिंबे भात म्हणतो ( वालाला डाळींब्या म्हणतो म्हणून), मी कांदा-टोमाटो नाही घालत.
अहाहा चविष्ट लागत असेल गं!
अहाहा चविष्ट लागत असेल गं! बघतेच करून...
वाल थोडे कडवे असतात म्हणून
वाल थोडे कडवे असतात म्हणून भात शिजल्यावर त्यात थोडासा गुळ टाकून निट हलवून घेऊन दोन वाफा काढाव्यात गुळाच्या गोडीने अजून चविष्ट लागते
छान फोटो टाक ना
छान फोटो टाक ना
अरे इथे फोटो कसा टाकायचा ते
अरे इथे फोटो कसा टाकायचा ते नाही कळत आहे
अहाहा चविष्ट लागत असेल गं!
अहाहा चविष्ट लागत असेल गं! बघतेच करून... >>>>>>> नक्कीच बघ करून
नारळाचे दूध हवेच. त्याने छान
नारळाचे दूध हवेच. त्याने छान चव येते.
यस, मस्त रेसिपी... खुप सा-या
यस, मस्त रेसिपी... खुप सा-या सुंदर आठवणींची!! धन्यवाद..
आमच्याकडे पण असाच करतात. फक्त
आमच्याकडे पण असाच करतात. फक्त टोमॅटो घालत नाही. श्रावणी शनिवारी/सोमवारी केला तर कांदा घालत नाही. तोंपासु...आता लवकर करावाच लागणार.