Submitted by अनन्या वर्तक on 16 January, 2014 - 10:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
Ground Chicken
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
आले लसूण पेस्ट
क्रमवार पाककृती:
वरील सर्व घटक चांगले मिक्स करावेत. भांड्यात तेल घेवून त्यात वरील मिश्रण stir fry करून घ्यावे आणि त्यात काळेमिरी आणि मीठ तुमच्या आवडी प्रमाणे घालावे.
आवरणासाठी:
मैद्या मध्ये मीठ घालून कणिक मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्याव्यात. त्यात हे मिश्रण करंजीसारखे भरावे आणि बंद करावे. बांबू स्टीमर असल्यास त्यात हे Dumplings ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी.
हे Dumplings टोमॅटो, तीळ, लाल मिरची आणि लसूण यांच्या चटणी बरोबर खावे.
English शब्दांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए त्यामुळे क्षमस्व.
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व.
Dumplings चे सगळे श्रेय आकाश ला आणि त्याच्या मदतीला.
माहितीचा स्रोत:
ऑफिस मधील मैत्रीण आणि YouTube
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
मस्त फोटो. रेसिपीही सोपी
मस्त फोटो.
रेसिपीही सोपी वाटते आहे. मैद्याची कव्हरं तयारही मिळतात ओरिएन्टल मार्केट्समधे.
वाफवताना ती लेट्यूसची पानं घातलीत का खाली?
मस्त आहे रेसिपी. ग्राउंड चिकन
मस्त आहे रेसिपी. ग्राउंड चिकन म्हणजे प्री कुक्ड घेतलेय का ? कच्च खीमा मिळतो तसा नाही दिसत आहे...
एम्टी, तिने स्टर फ्राय करून
एम्टी, तिने स्टर फ्राय करून घ्यायला सांगितलंय ना सारण?
wow काय सही दिसतय चविष्ट
wow
काय सही दिसतय
चविष्ट पाकृ
स्वाती हो वाफवताना मी
स्वाती हो वाफवताना मी लेट्यूसची पानं ठेवली आहेत Dumpling सहज काढता यावेत म्हणून. केळीच्या किवा हळदीच्या पानांनी अजून चांगला सुगंध आला असता.
मैत्रॆयि मी स्टर फ्राय करून घेतलं आहे सारण. खाताना मनात शंका नको म्हणून.
जाई धन्यवाद.
मस्त फोटो. मला स्वतःला चिकन
मस्त फोटो.
मला स्वतःला चिकन डम्पलिंग /मोमो पेक्षा व्हेज जास्त आवडतात. इथे बाहेर पण बर्याच ठिकाणी त्या बांबूच्या स्टीमरमध्ये लेट्युसची पानं ठेवून त्यावर वाफवून देतात.
वॉव! सोपी रेसिपी आणि मस्त
वॉव! सोपी रेसिपी आणि मस्त फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डम्पलिंग्ज् चा आकार फार सुरेख जमला आहे ..
लवली!!!!!
लवली!!!!!
मस्त फोटो. बाम्बू स्टीमर
मस्त फोटो. बाम्बू स्टीमर शोधला पाहिजे.
मस्त रेसिपी आणि फोटो. कधितरी
मस्त रेसिपी आणि फोटो. कधितरी करणार. बांबू स्टीमर आणायचीच खोटी आहे फक्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाककृती आणि फोटो दोन्ही फार
पाककृती आणि फोटो दोन्ही फार आवडलं.
बांबू स्टिमर नसेल तर चाळणीत
बांबू स्टिमर नसेल तर चाळणीत किंवा इलेक्ट्रिक स्टिमरमध्ये पण येतिल की वाफवता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठल्याही ओरिएन्टल
कुठल्याही ओरिएन्टल ग्रोसरीच्या दुकानात बांबू स्टीमर मिळेल.
मृण्मयी मला World Market
मृण्मयी मला World Market मध्ये मिळाले. Bed Bath & Beyond मध्ये सुधा पहिले आहे मी.
ओके ंर आणि अल्पना. विचारायला
ओके ंर आणि अल्पना.
विचारायला भिती वाटते आहे पण तरी विचारतेच. मैद्याऐवजी तांदूळाचं पीठ किंवा गव्हाचं वापरता येइल का?
अल्पना बरोबर आहे कोणताही
अल्पना बरोबर आहे कोणताही स्टिमर चालेल फक्त सहज काढता यावेत म्हणून पाने ठेवावी लागतील.
>> मैद्याऐवजी तांदूळाचं पीठ
>> मैद्याऐवजी तांदूळाचं पीठ किंवा गव्हाचं वापरता येइल का?
मी असते तर उकडीच्या मोदकांनां ही मैदा वापरावा असं वाटलं असतं सोपं जावं म्हणून ..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शूम्पी तांदूळाच्या पीठाची
शूम्पी तांदूळाच्या पीठाची कल्पना नाही मला पण मी गव्हाचं पीठ वापरून करणार आहे. मैद्याऐवजी Whole Wheat कधीही चांगले.
मस्त फोटो आहे एकदम.
मस्त फोटो आहे एकदम. डंपलिंग्जचा आकार मस्त जमलाय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चिकन ऐवजी उकडलेले बटाटे चालतील का? हा नेहमीचा प्रश्न यायचाच आहे अजून
एकदम सुबक झालेत डंपलिंग्ज!
एकदम सुबक झालेत डंपलिंग्ज!
व्हेजी डंपलिंग्स पण असतात
व्हेजी डंपलिंग्स पण असतात म्हणून बटाट्याचा प्रश्न येइल असं वाटत नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तं रेसिपी आणि फोटो !!
मस्तं रेसिपी आणि फोटो !!
वॉव मस्त फोटो आणि
वॉव मस्त फोटो आणि रेसिपी.
बाम्बू स्टीमर आहे घरात. उगाचच आणुन ठेवला होता, आता त्याचा योग्य उपयोग करुन बघावा!
.
.
व्हेजी डंपलींगमध्ये बटाटा नका
व्हेजी डंपलींगमध्ये बटाटा नका घालू. त्यात पत्ता कोबी आणि गाजराचं मिश्रण घाला. फ्लॉवर /ब्रोकली पण चालेल.
मी एकदा मश्रुम्सचे पण खाल्ले होते डंपलींग्ज्स. पण नेहेमीचे बटन मश्रुम न वापरता त्यात कोणतेतरी सुके मश्रुम वापरले होते, त्याची चव बेक्कार होती.
http://www.maayboli.com/node/19947
http://www.maayboli.com/node/40996
इथे पण आहेत थोडे वेगळे प्रकर. प्राचीची रेसेपी व्हेज आहे.
तोंपासु आहे अगदी मस्तच धन्सच
तोंपासु आहे अगदी
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
धन्सच
आकाश कोण? ते पण ओरिएन्टल
आकाश कोण? ते पण ओरिएन्टल मार्केटात मिळतात का? <<< हाच प्रश्न पडला होता :))
एकदम मस्त पाककृती. आजच करणार! श्रिम्पचे.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
मस्त रेसिपी आणी फोटो. सशल +१
मस्त रेसिपी आणी फोटो.
सशल +१ मलाही उकडीचे मोदक करताना असच वाटतं मैदा वापरला तर मस्त झटपट मोदक होतील.
शूम्पी रान्च ९९ आणि वॉलमार्ट मध्येही आही बांबू स्टीमर. मी आणतेच आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages