ज्वारीची पाच कणसे
उसाचे कर्वे
लाल मुळा
बीट
कांदा
मुळा
मावळी काकडी
गाजर
लिंबू
मिरच्या (तिखट)
हरभर्याचे दाणे
लसूण पाकळ्या
टोमॅटो
मीठ
(ही पाककृती - ? - पूर्णपणे मीच केलेली आहे).
१. लाल मुळा, बीट, मुळा, मावळी काकडी (सालासकट), गाजर, कांदा, टोमॅटो व ऊस ह्यांच्या गोल चकत्या करून त्यावर भरपूर लिंबू पिळून मीठ भुरभुरावे. या सर्वांमधून लिंबू व मीठामुळे निघणारा ज्यूस अत्यंत गुणकारी असतो हे वेगळेच.
२. मिरच्या भाजून त्यांचे बारीक काप त्यावर पेरावेत.
३. लसणाच्या पाकळ्या अॅड कराव्यात.
४. मी पापड भाजले / तळले नाहीत, पण हवे असल्यास तेही अॅड करू शकता.
५. हे सगळे झाल्यावर मग ज्वारीची कणसे खमंग वास येईपर्यंत भाजावीत.
६. ती कणसे कुस्करून ते दाणे एका वेगळ्या बोलमध्ये घ्यावेत.
७. सायमल्टेनियसली हरभर्याचे दाणे (हवे असल्यास) भाजून घ्यावेत.
८. माझ्याकडे आत्ता गवती चहा आहे, हे खायला बसतानाच आधण ठेवावे. गवती चहा नसल्यास सुंठ पूड घालून चहा करावा.
एकुण काय!
उपास कसले करता पुण्यासाठी
चोचल्यांत येते मोक्षाचीच प्रचीती
आणखी एक चोचले पुरवणारी व गुणकारी अशी ही पाककृती असून लहानमोठ्या सर्वांना आवडावी. ताजे घट्ट दही त्यासोबत खाल्यास अधिक उत्तम!
सर्वांना बेमिसाल हुरडा खाण्यासाठी शुभेच्छा!
१. कच्ची कंदमुळे आणि भाजलेली कणसे असल्याने वजन वाढण्याची भीती अजिबात नाही.
२. चव व आरोग्य दोन्हीची काळजी घेणारी पाककृती
३. प्रक्रिया जवळपास नाहीतच.
४. दिसायला आकर्षक! पार्टीमधील मेन कोर्सआधी गेस्ट्सना इंप्रेस करण्यास एक चांगली कृती!
Mastach
Mastach
प्रत्येक व्यासंगी लेखक हळूहळू
प्रत्येक व्यासंगी लेखक हळूहळू पाककृतींकडे वळतो की काय अशी शंका यायला आत्तापर्यंत भरपूर वाव झालेला आहे
एनीवे, जबराट!
मस्तच. काय एकेक पदार्थ करताय
मस्तच. काय एकेक पदार्थ करताय हटके. आमच्याकडे ज्वारीची कणसे मिळतात का बघायला हवे, शक्यता कमी वाटते.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
वाह
वाह
चांगलय!
चांगलय!
बेफी?? ठीकैस ना???
बेफी?? ठीकैस ना??? एकापेक्षाएक पाकृज टाकतोयेस...
कणसं कुठे मिळतात ज्वारीची ?????
वाचतानाच तोंडाला पाणी सुटले
वाचतानाच तोंडाला पाणी सुटले
जियो बेफी! तुमचं लिखाण जितकं
जियो बेफी! तुमचं लिखाण जितकं नेटकं आहे,
(चविचं माहित नाही ;फिदी:)
तितकीच पाकृ ही नेटकेपणाने मांडली आहे
खायला कधी बोलवताय?
मस्त! हुरडा कुठून मिळवायचा
मस्त!
हुरडा कुठून मिळवायचा पण?
हे भाज्या कापून, चटपटीत करायच्या, कणसं भाजायची, जोडीला चहा .. पण खाताना नक्की कसं खायचं ह्याबद्दल सूचना नाहीत का?
पार्ल्यात ह्या कणसांचे दाणे काढून मिळतात ह्या सीझनमध्य ते बघितलं आहे .. ह्या सर्व भाज्या, उस ते दाणे भाजून अथवा हलके स्टीम करून त्यावर घालून खाल्ल्या तर?
शेर (?) ही भलताच आवडला ..
बेफ़िकीर, नक्की करून बघणार.
बेफ़िकीर, नक्की करून बघणार. काल ज्वारीची कणस पाहिली पण ती कशाला वापरतात ह्याचा विचार करत होती. खर तर ते काय आहे ते समजल नव्हत आता फोटो पाहिला आणि समजल.
आज नक्की घेऊन येते. मकासारखी डायरेक्ट गॅसवर भाजायची का??
सुपर!
सुपर!
>> चोचल्यांत येते मोक्षाचीच
>> चोचल्यांत येते मोक्षाचीच प्रचीती
Couldn't agree more!
इथे काही ज्वारीची कणसं मिळायला नाहीत, तेव्हा फोटोंची तारीफ करून गप्प बसावं झालं.
सध्या हुरडा पार्टीला ग्लॅमर
सध्या हुरडा पार्टीला ग्लॅमर आले आहे. त्यामुळे पुण्यातही बरेच ठिकाणी ज्वारीचे कोवळे दाणे मिळतात.
मी ते दाणे भाजून, त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ घालून, लिंबू पिळून कालवले. वरून बारिक शेव भुरभुरली. सुंदर लागते.
~साक्षी
बेफी, कधी येउ खायला?
बेफी, कधी येउ खायला?
खमंग !
खमंग !
बेमिसाल हुरडा!! करून पाहायला
बेमिसाल हुरडा!! करून पाहायला हरकत नाही हि पाककृती.. पण हि ज्वारीची कणसं मुंबईत कुठे मिळतील ते शोधावं लागेल.. बाकी पाककृती तर उत्तम वाटली..
मस्त झालाय हुरडा.
मस्त झालाय हुरडा.
आमच्याकडे आहे ज्वारीचं शेत पण हुरडा नाही झाला अजून. आम्ही शेतातच विस्तव करतो कणसं भाजण्यासाठी मग हुरडा आणि सालापूरची शेगदाणा चटणी काय मस्त लागतं
जबरी! फोटो मस्त्च! हुरडा खाउन
जबरी! फोटो मस्त्च! हुरडा खाउन कितितरी वर्श झाली