वेकापा -१ : बटाट्याचा कीस

Submitted by मृण्मयी on 10 January, 2014 - 19:55
batatakees hashbrown
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेल
मीठ
जिरं
तिखट
हिरव्या मिर्च्या
लिंबूरस (ऐच्छिक)
कोथिंबीर
हॅशब्राऊन बटाट्याचा कीस
भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट

baTaTakees-hashbrown-tayaareemaaybolee.jpg

क्रमवार पाककृती: 

वेकापा म्हणजे वेळात(वेळ) काढून पाककृती. या छापाच्या पाककृती गुच्छातलं हे पहिलं फूल! Proud या मालिकेत बरेचसे घटक अर्धे प्रोसेस्ड असणार आहेत. म्हणून ऐनवेळी, किंवा कमी वेळात होणार्‍या पाककृती असतील.

-हॅशब्राउन पोटॅटोजच्या डब्यात कढत पाणी ओतून डबा बाईंडर क्लिप किंवा यूपिन्स वापरून १५ मिनिटं बंद करून ठेवावा. एवढ्या वेळात बाकीची तयारी करता येते.

-शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून कूट करून घ्यावा.

-कढईत तेल गरम करून मिर्च्यांचे तुकडे आणि जिरे घालावे.

-जिरे तडतडत असताना एकीकडे एका मोठ्या गाळणीत बटाट्याचा कीस काढून घ्यावा. अतिरिक्त पाणी निघून जाऊ द्यावं.

- (हवी असेल तर) फोडणीच्या तेलात लाल तिखट पूड घालावी. त्यावर लागलीच गाळणीतला कीस घालावा.

-दाण्याचा कूट घालून परतावं.

-लिंबाचा रस आणि आवश्यक वाटलं तर मीठ घालावं.

-कोथिंबीर, खवलेला नारळ घालून खावं.

baTaTakees-hashbrown-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ जणांना भरपूर होतो.
अधिक टिपा: 

-पाककृतीत नवं काहीही नाही. फक्त या पाककृतीत वापरलेले २ घटक, हॅशब्राऊन बटाट्यांचा सुका कीस आणि सालं काढलेले-खारवून भाजलेले शेंगदाणे, वेळेची बचत करणारे आहेत.

-एक्झॅक्टली याच कंपन्यांचे, हेच घटक वापरून करणार्‍यांसाठी...
* हॅश ब्राउन बटाट्यांमधे थोडं मीठ आहे असं वाटतं. कर्कलंडच्या शेंगदाण्यात नक्कीच भरपूर आहे. तेव्हा चव घेऊन, मिठाचा अंदाज आल्यावर वरून मीठ घालावं.

-कीस कोरडा वाटला तर पाण्याचा शिपका देऊन, झाकण ठेवून ५ मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावं.

-डब्यात घालायचं पाणी मायक्रोवेव्हमधे ३ मिनिटात गरम होतं.

-एकूण पाककृतीला, कीस भिजण्यापुरता १५ मिनिटं आणि फोडणीत परतून वर ५ मिनिटं, इतकाच वेळ लागतो.

-सगळं प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येतं.

माहितीचा स्रोत: 
आयडिया: श्रीयुत मृण्मयी, प्रत्यक्ष कृती : मृण्मयी
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डब्यात घालायचं पाणी मायक्रोवेव्हमधे ३ मिनिटात गरम होतं.>>> Lol

हॅश ब्राऊन बटाट्याऐवजी इथली रताळी किसून वापर्ली तर चालतील का?

मला ही डिश प्रचंड आवडते
मी शाळेत असताना एका मैत्रिणीकडे खाल्लेली
पण आमच्याकडे बनत नाही Sad
उन्हाळी वाळवणात जो खीस केला जातो तो पण चालतो या पाकृ मध्ये

नाहीच राहावलं मला. आज जेवणात केलाच ह्यासारखा उद्योग. मी कच्चे बटाटे किसून घेतले सगळ त्यात मिक्स करून हॅश्ब्राऊन टाईप लावलं तव्यावर. मस्त झालं होतं. साईडडिश म्हणून बरं लागलं

मी उगाच इतकी वर्ष बटाटे किसून करतेय कीस.. हॅशब्राऊन प्रकरण मला माहितच नव्हतं. कधीतरी ट्राय करेन, आमच्याकडे फार आवडता नाही कुणाचा.
कर्कलँडचे अनसॉल्टेड शेंगदाणे नाहीच आहेत बहुतेक!!

आमच्याकडे ओला किस मिळतो. पण असा हॅशब्राऊन बटाट्यांचा सुका कीस मिळतो हे माहीत नव्हते. हा असा बॉक्स कुठल्या सेक्शनला मिळतो? याचा बटाट्याचा चिवडा होईल का?

सगळ्यांना धन्यवाद!

मंजूडे, चालतील. रताळ्याचा कीस झकासच लागतो. पण रताळी किसण्यात वेळ जाईल. मग ती वेखाप होईल Happy

>>उन्हाळी वाळवणात जो खीस केला जातो तो पण चालतो या पाकृ मध्ये
रिया, आयडिया मस्तंय.

विद्या, आता नक्की आठवत नाही, पण कॉस्टकोत कॅन्ड गुड्सच्या आयलमधे किंवा तिथेच जवळपास डबे असतात. ( एका पुडक्यात ८ डबे)

योगेश, वयपरत्त्वे पोटाची औकात बदलते. त्यानुसार पदार्थ होतात. तेच इथे टाकले जातात. Proud

छान आहे.

रिया, उन्हाळ्यात जो साठवणीचा बटाट्याचा कीस करतातना, माझी आई नेहमी त्याचाच वरीलप्रमाणे कीस करते, तेलाच्या ऐवजी तूप वापरते आणि घरचा कीस आमच्याकडचा जास्त जाड नसतो म्हणून थोडे कोमट पाणी घालून थोडा वेळ भिजवते.

कीस व शेंगदाणे मिळून एकूण किती सोडिअम पर सर्विंग होते हे ही चेक करून घ्या. जि तका जास्त प्रोसेस्ड पदार्थ तितके इतर घटक जास्त. रागवू नका. उच्च रक्तदाबाचा त्रास होउ नये म्हणून लिहीले आहे.

असा बटाट्याचा कीस मिळतो हे माहितीच नव्हतं. पुढल्या वेळी आणेन.

कॉस्टकोतले ते दाणे मात्र फार भारी आहेत. व्हर्जिनिया नट्स ना?

अमा, नाही रागवत! Proud तुमचं बरोबर आहे. मीठ जपून खातो. Happy

अशा विविध वस्तुंची माहिती करून घ्यायला तुम्ही कॉस्टकोत नुस्तंच फिरायला जात नाही का? Proud दरवेळी नव्या वस्तू दिस्तात.

>>व्हर्जिनिया नट्स ना? Lol
असतील असतील. डब्यावर लिहिलंय बहुतेक.

मी लास्ट वीक मध्येच हा किस आमच्या कॉस्टको मध्ये पाहिलेला. पण हे लक्षात आल नव्हतं करता येईल अस. आणीन आता तो पॅक.

I love batatyacha kis Happy
but i dont know how to make it.

ayta milala tar basach Happy

भारतात वाळावलेला बटाट्याचा किस वापरून आई नेहेमी करायची हा प्रकार. मस्त लागतो.
इकडे बघते असले काही मिळते का.

पण चार पाच बटाटे अगदी तेंव्हाच्या तेंव्हा किसायला असा कितीसा वेळ जातो?

कृती छान आहे पण मला किस विकतचा हे प्रकरण पटले नाही.

mi asa fresh surnancha karte. karan batata varjya ahe navryala. n shegdana kut thodese vaprate.