मासिक भविष्य जानेवारी २०१४

Submitted by पशुपति on 31 December, 2013 - 10:06

सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा!!!!

राशिभविष्य
जानेवारी २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्मरास व लग्नरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तरअशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष: ह्या महिन्याच्या सुरुवातीला केतू मेष राशीत, पंचमेशरवि नवम स्थानी. त्यामुळे ज्या लोकांना अध्यात्माची आवड आहे त्यांना मन:शांतीच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगला आहे. दशमातील शुक्र कलाकारांना देखील तेवढाच चांगला आहे. कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळण्याची बरीच शक्यता आहे. ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, अश्या लोकांना देखील प्रसिद्धी मिळू शकते. सप्तमातील शनि-राहू कुटुंबासंबंधी संमिश्र फळे देतील.तरीही सनातनी पद्धतींचा रोमान्स करायला हरकत नाही.षष्ठातील मंगळ काहींना उष्णतेचे विकार देण्याची शक्यता आहे. तरीही विकाराची तीव्रता बरीच कमी राहील.१६ तारखेनंतर रवि आणि बुध हे दोन्ही ग्रह दशमात असल्याने नोकरी अगर बिझिनेसमध्ये चलती राहील. ज्यांचाकार्यक्रमव्यवस्थापनहा व्यवसाय असेल त्यांना हा काळ अतिशय उत्तम आहे. व्यवसाय मिळवण्यासाठी थोडी धावपळ केल्यास बऱ्याच संधी उपलब्ध होतील. चंद्रामुळे घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहील.

वृषभ:द्वितीयेतील गुरु आणि षष्ठातील शनि हे दोन्ही ग्रह तुम्हाला कर्जाद्वारे भरपूर पैसे मिळवून देतील. काहींच्या बाबतीत कुटुंबामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. ह्या पंधरवड्यात ज्यांना शेअर देवाण-घेवाणीची आवड आहे, त्यांनी शक्यतो शेअर खरेदी-विक्री पासून लांबच राहावे.....फटका बसण्याची शक्यता आहे!! मुलांच्या अभ्यासाबाबतीतहा महिना चांगला राहील. अनेकांच्या बाबतीत कौटुंबिक सुसंवाद राहील. दुसऱ्या पंधरवड्यात देखील पैशांची आवक चालूच राहील. ह्या पंधरवड्यात शेअरची खरेदी-विक्री सावधपणे करण्यास हरकत नाही.षष्ठातील शनि मात्र, दीर्घ मुदतीचे आजार असणाऱ्यांना, त्रासदायक होण्याची शक्यता आहे. अनेकांना लांबच्या प्रवासाचे योग येतील, तेव्हा तयारीत राहा!! बाराव्या स्थानातील मंगळाच्या राशीतील केतू देखील शेअरची खरेदी-विक्री सावधपणे करण्याचे सुचवतो. ज्यांनी दीर्घ मुदतीसाठी पैसे शेअरमध्ये गुंतवले असतील, त्यांच्यासाठीही त्याद्वारे पैसे मिळवण्याची सुसंधी आहे.

मिथुन:लग्नी गुरु वरून असे दिसते की मिथुन राशीच्या लोकांना घर, मुले आणि कुटुंब ह्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. सप्तम भावातीलतीन ग्रह, रवि, आणि बुध, ह्यांमुळे शेअरची खरेदी-विक्री करणाऱ्यांनी सावधान राहावे, शक्यतो दूरच राहिलेले उत्तम! पण ज्यांचा बिझिनेस आहे आणि पार्टनर म्हणून घरचीच व्यक्तिआहे त्यांना हा काळ लाभदायक ठरेल.पुढचा पंधरवडा नोकरी करणाऱ्यांना थोडा त्रासदायक जाईल, तेंव्हा सामंजस्याने वागणे इष्ट आहे!! लाभ स्थानातील केतू काही लोकांना आर्थिक फायदा करून देईल.विवाहेच्छूमंडळींचे विवाह ठरण्याचे योग देखील बरेच आहेत. ह्या महिन्यात कामाचा ताण बराच वाढणार आहे, तरी प्रकृतीची काळजी घ्यावी.

कर्क: ह्या राशीच्या लोकांना पहिल्या पंधरवड्यात घरगुती बाबतीत बरेच लक्ष घालावे लागेल आणित्याच संबंधी खर्च पण बराच होईल.चतुर्थातील शनि कर्क राशीच्या लोकांना प्रकृतीच्या दृष्टीने त्रासदायक होईल, तसेच जुनी दुखणी देखील डोके वर काढतील. तरी प्रकृती दृष्ट्याट सावधगिरी बाळगावी.षष्ठातील तीन ग्रह,रवि, चंद्र, बुध, प्रकृतीच्या बाबतीत संमिश्र राहतील. मात्र, आर्थिकदृष्ट्या उत्तम फळे देतील. ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी विशेषकाळजी घ्यावी.दुसऱ्या पंधरवड्यात रवि आणि बुध षष्ठातून सप्तमात जातात. ज्यांची सरकारी कामे रेंगाळली असतील ती मार्गी लागतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे!! शेवटच्या आठवड्यात शक्यतो प्रवास टाळावा. लेखकांना देखील लेख प्रसिध्द होण्याच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.पंचमेश मंगळ चंद्राच्या लाभत असल्याने कलाकार मंडळींना देखील हा काळ चांगला जाईल.

सिंह:ह्या पंधरवड्यात आपली प्रकृती उत्तम राहण्याची चिन्हे आहेत. वैवाहिक सौख्य देखील उत्तम मिळेल. पंचम स्थान कार्यान्वित होत असल्याने जे पहिल्यापासून खेळात अगर कलेत-लेखनात आहेत, त्यांनायशस्वी होण्यासाठी उत्तम काळ आहे. ह्या संधीचा जरूर फायदा करून घ्यावा!द्वितीयेतील मंगळ सिंह राशीच्या लोकांना धन प्राप्तीचाउत्तम योग देत आहे.दुसऱ्या पंधरवड्यात ज्यांचा कमिशनसंबंधी स्वत:चा व्यवसाय आहे, त्यांना उत्तम काळ आहे, ऑर्डर्स भरपूर मिळतील. ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे, त्यांनी काळजी घेणे जरुरी आहे. नवमातील केतू अनेकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग आणेल.एकंदरीत, ही संक्रांत सिंह राशीच्या लोकांना उत्तम आहे असे दिसते. विशेषत: हा महिना स्त्रियांना समाधान आणि आनंद देणारा ठरेल.

कन्या : पहिल्यापंधरवड्यात कामाचा ताण सांभाळून मुले-बाळे आणि कुटुंबीय ह्यांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखणार असे दिसते. शेअर खरेदी-विक्री करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी....धोका!! काही लोकांना ऑफिसमार्फत अगर व्यवसायामार्फत पैसे येणे अपेक्षित असेल तर थोडे थांबावे लागेल असे दिसते. अष्टमातील केतू मात्र काही लोकांना मानसिक ताण देईल असे वाटते. दुसऱ्या पंधरवड्यात शेअरमधून मिळकत होण्याचे बरेच चान्सेस आहेत. १६-१७ जानेवारी ह्या दोन दिवसांत शेअर खरेदी-विक्री केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र लक्षपूर्वक व्यवहार करावा. कामाचा ताण मात्र ह्याही पंधरवड्यात राहणार आहे. रेंगाळलेली कामेह्याही पंधरवड्यात मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत....तरी धीर धरावा !२३ जानेवारी नंतर मात्र पैशांची येणे वसुली होण्याची संभावना बरीच आहे. सर्वसाधारणपणे कन्या राशीला हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.

तूळ: ३ जानेवारीला चंद्र-मंगळ नवपंचम योग हा काहींच्या बाबतीत निश्चितपणे घरासंबंधी आनंददायी घटना देईल.बऱ्याच लोकांना छोटे-मोठे प्रवास घडतील असे दिसते.काही लोकांचा धार्मिक कारणासाठी प्रवास घडेल. १८-१९ अथवा २६ जानेवारीच्या सुमारास व्यवसायामार्फत आर्थिकलाभ होण्याची शक्यता खूप आहे. काही मंडळी नवीन घर घेण्याच्या विचारात असतील.तूळ राशीतील शनि, राहूमुळेकाही लोकांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता दिसते.ह्या महिन्यात कौटुंबिक मतभेद होण्याची पण बरीच शक्यता आहे.

वृश्चिक:वृश्चिक राशीला प्रवासातून धन प्राप्तीचे योग आहेत. ह्याचा अर्थ, जी मंडळी एम. आर., कमिशनएजंट, प्रकाशक इ. आहेत किंवा ज्यांचा व्यवसाय असून त्याचे कस्टमर वेगवेगळ्या गावी असतात, अश्या लोकांना जितका प्रवास जास्त होईल तितका बिझिनेसच्या दृष्टीने लाभदायक. ज्या लोकांना घर विकायचे किंवा खरेदी करायचे असेल त्यांनी हा महिना तरी थांबणे आवश्यक आहे,नाहीतर सौदा मनासारखा होणार नाही.होमफ्रंटवर वातावरण छान राहिल, त्यामुळे साधारणपणे हा महिना आनंदी जाईल. जे नोकरी करतात त्यांना हा महिना उत्तम जाईल.काहींनाप्रमोशनचे पण चान्सेस आहेत. दुसरा पंधरवडा पण तितकाच चांगला जाईल...कदाचित त्यापेक्षा ही जास्त चांगला जाईल. छोटे-मोठे प्रवास, पैशाची आवक, आनंदी घरगुती वातावरण...क्या बात है!!!

धनु:धनु राशीच्या लोकांना ह्या महिन्यात धन प्राप्ती बरीच होईल तसाच खर्च पण बराच होईल....एकूण गोळाबेरीज शून्य!! दशमातील मंगळ निश्चितपणे नोकरी करणाऱ्यांनाकेलेल्या कामाची वाखाणणी शाबासकी अथवा आर्थिक लाभ ह्या स्वरुपात करून देईल.धनु राशीचा स्वामी गुरु सप्तमात असल्याने घरगुती वातावरण देखील आनंदी राहील. (भूत प्रसन्न आहे...बायकांनो काय मागून घ्यायचे ते आत्ताच मागून घ्या!!!) तृतीयेतीलनेपच्यूनमुळे कामातील दगदग वाढेल, पण त्याच जोडीला लाभ देखील मिळेल. पुढच्या पंधरवड्यात देखील परिस्थिती चांगलीच असेल. कामाची दगदग पण तशीच राहील. एकुणात हा संपूर्ण महिनाच धनु राशीला चांगला जाईल.

मकर:ह्या राशीच्या लोकांना शनि, राहू दशम स्थानी असल्याने कामाचा त्रास वाढत जाऊन त्यांचा दर्जा देखील उंचावत राहील.काहींनाकामानिमित्त लांबच्या प्रवासाचा योग येईल.सर्वसाधारणपणे मुलांबरोबरसुसंवाद होण्याचा काळ आहे, तरी मकर राशीच्या लोकांनी ह्यासाठी पुढाकार घेऊन मुलांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. लहानमुलांच्यातरममाण होण्याच्यासुसंधीचे योग आहेत, मोठ्यामुलांबरोबर मित्रत्वाच्या नात्याने चर्चा करण्याचा चान्स नक्कीच घालवू नये!अध्यात्माची आवडअसणाऱ्यांना देखील हा काळ लाभदायक आहे, ध्यानधारणेत वेळ घालवल्यास त्याला नक्कीच लाभ होईल. ह्याचे कारण, अनुकूल लहरी अश्यावेळीतुमच्याअवतीभवती फिरत असतात.त्यावेळी ध्यानधारणा केल्यास तीव्रतेने परिणाम जाणवतात.१५जानेवारी नंतर काही लोकांना अचानक धन प्राप्तीचे योग आहेत.रवि तुमच्या राशीत आल्यामुळे तुमचे सोशलस्टेटस उंचावतराहील.षष्ठातील चंद्र काहींच्या बाबतीत किरकोळ आजारास कारणीभूत ठरेल.थोडक्यात, हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे.

कुंभ: कुंभ राशीला ह्या महिन्यात आर्थिक प्राप्तीचे उत्तम योग आहेत, त्याबरोबरच पैसे गमावण्याची पण शक्यताआहे.शिवाय ह्याच काळात बऱ्याचलोकांना घर घेण्याचे पण योग आहेत. अश्यांनी मिळालेले पैसे घरामध्येच गुंतवल्यास नुकसान होण्याची शक्यता बरीच कमी होईल.नवमातील शनि-राहू मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे सुचवतात.१७ते २० तारखेच्या सुमारास काही लोकांना सर्दी-खोकला, ताप ह्या सारखे छोटे विकार त्रास देण्याची शक्यताआहे, तरीह्या दिवसांत तब्येतीचीजास्त काळजी घ्यावी.२१ ते २५ तारखेच्या सुमारास वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. नोकरीमध्येबऱ्याच लोकांना कामाचा ताण जाणवेल.वरिष्ठांशी नमते घेणेच श्रेयस्कर!! शेवटच्या आठवड्यात जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, काळजी घ्यावी. ( जोडीदारापुढे लोटांगण घालण्यापेक्षा आवश्यक तिथे मौन व्रत धारण केल्यास उत्तमच...मौनंसर्वार्थ साधनं.....!)

मीन:मीन राशीचा स्वामी गुरु चतुर्थात वक्री असल्यानेकाही लोकांना घरासंबंधी संमिश्र अनुभव देणार आहे. म्हणजेच एका बाजूला घरगुती बाबतीत काहींना अडचणी उद्भवतील त्याच सुमारासदुसऱ्या बाजूला आनंददायी घटना पण घडतील.शृंगार प्रधान लेखकांना हा महिना चांगला आहे. त्यांचे साहित्य प्रकाशित होण्याची बरीच शक्यता आहे. प्रयत्न करायला हरकत नाही.जोडीदाराशीकुरबुरी होण्याची शक्यता आहे. (उतारा म्हणून .... गरमागरम भाजी किंवा आईसक्रीमतयार ठेवावे!) संपूर्ण महिनाभर वाहन चालवताना काळजी घ्यावी.२४–२५जानेवारीलाजरा जास्तच काळजी घेणे आवश्यक आहे.नोकरी किंवा व्यवसाय असणाऱ्यांना उत्तम योग.....त्यांचा दर्जा वाढण्यासाठी योग्य काळ आहे.आर्थिक प्राप्ती देखील चांगलीच होईल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने आनंददायी काळ आहे.

माझ्या लेखाचे चांगले स्वागत केल्याबद्दल आणि सूचना व प्रतिक्रिया ह्याबद्दल अतिशय आभारी आहे. प्रतिक्रिया वाचताना मजा आली...म्हणूनच ह्या महिन्याचे भविष्य लिहायला उत्साह आला. अश्याच प्रतिक्रिया लिहित राहा...........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पशुपती अनेक धन्यवाद मासिक भविष्याबद्दल. तुम्हाला येणारे नवीन वर्ष खूप समाधानाचे आणी आरोग्याचे जावो.

राशीभाविष्यासाठी धन्यवाद!
नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

सर्वांना धन्यवाद............!!!!!!!!!!!!!!

राशी भविष्यासाठी धन्यवाद!

नवीन वर्षाच्या तुम्हालाहि शुभेच्छा !