अध्यात्म म्हणजे नेमके काय

Submitted by विनायक. दि.पत्की. on 31 December, 2013 - 01:58

.........प.पु. गुरुमाउली सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या उपदेशा नुसार मला समजलेले अध्यात्म ........
(१) सर्वसाधारण पणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म......१
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक.त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय. -2
(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजू घेणे व त्यावर (जन्म,मृत्यू,संकटे,आनंद,दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे,त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर वर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.-3
(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते,परस्थिती नुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-4
(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात .चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पुरतीचा मार्ग म्हणजे अध्यात्म....५

(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म.-६
(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान .तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षम पाने तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म-७ .
(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढावून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो .भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो .सुखी भावना जर सुखी करते तर सर्व च भावना सुखकारक करण्या साठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-८
(९) सत्य जाणून घेणे. वस्तू स्थिती हि सत्य व माया हि असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवशक असतेच म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.-९
(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते , अन्य कोठे हि नसते .नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढुन टाकायला शिकवणारे शास्त्र आणी मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते मग त्या आनुशंघाने परमेश्वराच्या सानिध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म -१०
(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो अशा द्वैता कडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही,केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेला च असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म
(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.

(१३) देह बुद्धीच्या पलीकडे जाणे/ स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रणमान असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म.देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे याने काही नुकसान न होता अध्यात्मा त प्रगतीचे असणारे पहिले महत्वाचे पाउल आहे..
(१४) मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म. अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे.प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे!

(१५) अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतुन ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दुर करण्याच्या प्रयत्नात असते आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे.पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मात हि प्रतिस्पर्धी हवा.
(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म.अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्या चे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.
(१७) वरील १६ व्याख्यांपैकी ................. काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे कि- ज्याला पैसा लागत नाही ते म्हणजे आध्यात्म..प.पु. ब्रम्ह चैतन्य.महाराज म्हणतात परमेश्वरावर विनाकारण प्रेम करायला पैसा लागतो का?..म्हणजे परमेश्वरावर अकारण प्रेम करणे म्हणजे अध्यात्म.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक केवळ प्रवचन ऐकतात वाचतात ब्रह्मचैतन्य काय किंवा इस्कॉन राधे कृष्णा काय सगळेच चांगलेच सांगतात. अध्यात्म ही आतून अनुभवायची गोष्ट आहे केवळ तोंडात सतत जय राम चा जप आणि गोंदवल्याच्या वाऱ्या ,स्टेटस ला त्याचे युट्यूब लिंका, फोटो ठेवून प्रत्यक्षात मनातून दुसऱ्यांचे वाईट चिंतण्यात आणि वृत्ती वाईट ठेवण्याने काही उपयोग नसतो .तो केवळ अध्यात्मिक शोऑफ असतो . जगात कुठूनही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला अध्यात्मिक अनुभूती येऊ शकते ,शांत राहूनही .उलट स्पिरिच्युअल एनलाईटमेंट साठी सततचा जपजाप मला इरिटेटिंग वाटतो.

हल्ली आध्यात्मात इंटरेस्ट वाटायला लागलाय पण सोप्या भाषेत आणि दैनंदिन आयुष्यात जे उपयोगी पडेल ते आध्यत्मिक साहित्य मिळतं कुठे, त्यातल्यात्यात माबोवर काहीजण चांगलं लिहितात .त्यातूनही मी ऑलमोस्ट नास्तिक त्यामुळे असल्या चर्चेत न पडलेलेच बरं.

ॐ नमो भगवतेवासुदेवाय हा मंत्रा मला सुट होतो असे लक्षात आलेले आहे. बऱ्यापैकी मन तंद्रीत जाते ( अगदी क्वचित.)

श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा मात्र फार त्रास होतो.

बाकी अशी Ditto तंद्री , आवडते पुस्तक वाचतानाही लागते. qualitative फरक शून्य.. जगाचे भान विसरणे, चिंता न आठवणे, मन पिसासारखे हलके होणे.
————
विष्णुसहस्रनामामुळे मटिरियस्टिक फायदा होतो असेही लक्षात आलेले आहे. meterialistic म्हणजे पैसे नाही तर कॉन्फिडेंस, लीडरशिप आणि चांगले भरभराटीचे क्षण. आहे तेच खूप आहे असे जाणवून देण्याची शक्ती विष्णू सहस्रनामात आहे हे. नक्की.

न च मात्सर्यम, न लोभो नाशुभा मती ……. हे खरे आहे.
———
दत्त गुरु यांच्या वाटेला ना जाणे माझ्याकरता श्रेयस्कर आहे असा अनुभव आहे.
————
गणपतीबाप्पा न्यूट्रल.
———-
जपजी साहिब एक फार आवडते. यू कॅन फील नानक तू बी ऍक्टिंग लाइक अ vessel फॉर some divine मेसेज. फार पॉवरफुल मंत्र/ पौरी आहेत.

Pages