डोसे

Submitted by Anvita on 26 December, 2013 - 23:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर

क्रमवार पाककृती: 

तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर हे सगळे जिन्नस एकत्र पाण्यात साधारण ६-७ तास भिजवायचे नंतर mixer मधून वाटायचे व हे पीठ fermentation करता झाकून ठेवून द्यायचे . साधारण ऋतूप्रमाणे ७-१२ तास लागतात ( म्हणजे थंडीत जास्त वेळ आणि उन्हाळ्यात कमी वेळ लागतो )
मग एकदा डोसा पीठ तयार झाले कि मग काय पटापट डोसे घालणे सुरु!
image.jpg

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात माझ्यामते ६-८ लोकांसाठी डोसे होतील .
अधिक टिपा: 

बरेच दिवस झाले घरी डोसे केले नव्हते त्यामुळे बरीच आरडाओरड झाली आता मात्र डोसे करणे भागच आहे असे कळल्यावर सकाळी १० च्या सुमारास भिजत टाकले आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास वाटले . दुसर्यादिवशी सकाळी breakfast ला डोसे तयार.
खरेतर सोपी गोष्ट आहे पण आठवणीने डाळ , तांदूळ भिजत घालणे विसरले जाते .

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांझु किती वाजता भिजत टाकले आहेस? पाच सहा तासांनी वाटून घेतलंस तरी हरकत नाही. पीठ एका मोठ्या उभ्या भांड्यात घालून घट्ट झाकण ठेव. तुझ्याकडे रात्री टेम्प फार कमी असेल तर ओव्हन्मधे ठेव ते भांडं.

थंडीच्या दिवसामधे रात्री डाळ तांदूळ भिजत घालायचे आणि मग सकाळी वाटून घ्यायचे. दिवसाचे टेम्प थोडे जास्त असल्याने व्यवस्थित पीठ आंबतं. मग ते फ्रीझमधे ठेवून हवं तसं वापरायचं.

सोडा रात्री टाकू नकोस. इडलीसाठी पीठ वाटताना त्यात थोडा तयार भात घाल. रात्री पीठ मिक्सरला वाटून झालं की त्यामधे बीटरने मस्तपैकी ताक घुसळवतो तसं घुसळव, याने पीठामधे हवा चांगली मिक्स होते आणि पीठ फुगतं. तेव्हाच मीठ पण घालून घे.

आता हे पीठ ओव्हनमधे ठेव आणि उद्या सकाळी इडली करण्याअधी पीठ किती फुगलंय बघ. दीड्पट वगैरे जरी फुगले असेल तरी प्रश्न नाही. एखादा साचा करून बघ. मग आवश्यकता वाटली तर थोड्याच पीठात सोडा घालून बघ. सोडा घालून केलेल्या इडल्या दडदडीत होतात असं ऐकलंय मी. मी कधी घालत नाही सोडा.

इडली-डोसे करताना फूग आणलेल्या पीठाची फूग अजिबात मोडू नकोस. हळूवार हाताने पीठ काढून घेशील.

अर्धा कांदा पिठात ठेवला तर पीठ अप्रतीम फरमेंट होतं. इडल्यांना अजिबात वास येत नाही कांद्याचा.
चिमूटभर एडिबल यिस्ट घातलं चमचाभर कोमट पाण्यातून तरी खूप मस्त होतं पीठ.
मी वरचे दोन्ही उपाय वापरते हल्ली. कधीच फसत नाही पीठ... नो रेडीमेड पीठ हल्ली. कान्ट बीट होममेड बॅटर..

इथे पाककृती मध्ये म्हणजे मजकुराच्या आत फोटो कसा द्यायचा ? प्रतिसादात देत येतोय पण वरती नाही काय करावे ?

अन्विता, मस्त झालेत डोसे...... .वर गानू आजोबांनी बेसन सांगीतले.... तसे वाह-रे-वाह च्या वेबसाईट वर रंग येण्यासाठी थोडी चणाडाळ टाकायची असे सांगीतले आहे. मी चणा डाळ भिजवायला विसरले तर बेसन घालते.

अन्विता, डोसे क्रिस्पी होतात का माहीत नाही, पण वाहरेवाह्च्या शेफने चवीसाठी, रंग ब्राउन येण्यासाठी वापरली आहे चणाडाळ. ही साईट पाहा.... http://www.youtube.com/watch?v=bp-YNd_4N04

सांझ, तिकडे युक्ती सांगा...मधेही लिहीले आहे......पिठ लवकर वर येण्यासाठी सुकलेल्या लाल मिरच्या वाटलेल्या पिठावर ठेवायच्या. पण खाली परात ठेवायला मात्र विसरु नकोस. कारण पिठ खुप फसफसुन येते आणी खाली ओघळते.
एक अजुन सुचना, हे असे पिठ इडली, उत्तपा साठी चांगले पण या पिठाचा डोसा चांगला होणार नाही.

हरभरा डाळीचं मला माहिती नव्हतं. मी परवा अप्प्यांसाठी पीठ भिजवलं होतं त्यातल्या उरलेल्या पिठाचे थोडं तांदळाचं पीठ घालून दोसे केले ते फारच सुंदर सोनेरी झाले होते. हरभरा डाळीमुळे असेल कदाचित.

आजपर्यंत कधीच हरभरा डाळ किंवा बेसन घातले नाही पण डोशांचा रंग कायम छानच येतो मला वाटते नित ferment झाले कि रंग छान येतो.मेथ्यांमुळे ते क्रिस्पी होत असावेत . वर नंदिनीने मेथ्यांमुळे रंग येतो असे लिहिले आहे कदाचित तसे असेल . पोह्यांमुळे fermentation चांगले होते असे वाटते.

उन्हाळ्याच्या दिवसात आमच्याकडे डोश्याच पीठ तव्यावर ओतल की त्यावर लगेच बारीक चिरलेला कांदा आणि कच्च जिर भुरभुरवून चमच्याने दाब देतात. मग तेल /लोणी /तूप लावायच आणि हव तर ती बाजूपण भाजून घ्यायची नाहीतर तसाच फोल्ड करायचा.
मी दोन्हि बाजूने भाजते आणि ते कुरकुरीत झालेल जिर खायला मजा येते. हा डोसा नुसता पण छान लागतो.
माझी आई चणाडाळ किंवा चटणीची डाळ वापरते.

काल केले या प्रमाणाने डोसे. मस्त झाले. धन्यवाद अन्विता.
पण बाहेरसारखे कुरकुरीत होण्यासाठी काय टीप?

Pages