यशस्वी होणे हे प्रत्येकाचेच ध्येय असते .पण फार थोडेच लोक आत्मचिंतन करून स्व:तच्या यशाचा खडतर मार्ग शोधून काढून त्या मार्गे जाऊनच यशस्वी होतात तेव्हा सर्वसामान्यत: यश हे सहजासहजी कोणालाच मिळत नसते,तसेच यशाची व्याख्या सुद्धा व्यक्तिपरत्वे,स्थाना परत्वे वेगवेगळी असू शकते.एवढे मात्र निश्चित आहे कि यशा साठी लढा प्रत्येकाला द्यावाच लागतो आणि हा लढा नेहमीच स्वकियांशीच म्हणजे स्वतः मधील दुर्गुण, अज्ञान यान्च्या विरोधात असलेला लढा असतो तेव्हा हा मार्ग चालू लागू या . यशस्वी होऊन इतरांना हि यशस्वी करू या .
यशाचा मार्ग मला दिसत नाही ,
कारण यशस्वी होण्याचे ठरत नाही.||
निर्धाराने मी ठाम बसत नाही,
आणि यश मजकडे फिरकत नाही.||
चिंतनाने जागवले महाभारत,
प्रथम भीमच आला बाहु सारत||
तुला जर यशस्वी व्हायचेच आहे ,
तर पुर्णारोग्य हाच पर्याय आहे ||
जर तु पूर्ण आरोग्य राखले,
तरच मिळतील यशाचे दाखले||
पुर्णारोग्याची खूण ती काय ?
समजाऊन मला तु सांगशील काय?
पाय गरम्,पोट नरम्,थंड माथा
हीच आहे पुर्णारोग्याची गाथा ||
मला तर लागले यशाचे पिसे
प्रश्न मला हे साधायचे कसे?
आरोग्य रूपी भीमाचा दावा
दहा टक्के तरी सुविचार हवा ||
त्यावर पंधरा टक्के सुवर्तन
नक्कीच करेल तुझ्यात परिवर्तन ||
सोबत असावे पंचेवीस टक्के विज्ञान ,
विज्ञानयुगात राहू नये अज्ञान||
येथे तुला अर्धे यश मिळेल ,
उर्वरित अध्यात्माने सिद्ध पावेल||
सुविचारी सहदेव सुरवातीला ,
सुवर्तनी नकुल सह सोबतीला ||
अर्जुन तर असे विज्ञान राज ,
आणि अध्यात्म असे धर्मराज ||
एक वासना शंभर विकार ,
आमुच्यापुढे घेती माघार ||
जेथे आम्ही नांदू एकत्र
यशच यश दिसेल सर्वत्र ||
(१०% सुविचार +१५% सुवर्तन +२५% विज्ञान +५०% अध्यात्म, यानेच १००%पूर्ण आरोग्य लाभते पुर्णारोग्य हेच यशस्वी जीवन होय ) (एक वासना ,शंभर विकार १०० कौरव आणि त्यांची १ भगिनी )
||यशस्वीभव, अर्थात यशाची पंच सूत्री||
Submitted by विनायक. दि.पत्की. on 21 December, 2013 - 03:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड !!! पटले !!! धन्यवाद
गुड !!!
पटले !!!
धन्यवाद
खुपच छान, खरेच चिन्तनाचा
खुपच छान,
खरेच चिन्तनाचा विषय.
मनोमन आवडले तुमच्या कल्पना थोड्या विस्तृत करता आल्या तर बरे होईल.
फारच छान. पटले. असे कधी होते
फारच छान. पटले.
असे कधी होते का की आरोग्य, ज्ञान विज्ञान या बाबतीत मी आहे तश्याच स्थितीला मी यश मानतो तेंव्हा मला आता काही करायला नको!
माझ्या मते तसे नसते. यशाच्या शिखरावर जर कधी पोचलात तर असे आढळून येईल की कोणत्याहि क्षणी,तुम्ही खाली घसरू शकता. म्हणून जीवंत आहे तोपर्यंत हा मार्ग चालूच ठेवायला पाहिजे. म्हणजे यश टिकावे म्हणून सुविचार इ. चालूच ठेवायला पाहिजे!
वैभव वसंतराव कुलकर्णी
वैभव वसंतराव कुलकर्णी ,विश्वयशश्री ,झ्क्की , सप्रेम नमस्कार आणि प्रतिसाद बद्दल आभारी आहे,
यशस्वीभव, अर्थात यशाची पंच सूत्री हे एक आत्मचिंतन आहे.
माझी संकल्पना अशी आहे कि प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचेच आहे.मी पहिले, मला नाही म्हणणारा कोणीही भेटला नाही .म्हणून माझे विचार मी सर्वत्र मांडू इच्छितो. यशस्वी व्हावयाचे असल्यास यशस्वी भव हा आशीर्वाद मिळणे आवशक आहे. .आशीर्वादाच्या वरदहस्ताला जी पाच मंगलमय बोटे आहेत त्यातच जीवनाच्या यशाचे रहस्य आहे.तर आरोग्य,सुविचार,सुवर्तन ,विज्ञान ,व अध्यात्म हीच ती पाच मंगलमय बोटे.
मनुष्याच्या मनात किमान १०% जर सुविचार असतील(मला यशस्वी व्हावयाचे आहे हाच तो १०% सुविचार) तर तो निश्चित यशस्वी होऊ शकतो .पण ज्याच्या जवळ आरोग्य आहे तो लवकर यशस्वी होतो.म्हणजे आरोग्य हेच यश असे म्हटल्यास वावगे होणार नाही.याचे इतिहासात उदाहरण आहे लोकमान्य टिळक जेव्हा देशसेवा करण्यास प्रवृत्त झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि आपली तब्बेत फारच अशक्त आहे तेव्हा त्यांनी प्रथम आपली तब्बेत मजबूत करण्याचे काम केले.म्हणून हे आरोग्य मिळवण्यास सुरवातीला किमान १०% सुविचारच कामी येतात कारण आजच्या धकधकीच्या काळात आपण आरोग्याचे सर्वच नियम कोणीही पाळू शकतच नाही तेव्हा सुविचार सुवर्तन विज्ञान व अध्यात्माच्या सहायाने मात्र जरूर आरोग्याचा धोका टाळू शकतो आणि आरोग्य पाळू शकतो व मिळालेले यश उपभोगण्यासाठी हि आरोग्य असणे अत्यंत जरुरी आहे त्या शिवाय मिळालेल्या यशाची मजा हि नाही.
आरोग्या विषयी चा सुविचार पहा- व्यायाम अथवा योगासने हे लायसन आहे आणी लायसनधारी लोकांना भीती नसते
सुविचारा चा परिणाम बघा- चोरी हा विचार अत्यंत चुकीचा ,ते कृत्य चुकीचे .चुकीचा परिणाम शरीरावर चुकीचाच होणार म्हणून आरोग्य नाही.आरोग्य नाही म्हणून यश नाही म्हणजेच चांगल्या विचाराने व त्याच्या कृतीनेच यश जवळ येत असते अशी हि एक सुरेख साखळीच आहे.तेव्हा जोपासलेल्या सुविचाराला १५% सुवर्तनाची जोड असणे गरजेचे आहे कारण नुसते सुविचार असून कृती शून्य असल्यास काहीही उपयोग होत नाही. आपल्या सभोवती जे वातावरण असते त्याच्या आपल्यावर निश्चितच चांगला/वाईट परिणाम होत असतो .याला आपली वागणूक हि कारणीभूत असते .आपण वातावरण दुषित करू शकतो मग स्वछ हि करू शकतो हा आत्मविश्वास असावा कारण आत्मविश्वास नसणे हे मोठेच गैर वर्तन आहे तसेच यश हे रेडीमेड नसते तर शॉर्टकट ने मिळालेले यश हे उल्के प्रमाणे असते ते कोसळताना चमकते मात्र धृव ताऱ्या प्रमाणे स्थिर नसते.
त्यामुळे वर्तन हे कायम स्वरूपी मिळणाऱ्या गोष्टीस अनुरूप असावे,त्यालाच सुवर्तन म्हणतात.कारण जीवन हे अतिशय साधे व सरळ आहे मात्र जगणारयाने ते आपापल्या परीने अतिशय गुंतागुंतीचे करून ठेवले आहे कुठल्याही प्रसंगाचा सरळ सरळ अर्थ न काढता अज्ञानाने जो अर्थ काढला जातो तो गुंतागुंत वाढवतो व अनर्थ घडवतो प्रत्येक घटनेचा साधा सरळ अर्थ काढण्याची सवय लागली पाहिजे कारण न कळत अज्ञानाचे ओझे वाहण्याच्या सवईलाच टेन्शन म्हणतात.सुवर्तन घडण्या साठी हे लक्षात घेतले पाहिजे.किमान २५% विज्ञान (विविध विषयांचे विशेष ज्ञान.उदा. वर फेकलेली वस्तू खाली पडते हे आहे ज्ञान तर ती गुरुत्वाकार्षणामुळेच पडते हे विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान )जीवनात आवशक आहे .किमान विज्ञानाच्या सुविधांचा आपल्या परीने वेळ वाचवण्यास व शारीरिक नुकसान टाळण्यास शिकलेच पाहिजे . निसर्गाने प्रत्येकाला एक क्षमता दिली आहे ती आपण कमी अथवा जास्त करू शकत नाही पण तिचा पुरेपूर उपयोग करून घेण्यास शिकू शकतो तेच विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान होय त्या साठी तुम्ही स्वत:ला ओळखण्यास शिकले पाहिजे .स्वत;ला ओळखणे म्हणजे स्वत;तील चांगल्या गुणांचा पुरेपूर उपयोग करणे.मेंदूचा पुरेपूर वापर करणे .शास्त्रज्ञांच्या मते मानवी मेंदूचा पुरेपूर उपयोग करणारे फारच थोडे असतात सर्वसाधरण पणे २०% च वापर केला जातो म्हणजे प्रचंड क्षमता असताना देखील आपण उगाच अज्ञानाने मागे सरकत असतो .आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करणाऱ्याची यशस्वी लोकांत गणना होते जसे कि आर्य चाणक्य ,शिवाजी महाराज,जगातील सर्वच महापुरुष अशी किती तरी उदाहरणे आपण नित्य अभ्यासली पाहिजेत.विज्ञान हेच शिकवते कि आळस झटकला कि आपल्या कल्पना कृतीत येऊ शकतात हेच शास्त्रज्ञाने सिद्ध केल्याने आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत व उर्वरित ५०% अध्यात्म जोडता आले तर या प्रकारे १००% यश त्याला मिळतेच व ते अगणीत होत जाते.विज्ञान हे निसर्गात अस्तित्वात असलेल्या गोष्टीवर प्रयोग करते तर अध्यात्म हे निसर्गाच्या निर्मिती बद्दलचे ज्ञान देऊ शकते इतकेच काय तर मानवी जीवनाच्या सर्वच प्रश्नांचे उत्तरे अध्यात्माच्या माध्यमातून मिळू शकतात येथे फक्त प्रयत्न करणाऱ्याची कमतरता आहे ती भरून काढायला आपल्याला येथे मोठीच संधी आहे आपण या संधीचे सोने करु या.कारण या परमेश्वरी शक्ती पुढे सर्वच महान व्यक्ती नतमस्तक आहेत म्हणून ते महान झाले.यशस्वी लोकांच्या जीवनात अध्यात्माचे स्थान फार उच्य प्रतीचे असते किंवा उच्य प्रतीचे अध्यात्म आचरणात आणणारी व्यक्ती हमखास यशस्वी होतेच हे जास्त संयुक्तिक आहे इतिहास याचा साक्षी आहे.अध्यात्म हा विषय अनंत आहे जो कोणी चाखेल त्यालाच याची गोडी कळेल पण हल्ली द्राक्षे हाताला येत नाहीत हे म्हणणे कमी पणाचे वाटते मात्र ती आंबट आहेत हे म्हणणे हि रूढीच झाली आहे म्हणजे नांवे ठेवणे टिंगल करणे यात धन्यता मानली जाते. प.पु.ब्रम्हचैतन्य महाराजांच्या नुसार अध्यात्माची व्याख्या म्हणजे ज्याला पैसा लागत नाही ते अध्यात्म.म्हणजे परमेश्वरावर प्रेम करायला पैसा लागत नाही तुम्ही परमेश्वरावर अकारण प्रेम करा यश तुमच्या पायाशी लोळण घेईल तसेच अध्यात्म म्हणजे लाचारी अथवा दिन पणा नव्हे तर तर सख्य भावाने परमेश्वराशी जोडलेली मैत्री होय.येथे ५०% अध्यात्म हा पाया आहे ,पाया मजबूत च हवा त्यावर २५% विज्ञान हे कॉलम व बीम चा साच्या आहे,१५% सुवर्तन ह्या भिंती आहेत तर १०% सुविचार हे छत आहे.दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास आपण फळाचा रस घेतो ज्यात किमान फळाचे प्रमाण ५०% ,दुधाचे प्रमाण२५% ,साखर १५%,व इतर सुगंधी द्रव्य ,मीठ,पाचक पूड वगैरे १०% असेल तरच रसाला ज्याप्रमाणे उत्कृष्ट चव येते त्या प्रमाणेच हे आहे. हा माझा अनुभव तर आहेच पण यशस्वी महान व्यक्तींची जीवन रेखा मला हेच सांगून गेली.मला येथे वाद अपेक्षित नाही व करावयाचा हि नाही. ज्यांची इच्छा अनुभव घेण्याची आहे त्यांनाच, माझी विनंती आहे कि अनुभव घेऊन बघाच ....................यशस्वीभव.
.येथे तुम्हाला जे पटले ते घ्या तुमचे ज्ञान,अनुभव सुदधा इतरांना जरूर सांगा कारण ज्ञान दुसऱ्यांना दिल्यानेच वाढते त्यामुळे येथे चेगट पणा कामाचा नाही हे ध्यानात घ्या. तुमचे ज्ञान वाढवा स्वत:मध्ये आवड निर्माण करा .आवड असेल तरच निवड होऊन सवड मिळेल तेव्हा वेळ काढा पण वेळ काढू पणा करू नका.जीवन हे असली नोटे सारखे जगायचे असते ते मोल्यवान आहे आणि ज्याच्या जवळ वेळेचे म्हणजे दिवसाच्या २४ तासाचे उत्कृष्ट नियोजन आहे त्याला ते नियोजनच यशस्वी बनवते. तरुणाईत मुले वाहवत जातात ते फक्त वेळीच योग्य दिशा न मिळाल्यामुळे, आणि गुणवता व प्रमाण हे नेहमीच व्यस्त प्रमाणात असतात. जसजसा लोकसंखेचा भस्मासूर वाढत आहे तसतसा सर्वच जीवनावशक गोष्टींची गुणवत्ता हि घसरत आहे त्यात संस्कार महत्वाचे . आज बहुतांश घरात संस्काराचा अभावा मुळे समाज दुः खाच्या खाइत लोटला जात आहे. शांतता हाच सर्व समस्या तरुन जाण्याचा मार्ग सापडण्याचा एक उपाय आहे ती शान्ती सर्वाना लाभावी ती या द्वारे दिशा मिळू शकेल. हा एक प्रयत्न आहे
सृष्टीच्या निर्मीतीच्या सोबतच हे पाच विषय निर्माण झाले आहेत ते अन्तापर्यन्त रहणारच (फक्त एखाद्याचा सु दुसर्याचा कु असेल कदाचित .एवढेच )
तेव्हा हे सर्व विषय पूर्णपणे इथे मांडण्यात आलेले नाहीत कारण हे ५ विषय खूपच मोठे कदाचित अमर्याद हि असतील.तसेच स्थाना, व्यक्ती परत्वे कहि मुद्यात त्या अनुशघाने बदल असु शकेल परन्तु मुळ संकल्पना एकच आहे त्या मुळे या विषयात प्रत्येकाने आपआपल्या परीने प्रगती करुन जीवनात अती उच्य स्थान प्राप्त करण्याचा प्रामाणीक प्रयत्न करावा कोठे तरी याची सुरवात व्हावी व त्याचे आकलन व्हावे व या दृष्टीने सर्वांचे विचार मंथन चालू रहावे म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने यात भर घालत रहावी संपूर्ण विश्वात शांती नांदेल ती या पाच विषयातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात याचे स्वरूप निश्चितच आहे या सर्व विषयात आपापल्या परिने प्रत्येकानेच आत्मचिंतनाने पुढेच जाउन डबक्यात पोहण्या ऐवजी या अथांग महासागरात पोहावे.तसेच मिळालेले यश अंतापर्यंत टिकण्या साठी सुद्धा या विषयांची संगती कोठेही सोडता येणार नाही ......विनायक.दि.पत्की.
धन्यवाद, तुमचा खुलासा तुमच्या
धन्यवाद,
तुमचा खुलासा तुमच्या कवितेला जास्तच खुलवून गेला .
कविता व खुलासा फार आवडले.
कविता व खुलासा फार आवडले.
पत्की तुम्हीच कोहंसोहं काय?
पत्की तुम्हीच कोहंसोहं काय?