Submitted by मंजूताई on 19 December, 2013 - 04:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टमाटे पाव किलो, खोबर्याचा किस अर्धी वाटी, एक चमचा धणे, पाच सहा लसूण पाकळ्या पाव इंच आलं, पाव चमचा गरम मसाला फोडणीच साहित्य चवीनुसार मीठ ितखट गूळ
क्रमवार पाककृती:
टमाट्याच्या लांब फोडी करुन घ्याव्या. धणे खोबर आल लसूण बारीक वाटून घयावे. फोडणी करुन त्यात वाटण टाकून परतून घ्यावे. टमाट्याच्या फोडी घालून बाकीचे जिन्नस टाकून व एक हिरवी मिरची टाकून पाच मिनिट शिजवावे.
वाढणी/प्रमाण:
खाण्यावर अवलंबून
अधिक टिपा:
मी तेल कमी टाकलं जास्त टाकलं तर धावेल. किती दिवस टिकेल हे सुगरणीने सांगितले नाही.:)
माहितीचा स्रोत:
कुकरी शो
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान चव येईल याला.
छान चव येईल याला.
मस्तय.
मस्तय.