सुकलेला कैरी कीस १ वाटी
साखर/ गुळ दिड वाटी
पाणी
वेलदोडा पावडर
केशर
कैर्यांचा सिझन असतो तेव्हा केलेला साखरांबा वर्षभर काही पुरत नाही.
हवा तेव्हा खायला मिळावा म्हणून एकदा इकडे येताना साधारण २०-२५ कैर्यांचा कीस (खीस) कडक उन्हात सुकवून आणला.
कृती: १)
साधारण दोन ते अडीच वाट्या पाण्यात हा कीस १० मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवायचा. त्यात जरासे पाणी शिल्लक दिसायला हवे. वाटल्यास आणखी अर्धी वाटी पाणी घालून जरासे शिजू द्यायचे. त्यात साखर, वेलदोडा पुड, केशर घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचे. साधारण २० मिनिटे मंद आचेवरच हे हलवत रहायचे. हे मिश्रण आता पारदर्शक दिसायला लागते. बोटावर घेऊन पाहिल्यास चिकट लागायला हवे आणि जरासेच पातळसर असायला हवे कारण थंड झाल्यावर हे घट्ट होते.
कृती: २) एक ते दिड वाटी पाण्यात हा कीस १० मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवायचा. एका जाड बुडाच्या भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात साखरेचा दोन तारी पाक करून घ्यायचा. ह्यात शिजवलेले मिश्रण घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचे. वेलदोडा पुड, केशर घालायचे व मंद आचेवर ५-१० मिनिटे ठेवायचे. बोटावर घेऊन पाहिल्यास चिकट लागायला हवे.
अश्याप्रकारे सुकवलेली कैरी घरात असली की हवा तेव्हा झटपट साखरांबा तयार.
हा कीस फ्रिजमधे ठेवला तर वर्ष-दोन वर्ष टिकतो.
हवा तेव्हा थोड्या प्रमाणावर करता येतो.
तयार साखरांबा मी फ्रिजमधेच ठेवते.
मी पैली मी पैली,,,,,,, मस्त!
मी पैली मी पैली,,,,,,,
मस्त! असंच कैरीच्या सुकवलेल्या फोडींचं लोणंचं करतात कोकणात. त्याला आंबोशीचं लोणंचं म्हण्तात.
अप्रतीम चविष्ट असतं तेही!
मस्तयं. फोटो अगदी टेम्प्टींग!
मस्तयं. फोटो अगदी टेम्प्टींग!
बाळाला आवडतो का साखरांबा,
बाळाला आवडतो का साखरांबा, इकडे पाठव त्याला. आमच्याकडे आता आंब्याचा सिझन आहे.
आंबोशीचे लोणचे माहितेय, त्याच
आंबोशीचे लोणचे माहितेय, त्याच आंबोशीचा आता साखरांबा किंवा गुळांबा करून बघायला हवा. मस्त आहे कृती आणि फोटोपण.
can we take dried mango
can we take dried mango powder if we don;t have grated kairi??
धन्यवाद! कैरीच्या सुकवलेल्या
धन्यवाद!
कैरीच्या सुकवलेल्या फोडींचं लोणंचं करतात कोकणात>>> सुकवलेल्या फोडीसुद्धा आहेत माझ्याकडे. इथे शोधते पा. कृ.
बाळाला आवडतो का साखरांबा>> होय. साखरांबा असला की भुक जरा लवकर लागते.
can we take dried mango powder if we don;t have grated kairi??>> मी कधी केले नाही, करून पहायला हवे एकदा. जॅमचा आणखी एक प्रकार होऊ शकतो.
फोटो अगदी टेम्प्टींग!>>>++१११
फोटो अगदी टेम्प्टींग!>>>++१११
आमेर कासुंदी नावाने शोध.
आमेर कासुंदी नावाने शोध. रुचिरात आहे कदाचित मी लिहिली असेन इथे.
http://www.maayboli.com/node/16847
छान दिसतोय साखरांबा ... गुळ
छान दिसतोय साखरांबा :)... गुळ घालुन करायचे झाल्यास पाक एकतारी पुरेसा होइल का?