भारतातल्या एयरपोर्टसवर मिळणार्‍या खादाडीच्या वस्तू

Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2013 - 10:28

कामाच्या किंवा सुट्टी घालवायच्या निमित्ताने आपण हवाईप्रवास करतो. एयरपोर्टसवर त्या त्या शहराची खासियत असे पदार्थ मिळतात. त्याबद्दल लिहिण्यासाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला, २ वर्षापूर्वी मुंबई डॉमेस्टीक डीपार्चरला बालाजी होतं. आता ते आहे का नही ते माहिती नाही. ते एक मस्त होते. मस्त मिसळ वगैरे हाणता येत असे.

मह्या नागपुराचे नाव धुयमाती करनारा कोन व्हय तो होबा-या तोंडाचा दुकानदार ???

पुढल्या वेई नागपुरातनी फ्लाईट पकडाच्या पैले सायच्याचे पुरे दुकानच लंबे लावतो तीन टाईम

पटना एयरपोर्ट ला लिट्टी चोखा मिळायचा, आता माहिती नाही, हाईजिन विषयच नाही !! पण देसी घी ची चव कल्लाच!!!!. टिपिकल थर्ड वर्ल्ड एयरपोर्ट, दिल्ली ला एक पाईंट बियर चे इतके पैशे घेतलेले की तेवढ्यात आम्ही हॉस्टेलवरची ४-५ कार्टी रॉयल स्टॅग पिऊन लास व्हायचो (चकणा+ जेवण करुन) ह्या आठवणीने गलबलुन आले!!!

एयरपोर्ट ला पिझ्झा हट अन मॅक डी च्या पण किंमती "अँबियन्स टॅक्स" (चार दोन भारी दिसणा-या कन्या झालंच तर जावुच द्या ना!!!) जोडुन असतात!!!. म्हणुन मी एयरपोर्ट ला

१. मनात मांडे खातो
२. विमानात बसल्यावर एयर हॉस्टेस ने उपकार म्हणुन फ्री मधे दिलेले (मर्तिकाच्या मुखी गंगाजल घालतात त्याच अनुपात अन प्रमाणात दिलेले) पाणी ढोसतो!!!.

फुड कार्ट्स सुरु झाल्यावर काहीतरी घ्यायचेच ह्या कर्मकांडा आहारी जाणार जनतेची काही हजार फुटांवर किव करतो!!!

अहमदाबादच्या एअरपोर्टवर १२-१३ वर्षांपूर्वी ७० रुपयांना कांदा-लसूण नसलेला बटाटावडा खाला होता. Sad असला बेचव बटाटावडा आधी किंवा नंतर कधीच खाला नाही. कांदा-लसूण न घालणे हा बटाटावड्याचा अपमान आहे Angry

शमशाबाद एयर्पोर्टाला ला कलेकलेनीवाढताना पाहिलय मी .आता वेगवेगळ्या बर्‍याच इटरीज आहेत . (किंमतीकडे नकोच वळुया) . त्यातल्यात्यात चविष्ट ईडली फॅक्ट्री. (डिपार्चरला) खाली असलेल फूड्कोर्ट मात्र बकवास आहे. कराची बिस्किट्स मस्त असतात. पण ती आता इथे पुण्यातही मिळतात. बिर्याणी मात्र आजीबात नाही आवडली. खरी हैद्राबादी बिर्याणी खाल्यावर बेन्च मार्क फार वर सेट झालाय बहुधा. Happy
अजून एक एयर्पोर्ट खादाडी म्हणजे, मुंबै इंट्रनॅशनल डिपार्चर ला मिळाणारी सरसरीत खिचडी. पुण्याहून मध्यारात्रीच विमान गाठायच म्हणजे अडनिड्यावेळी निघाव लागत. सिक्युरिटी चेकची मजल दरमजल करत खाली पोचल्यावर इथे लोणच पापड आणि खिचडी खायला मस्त वाटत. Happy

राजकोट एअरपोर्ट्वर सरदारजी समोसा कॉफी खूप स्वस्तात म्हणजे २०रुपाया ला विकतो.
शेंगा इथली स्पेशॅलिटी. एम आर पी रु ८५ विकतो रु ९०. उत्तम अन ताज्या.
मुंबई एअर्पोर्टवर १ बी मध्ये बुक शॉप जवळ वडा व इडली मिळते. रु ८०.
बीयर ५०० मि ली कॅन रु ५००. बुफे ब्रे क फा स्ट रु २७० - ब रि स्ता

वरदा | 17 December, 2013 - 11:15 नवीन
तो जैन बटाटेवडा असेल, नताशा
<<
तसं असेल तर त्यातले बटाटे बटाटे नसून उकडलेली कच्ची केळी असायला हवीत.
सो दॅट वॉज केळीवडा.
जमीनीच्या खाली उगवणार्‍या उग्र वा मांसल कंदांचे सेवन जैन लोकांत निषिद्ध आहे Wink
दारूसोबत चखन्याला देखिल आमचे जैन मित्र बटाटा चिप्स ऐवजी केळ्याच्या वेफर्स खातात.
कित्ती तो सात्विकपणा!

रेनुगुंटा आका तिरुपती एयरपोर्टवर ३ वर्षापूर्वी काहीही available नव्हतं. मागच्या वर्षी मात्र चिप्सची पाकीटं ठेवणारं टपरीवजा दुकान होतं. तेथून तिरुपतीला/तिरुमलाला जाईतोवर काहीच मिळत नाही. आता हे बदललं असावं अशी आशा.

>>मह्या नागपुराचे नाव धुयमाती करनारा कोन व्हय तो होबा-या तोंडाचा दुकानदार ??? Biggrin

अलिकडे नागपूर विमानतळावर, डिपार्चर लाँजजवळ एक दुकान, एक हॉटेल सापडलं. दुकानात हल्दिराममिठाई-फरसाणाचे शिळे पुडे, साबुदाण्याची चिकट खिचडी, समोसे, सँडविचेस, भाजी-चपातीरोलसदृशकाहीतरी एवढाच ऐवज दिसला. इंडिगोचं दिल्लीहून येणारं विमान तिथेच अडकलं म्हणून मुंबईहून येणारं विमान ५ तास उशिरा येणार अशी शुभवार्ता कळताच १० मिनिटांत त्या स्टॉलवर जनतेनं बिस्किटांचा पुडा टिकू दिला नाही. आम्ही तत्परतेनं समोसे विकत घेऊन पिशवीत घातले. पण २ तासांत इंडिगोनं इतकं अप्रतिम बुफे जेवण दिलं की उगीच गार समोसे गिळले असं झालं.

अलिकडे नागपूर विमानतळावर, डिपार्चर लाँजजवळ एक दुकान, एक हॉटेल सापडलं. दुकानात हल्दिराममिठाई-फरसाणाचे शिळे पुडे, साबुदाण्याची चिकट खिचडी, समोसे, सँडविचेस, भाजी-चपातीरोलसदृशकाहीतरी
>>>>
मृ, हेच हेच ते, धागाकर्तीला अभिप्रेत असलेल्या लोकल स्पेश्यालिटीज. Rofl

मी सध्या नागपुरात आहे दोन आठवडे ... जाताना सुवेनेर म्हणून घरच्याना लोकल स्पेश्यालिटी म्हणून काय न्यावे अशा विचारात होतो.बरी लिष्ट मिळाली. हा अस्सा जातो आणि उपरिनिर्दिष्ट पदार्थ घेऊन येतो...(नागपुरातील स.न्त्रा बर्फीत संत्र्याचा रस नसून कोहळ्याच्या अथवा खव्याच्या बेसमध्ये एसेन्स टाकतात हे कळल्यापासून मी संत्रा बर्फीचा दोर कापून टाकला आहे. बरेच अज्ञ जन किलो किलो ची पाकीटे घेताना पाहून 'बुडती हे जन, पाहवेना डोळा...... अशी स्थिती होते :))

बहुतेक एअर्पोर्टस वर ठरावीक प्रकारच मिळतात , लोकल येखाद दुसरी स्पेशालीटी असते. मुंबईत पुर्वी वेळ असला तर golden chariot मधे "वेळ" घालवता यायचा. बागडोगरा एअरपोर्ट ला मात्र तीथल्या कामगार युनिअन ने चालवलेले कँटिन वजा रेस्टॉरंट आहे आणि दरही वाजवी आहेत (जय बंगाल मधल्या युनिअन्स). तीथे मटन करी आणि राईस खाल्ला होता आणि चव अप्रतीम होती.

गेल्याच महिन्यात कलकत्ता डोमेस्टिक एअरपोर्टवर 'मिठाई' याच नावाच्या दुकानात मोठ्या अपेक्षेने शिरलो. पूर्ण भ्रमनिरास झाला. के.सी.दास ह्या प्रसिद्ध दुकानाचं मात्र एकही आऊटलेट आढळलं नाही. (हैदराबादच्या विमानतळावरही जसं पॅराडाईज बिर्याणीचं दुकान आहे, तशी काही सोय हवी होती.) पुस्तकांचं दुकानही सापडलं नाही Sad

त्याच फेरीत बागडोगरा ह्या दार्जिलिंग/भूतान सीमेनजीकच्या एअरपोर्टमध्ये मात्र निरनिराळ्या चहाचे प्रकार पेश करणारा कॅफेटेरिया (आणि तिथलंच गुलाबी रंगाच्या काश्मिरी चहाची पूड विकणारं दुकान) मात्र आवडून गेला.

Pages