Submitted by sneharups on 2 December, 2008 - 11:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ बीट,
४/५ पालकाची पाने,
१ गाजर,
१/२ वाटी मेथी,
१ हिरवी मिरची,
३/४ काळी मिरी,
५/६ लसुण पाकळ्या(पेस्ट),
२ टी. स्पु. साजुक तुप,
मीठ,
जिरे.
क्रमवार पाककृती:
बीट, पालकाची पाने, गाजर, मेथी, हिरवी मिरची, प्रेशर कूकर मधे कमी पण्यात शिजवुन घ्यावे आणि थ॑ड झाल्यावर मिक्सर वर एकदम बारिक वाटावे.
कढईत तुप गरम करुन त्यात जिरे, कळी मिरी आणि लसुणाचि पेस्ट परतवावी. त्यात भाज्या॑चे वाट्ण टाकुन हवे तसे घट्ट वा पातळ करावे. ऊकळी आली कि मीठ टाकुन गरम गरम पिण्यास द्यावे.
वाढणी/प्रमाण:
२/३ माणसांसाठी (घट्ट असेल तर)
अधिक टिपा:
भाज्या शक्यतो ताज्या असव्यात.
थ॑डीत पिण्यास चा॑गले.
सूप पातळ करण्यास भाज्या शिजवलेले पाणी वापरावे.
अख्या काळी मिरी ए॑वजी मिरपूड हि घालू शकता.
माहितीचा स्रोत:
मैत्रिंण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा