परवा माझ्यासाठी एक नवीन चष्मा करायला गेलो. वाचायचा!
आमच्या भागात च्ष्म्याची बरीच दुकाने झालेली बघून आश्चर्य वाटले! त्यात चकचकीत 'ब्रँडेड' च्ष्म्याची दुकाने बघून सुरुवातीस तिकडे घुसलो.
तीनही 'ब्रँडेड' दुकानांन्नी आपापले गुणगान करून सुमारे ४,५००/- ते १३,५००/- पर्यंत वेगवेगळ्या काचांची, प्लास्टीक लेन्सेस ची व्हरायटी दाखवली! मी ज्यास्त किमती बद्दल विचारले असता प्रत्येकाचे समर्थन वेगवेगळे होते. त्यात फ्रेमची किंमत वेगळी!
माझा फक्त वाचायचा चष्मा (नंबर कमी) असल्याने व सुरुवतीचा 'केळकर हॉस्पिटल' जं.म. रोड एथून करून घेतलेला चष्मा हा फक्त ६५०/- रु. झाल्याने (साध्या फ्रेमसहीत) मला एवढे महागडे चष्मे नको वाटले!
तेथून एका साध्या पण जुन्या दुकानात गेलो. सरळ 'स्वस्त व टिकाउ' काचा केवढ्यापर्यंत मिळतील असे विचारले. त्याने ९५०/- रुपये 'फिक्सड' असे सांगितले.
मला नेमके कळत नाहीय की कुठले योग्य अन कुठले अयोग्य !
काही मार्गदर्शनमिळेल ? धन्यवाद!!
ऑनलाईन शोधा (गुगल करा). बरेच
ऑनलाईन शोधा (गुगल करा).
बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
यक्ष तुम्ही कुठल्या एरियात राहता?
मला एक दुकान माहित आहे जिथे १००/- रुपयांपासुन फ्रेम उपलब्ध आहेत.
फ्रेम आणि लेन्सची किंमत
फ्रेम आणि लेन्सची किंमत वेगवेगळी सांगतात आणि असतेही. तूमच्या आवडीची फ्रेम घ्या. ( चेहर्याला शोभेल अशी ).
पण लेन्स काचेची घेण्यापेक्षा प्लॅस्टीकची घेतलीत तर चांगले. वजनाला खुप हलकी असते व पडली तरी फुटत नाही. मुंबईत सर्वाची मिळून किंमत साडेचार ते सहा हजार होईल. मी दरवर्षी घेतो. घेतानाच २ घेतो. एक ऑफिसमधे आणि एक घरी वापरतो. परदेशात करायची म्हंटली तर बरीच महाग पडेल, म्हणून भारतातूनच घेतो.
काही कारणांनी नंबर वरचेवर बदलत असेल तर मात्र महागडी लेन्स व फ्रेम घेऊ नका.
अहो दिनेशदा त्यांना ९५०/- पण
अहो दिनेशदा त्यांना ९५०/- पण जरा महाग वाटत आहेत म्हणुन ते स्वस्त दुकान शोधत आहेत तर तुम्ही त्यांना साडेचार ते सहा हजार किमतीचा चश्मा सुचवता आहात.
मी आणि नवर्याने मागच्याच
मी आणि नवर्याने मागच्याच आठवड्यात केले नवीन चष्मे. मला तर आधी पासूनच होता. मी लॉरेन्स अँड मेयो मधून केले. त्यांच्याकडे जो कमी किमतीचा होता तो 750 अजुनही कमी किमतीचे असतील तर माहीत नाही. माझा घेतला तो 2500 चा होता(रिमलेस) आणि ग्लास 2200 crizalची.
नवर्याला जवळचा आहे. त्याच्यासाठी progressive glasses घेतल्या. (होयाच्या) crizal च्या progressive glasses सहित त्याचा चष्मा 7500 पडला.
तसेच मी spare साठी जुन्या चष्म्यात सध्या glasses टाकुन घेतल्या ज्या प्लॅस्टिकच्या आहेत(580/-) फिक्स्ड प्राइज.
पियु परी, मी वाचलं
पियु परी,
मी वाचलं ते.
चष्म्यासारखी वस्तू वारंवार घ्यायची नसते. एकदा घेऊन नीट वापरला गेला आणि मुख्य म्हणजे नंबर वाढू दिला नाही, तर चांगले.
फ्रेम्स च्या किमती अवास्तव
फ्रेम्स च्या किमती अवास्तव आहेत हे नक्कीच. मी ही टायटन आय प्लस मध्ये पाहिलेल्या आणि आवडलेल्या सगळ्या साडेतीन, साडेचार हजार अशा होत्या (फक्त फ्रेम्स) मग लेन्सेस वेगळ्या त्यात अँटीग्लेअर, अॅण्टीस्क्रॅच काय आणि काय. घेत जाऊ तशा किमती वाढतच जातात. मी विचार केला शेवटी एक वेळ लेन्स वर पैसे खर्च करणं ओके आहे फ्रेमपायी इतके पैसे का घालवा?
सुदैवाने जिथे डोळे तपासले त्यांच्याचकडे रिमलेस फ्रेम सुरेख अगदी अनबिलिव्हेबल किमतीला मिळाली 
अॅण्टीस्क्रॅच संबंधी माझी
अॅण्टीस्क्रॅच संबंधी
माझी ग्लास अॅण्टीस्क्रॅच या सदरात मोडत होती तरी ही तिला स्क्रॅच पडलाच होता. सो अॅण्टीस्क्रॅच वैगरे काही खरे नाही असे मा.वै.म.
सुदैवाने जिथे डोळे तपासले
सुदैवाने जिथे डोळे तपासले त्यांच्याचकडे रिमलेस फ्रेम सुरेख अगदी अनबिलिव्हेबल किमतीला मिळाली
>> पुण्यात का गं दक्षे? कुठेशी?
हो पियु पुण्यातच. डॉ. दुधभाते
हो पियु पुण्यातच. डॉ. दुधभाते
फ्रेम स्वस्तातली घ्या पण
फ्रेम स्वस्तातली घ्या पण लेन्स वर काटकसर करू नका. हाच आपला एक दागिना कम बॉय फ्रेंड आहे जो कायम साथ देतो. लेन्स च्या क्वालिटी व अॅप्लिकेशन नुसार किंमत असते. स्वस्त लेन्स डिलिवर करणार नाही कदाचित.
महाग डिझायनर फ्रेम ला काही अर्थ नाही चांगली लेन्स उत्तम भक्कम फ्रेम घ्या. जपून वापरा.
चाळीशीनंतर क्रिझाल वगैरे लेन्स वर खर्च करणे उपयुक्त आहे. एक स्वतः मधील इन्वेस्ट मेंट म्हणून त्याकडे बघा. कार्ड्व र पेमेंट केले तर हप्त्याने भरता येइल.
एकदा घेऊन नीट वापरला गेला आणि
एकदा घेऊन नीट वापरला गेला आणि मुख्य म्हणजे नंबर वाढू दिला नाही, तर चांगले.
<<
नंबर वाढणे आपल्या हातात नाही. ते आपोआप होते. वाचण्याचा चष्मा सुमारे २-३ वर्षांत नं वाढत रहातो.
"ब्रँडेड" विनाकारण महाग असतात.
चष्मा घेताना शक्यतो छोटासा घेऊ नये.
तसेच वजनाला जितका हलका, तितका वापरायला कॉम्फी.
क्रिझाल वगैरे लेन्स वर खर्च
क्रिझाल वगैरे लेन्स वर खर्च करणे उपयुक्त आहे. >>>> एक नं बकवास कं आहे ही. मी स्वतः देखिल फसलो आहे आणि त्याचा काही माग ही काढता येत नाहीय. महागातली लेन्स, ओळखिच्या दुकानात घेउन ही ती चक्क डुप्लिकेट आहे असे वाटते. एसीतुन बाहेर आले कि जसे ग्लास वर व्हेपर कन्डेन्स होते तसे याला देखिल होते. पाणी पडले तर तसेच रहाते. लाईट रिफ्रअॅक्शन होतेच होते. तेथे गेलो असता एक जण असाच तक्रार घेउन आला होता त्याच्या लेन्स वर तर इतके स्क्रॅचेस पडले होते २ महिण्यात आणि त्याच्जे लेन्स होते ७५०० रु. प्रोग्रेसिव . आता दुकानदार म्हणतो मी तर काय घरात बनवत नाही जे कं कडुन येते तेच विकतो.
फ्रेम पण इंपोर्तेड म्हणुन घेतली होती. त्याला आता ग्रीन लेयर येतोय. दुकान्दाराच्या मते माझ्या अंगात उष्णता भरपुर आहे म्हणे. हे पैसे म्हणजे अक्कलखाती जमा झालेत. आणि हो तेथे सर्वात स्वस्त चष्म ३०० ते ४०० रु तयार होतो.
यु एस मध्ये एकदा इमर्जन्सीमध्ये अक्षरशः १५ $ चा सनग्लास घेतला होता पोलराइड, तो या सगळ्या पेक्षा भारी वाटतो.
पियु परी म्हणते तशा फ्रेम्स
पियु परी म्हणते तशा फ्रेम्स १०० रूपयांपासून नक्कीच मिळतात...लेन्सची किंमत त्यामानाने जास्त असते तरीही केवळ वाचायचा चश्माच करायचा असेल तर कमीत कमी २५०-३०० रूपयात लेन्ससह चश्मा बनू शकतो...खास परदेशी बनावटीचे आणि घडीचे चश्मे येतात ज्यात नंबरच्या(वाचण्यासाठी) काचाही बसवलेल्या असतात..तो चश्मा १००-१२५ रूपयात मिळतो...ह्या सगळ्या किमती मुंबईतल्या आहेत.
इतक्या स्वस्तातला चश्मा घेणं हे जर कमीपणाचं वाटत असेल तर मग आपल्या खिसा-पाकिटाची क्षमता आणि मित्रमंडळीतली आपली प्रतिमा इत्यादिचा विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा.
बाकी कुणाला चश्मा हा एक दागिना म्हणूनच वापरायचा असेल तर मग त्याच्या किंमतींना काहीही धरबंध नाहीये...हौसेला मोल नाही म्हणतात ते काय उगाच?
चांगली लेन्स हवी असेल क्रिझाल
चांगली लेन्स हवी असेल क्रिझाल ला पर्याय नाही. मी नायकॉन पण वापरली आहे. पण मला क्रिझाल नेहमी आवडते.
निवांतराव तुम्हाला बहुदा त्याने फसवले. माझ्या क्रिझाल एअरवेअर २ वर अजिबात पाणी राहत नाही. सगळ्यात सोपे म्हणजे चष्मा डोळ्याशी संमातंर घेऊन बघा, तिथे क्रिझाल मार्क आहे की नाही? आणि तुम्हाला क्रिझाल जे सर्टिफिकेट पण मिळते.
माझी लेन्स प्रोगेसिव्ह आहे आणि किंमत १४००० त्यामुळे ७५०० मध्ये त्याने तुम्हाला क्रिझालची बेसिक लेन्स दिली असण्याची शक्यता देखील आहे. कारण लेन्स कर्व्ह प्रमाणे ( प्रोग्रेसिव्ह साठी) किंमत बदलते.
मला खरेतर १०००/२००० रू मध्ये चष्मा लेन्स सहीत होतो ते वाचूनच आश्चर्य वाटते. मे बी लेन्स लेन्स मध्ये खूप फरक आहे. सिंगल व्हिजन लेन्स मध्ये काचेची वापरली तर अगदी स्वस्त मिळते पण प्लास्टिक / वजनाला हलके लेन्स जशी जशी घेऊ तशी किंमत बदलेल, + मग त्यात ट्रान्सिशन, + अनेक फिल्टर्स वगैरे. मल्टि व्हिजन एक ग्लास हवा असेल तर महाग लेन्स शिवाय पर्याय नाही. अन्यथा दोन ग्लास वाली मिळते. (जी आजोबा लोकं वगैरे वापरतात आणि त्यांना ओल्ड लूक आहे). माझा प्रॉब्लेम हा आहे की लेन्स दर दिड एक वर्षाला बदलावी लागते. आणि मग परत तेवढाच खर्च. फ्रेमचे तर काय सांगूच नका. तो एक वेगळाच खर्च.
"ब्रँडेड" विनाकारण महाग असतात. >> असहमत आहे कारण बरेच ब्रॅण्डच्या (लेन्स आणि फ्रेम) चांगला अनुभव आहे. महाग आताशा रिलेव्हिव होत चालले आहे म्हणा. मला नाक्यावरचा चहा आताशा महाग वाटतो आणि इतरांना कॉफी डे मध्ये ९० रू चा चहा ही ओकेच वाटतो.
हे पण वाचा. http://www.39dollarglasses.com/blog/2012/10/tired-of-paying-too-much-for...
स्क्रॅच पडणे वापरावर आहे
स्क्रॅच पडणे वापरावर आहे हो. ते तुम्हाला उत्तम बॉक्स आणि मौ कपडा देतात. ज से रंगवलेली भिंत वापरा मुळेच खराब होते. वापरात नसताना चस्मा नीट ठेवणे अपेक्षित आहे. महाग आहे हे नक्की. पण जर तो वापरून आपन दिवसाचे बरेच तास काम करणार असू तर वी शुड हॅव बेस्ट इन क्लास लेन्स. फ्रेमचे काय हो. आवडीवर आहे.
परत प्रिस्किरीप्शन ग्लासेस आणि सन ग्लासेस ह्यात फरक आहे. मी स्कूटर वापरत असल्याने नेहमी फोटो सन घेते त्यात पैसे जातात. पण आता कडक उन्हाकडे बघायची सवयच गेली आहे. इंडियात यू नो. वर्शाचे ९ महिने
उन्हे असतातच म्हणून मी तर इन्वेस्ट करते. जपून वापरते. बाहेरून सोसायटीच्या पार्किं ग मध्ये आले कि आजिबात काही दिसत नाही दोन मिनिटे इतका काळा होतो चस्मा! अजून मजा वाटते.
लॉरेन्स अँड मेयो >+१
लॉरेन्स अँड मेयो >+१
मी नुकताच प्रोग्रेसिव्ह
मी नुकताच प्रोग्रेसिव्ह लेन्स, जरा त्यातल्यात्यात मला आवडलेली स्टायलिश फ्रेम वगैरे घेतलं. साडेपाच हजार झाले चष्म्याचे. जीव तुटला पैसे देताना. पण आता वापरत आहे तेव्हा प्रचंड फरक जाणवतो आहे आधिच्या चष्म्यात आणि यात. मला फक्त रिडिंगचाच नंबर आहे पण मी आधीचा कधी वापरलाच नाही कंटाळ्याने. आता हा व्यवस्थित वापरला जातो आहे. त्यामुळे जास्त पैसे गेले असं वाटलं त्याचं दु:ख कमी झालं.
आमच्याकडे वर्षाला दहाएक हजार
आमच्याकडे वर्षाला दहाएक हजार चष्म्यामधेच खर्च होतात. त्यातही नवर्याचं वापरणं अतिशय काळजीपूर्वक वगैरे असतं, आणी माझं एकदम रफ युज. मी एकदम दोन च्ष्मे करून घेते. एक एमर्जन्सीला आणि एक रेग्युलर युजला. बाहेर जाताना लेन्सेस. लेन्सेस वापरल्या की नंबरचा गॉगल वापरावा लागत नाही.
आतापर्यंत सर्वात् बेकार चष्म्याचा अनुभव रीलाय्न्स विजनमधे आला. जवळ जवळ साडेतीन हजाराचा चष्मा अॅन्टी स्क्रॅचिंग व गैरे लेन्स असून्सुद्धा खराब झाला तेपण अवघ्या सहा महिन्यामधे. त्यापेक्षा टायटन आय प्लसचा च्ष्मा चांगला चालू आहे.
निवांतराव तुम्हाला बहुदा
निवांतराव तुम्हाला बहुदा त्याने फसवले. माझ्या क्रिझाल एअरवेअर २ वर अजिबात पाणी राहत नाही. सगळ्यात सोपे म्हणजे चष्मा डोळ्याशी संमातंर घेऊन बघा, तिथे क्रिझाल मार्क आहे की नाही? आणि तुम्हाला क्रिझाल जे सर्टिफिकेट पण मिळते.>>>> क्रिझल मार्क आहे. माझा नं फक्त ०.५ आहे. प्रोग्रेसिव वगैरे नाही. त्याने एक सर्टीफिकेट ही दिले आहे. त्यावर बस्स एक नं चा स्तँप आहे. पण आता परत याचा छडा लावतोच. धन्यवाद केदार.
क्रिसलचे आउटलेट कुठे आहे हे शोधतो आता.
पियु परिजी आपणास वि. पु.
पियु परिजी
आपणास वि. पु. मध्ये लिहिले आहे.
दिनेश्जी
तसा बर्यापैकी आळशी आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ह्या चांगल्या पण स्वस्त व 'हरवल्यास चालेल' केटेगरीतील वस्तू प्रिफर करतो.म्हणून पहिल्याच चष्म्याचे दोन सेट करून घेतले होते. तुम्ही सुचवताय त्याप्रमाणे एखादा व्यवस्थीत करून घेतो.
पिन्की ८० जी
आपला "..........spare साठी जुन्या चष्म्यात सध्या glasses टाकुन घेतल्या ज्या प्लॅस्टिकच्या आहेत(580/-) फिक्स्ड प्राइज" ह्यतल्या प्लॅस्टिक लेन्सेस चा अनुभव कसा आहे?
दक्षिणाजी
अगदी अगदी ...........मी पण असच गोंधळलो होतो व म्हणून निर्णय घेउ शकलो नाही!.
अश्विनीमामीजी
"....दागिना कम बॉय फ्रेंड" संदर्भात ...दागिना कम गर्ल फ्रेंड असलेली लेन्स मिळते का? मिळाल्यास ती किति दिवस टिकते?
गंम्मत अपार्ट..मी "इन्वेस्ट मेंट " जरूर करतो.
इब्लिसजी
"ब्रँडेड" विनाकारण महाग असतात....: बरोबर.
चष्मा घेताना शक्यतो छोटासा घेऊ नये.....हो!
तसेच वजनाला जितका हलका, तितका वापरायला कॉम्फी....: जरूर ...धन्यवाद!
निवांतजी
असेच एकाकडून 'कार्ल झाईस' संदर्भात' ऐकले होते नुस्ता ब्रँड काय कामाचा. पैशांचा योग्य विनियोग नको? पुन्हा फुकट मनस्ताप तर नकोच नको!
प्रमोद्जी
".......इतक्या स्वस्तातला चश्मा घेणं हे जर कमीपणाचं वाटत असेल...." नाही तसे नाही..फक्त दिलेल्या पैशांचा
योग्य मोबदला मिळल्यास बरें!
केदारजी..
".........१०००/२००० रू मध्ये चष्मा लेन्स सहीत होतो ते वाचूनच आश्चर्य वाटते...." का बरे? मी वपरलेत अन मलातरी उपयोगी वाटलेत. प्रश्न असा आहे की अगदी स्वस्त म्हणजे 'बेभरवशाचे ' असे का?
सगळ्यांन्ना धन्यवाद!
मागे अशीच आम्हा मित्रांमध्ये
मागे अशीच आम्हा मित्रांमध्ये चष्म्याच्या किंमतीबद्दल चर्चा सुरु होती. एका मित्राने त्याच्या चष्म्याची किंमत सांगितली, ऐकुन माझे डोळेच पांढरे झाले रु. ७०,००० हो हो सत्तर हजार!! अख्ख्या आयुष्यात ७०,००० हजाराचे चष्मे वापरेन की नाही कुणास ठाउक. असो.
खरं तर सध्या चष्म्याच्या फ्रेम्स वरच नफा कमावला जातो, जवळपास १००% ईतके या नफ्याचे प्रमाण असु शकते.
भ्रमर १००% की १००पट?
भ्रमर १००% की १००पट?
@ यक्षजी, सध्या मी स्पेअरसाठी
@ यक्षजी,
सध्या मी स्पेअरसाठी म्हणुन जो आहे तो चष्मा वापरते आहे कारण माझा दुसरा चष्मा अजुन यायचा आहे. तो शुक्रवारीच मिळणार होता पण काही कारणाने दुकानवाल्यांनी बनवून आलेला चष्मा रीजेक्ट केला होता(बहुतेक स्क्रॅच असल्यामुळे). पण मला या चष्म्याने थोडे डोळे दुखल्यासारखे वाटत आहे, की जे या पुर्वीचा चष्मा वापरत होते तेव्हा अजिबातच कधी वाटले नव्हते. इनफॅक्ट माझा नंबर पावने वाढला होता, पण मला काही त्रास होत नव्हता सो लक्षात नव्हते आले(चष्मा तुटल्यामुळे नवीन करायच्या आहे एकदा डॉक्टराकडून चेक करूया म्हणुन तरी कळले.)
या फ्रेममध्ये सुद्धा मी दुसरा चष्मा आल्यावर चांगल्या लेन्स टाकुन घेणार आहे, आणि नवीन चष्मा वापरायला सुरवात केल्यावर दोघीतला फरक मी नक्कीच येथे शेअर करेन.
फ्रेम बरोबर काचेवर पण कित्येक
फ्रेम बरोबर काचेवर पण कित्येक पट नफा कमावला जातो. मला स्वता:ला प्रोग्रेस्सिव चश्मा करायचा आहे, पण ठाण्याला मयेकर मध्ये जवळ जवळ १२००० फक्त काचेचे होतिल म्हणुन सान्गितले. हल्लि चश्म्याच्या किमती गगनाला भिड्ल्या आहेत.
मी पण मयेकर मुलुंड मध्येच
मी पण मयेकर मुलुंड मध्येच केल्ता. ३-४ महिने नवीन कपडे वगैरे घेतले नाहीत. खर्च भरून निघेस्परेन्त.
जुलै -२०१३ मधे रू. १७०० /-
जुलै -२०१३ मधे रू. १७०० /- किमती चा चष्मा केला लक्ष्मि रोड पुणे येथुन. अन्टी ग्लेअर. खुपच जिव हळहळ् ला.

ते पॉलिकार्बोनेट का काय
ते पॉलिकार्बोनेट का काय म्हणतात ते काय असते? कोणाकडे आहे क?
मी पण मयेकर मुलुंड मध्येच
मी पण मयेकर मुलुंड मध्येच केल्ता. ३-४ महिने नवीन कपडे वगैरे घेतले नाहीत. खर्च भरून निघेस्परेन्त >>
खर्च भरुन काढता येइल, पण किम्मत किती असावी याला काहीच लगाम नाही याचे दुखः आहे.