कांदा,गाजर, सुरण भाजी

Submitted by मंजूताई on 28 November, 2013 - 02:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो सुरण, पाव किलो गाजर, २कांदे, २ टमाटे धने पूड,१/२ वाटी खवलेला ओला नारळ, हिरवीमिरची १, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ, साखर व कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

भा़ज्या सोलून, धुवून, चिरुन घ्या. अत्यल्प तेलात फोडणीचे सहित्य टाका. मिरची, कांदे परतून घ्या. त्यात भाज्या टाकून परता. त्यात चिरलेले टमाटे टाकून परता. पाणी टाकून शिजू द्या. शिजली की त्यात मीठ, साखर, ओला नारळ व धनेपूड टाका. कोथिंबीर घालून खा.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

एका निसर्गोपचार आश्रमात ही भाजी खाल्ली अतिशय आवडली, बॉऊलभर नुसती पण खाते. झटपट होणारी डायट भाजी! आश्रमात ह्या भाजीत पाणी ओतलेले होते तरीही पांचट लागली नाही. आपण आपल्या आवडीप्रमाणी पाणी टाका.

माहितीचा स्रोत: 
आश्रमातला स्वयंपाकी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे भाजी सोप्पी पण आहे. नक्की करुन बघेन.

सुरणाची खाज घालवण्यासाठी आधी चिंच वगैरे लावायची हे लिखाणात राहीलय की त्याची गरज नसते? आमच्याइथे मिळणारे सुरण बहुदा खाजरेच असतात त्यामुळे ते आधी चिंच लावून किंवा पाण्यात थोडी चिंच टाकून त्या पाण्यात सुरण उकडून मग ते पाणी टाकले जाते.

भाजी छानच आहे पण इथे मिळणारे सुरणपण बऱ्याचदा खाजरे असते म्हणून मी कोकम वापरते. ह्यात कोकम टाकले तर चालेल का?

खरतर ह्या भाजीत विशेष असं काही नाही पण हया कॉम्बिनेशनचा विचारच केला नसता. नक्की करुन पहा अप्रतिम चवीची डायट भाजी.

घरी कोणाला सुरण आवडत नाही, त्यामुळे सुरणाऐवजी बटाटा वापरून ही भाजी करून बघेन. वेगळे कॉम्बो आहे आणि मसाले-बिसाले, वाटण इ. प्रकार नाहीत, त्यामुळे भाजी सोपी वाटते आहे.