सल्ला हवा आहे

Submitted by खोचाकराव on 16 November, 2013 - 02:01

प्लॉट विकण्या संबंधी मार्गदर्शन हवे आहे.

माझा ३००० चौ. फुट. चा प्लॉट आहे. पण घेताना फसवणूक झाली होती. मूळ मालकाच्या ७ एकर जागेवर प्लॉट पाडले होते. आमची खरेदी १९९२ ची आहे. जागेचा लेआउट अजूनही मंजूर नाही आहे. त्यातच १९९६ ला या ७ एकर जागेपैकी तीन एकरात शाळा व क्रीडांगनाचे आरक्षण पडले. त्यामुळे प्लॉट खरेदी दरांनी नायायालयात मालक विरुद्ध दावा केला पण काही महिन्यांनी मालक व प्लॉट धाराकात तडजोड झाली व आहे त्या क्षेत्राच्या अर्धे क्षेत्र प्रत्येकाने घेतले पण यात सर्व प्लॉट धारक नसल्याने न्यायालयाने ७/१२ पत्रकी जेवढी खाती आहेत तेवढी तयार करून ती प्लॉट धाराकाना द्यायचे आदेश दिले. त्याप्रमाणे नवीन लेआउट तयार करून त्यअ प्रमाणे वाटप झाले. पण हा ले आउट देखील सिटी सर्वे मध्ये मंजूर नाही आहे. वर सांगितल्या प्रमाने दाखल केलेल्या दाव्यात माझे नाव नाही. मूळ मालकाकडे वारंवार मागणी करून देखील तो कब्जा देत नाही.

प्लॉट हा मोक्याच्या ठिकाणी असल्याने बरेच जाण विक्री समंधी विचारणा करतात पण विकल्यावर अडचणी येतील असे वाटते कारण कब्जा नाही. पण सर्व कागदपत्रे क्लीअर आहेत ( खारेदिपत्र, ७/१२, ८अ सर्व आहे.)

जर नवीन खरेदीदार सर्व लेटीगेशंस सहित घायला तयार असेल तर मी ही जागा विक्री करू शकतो का?
आणि विकताना कोणती काळजी घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप स्पेसिफिक गोष्टींचा सल्ला असा ओपन फोरम मध्ये आणि मोफत मिळत नाही.
शिवाय जागा कुठे आहे, किती दर चालु आहे, दाव्याचे डिटेल्स हे कळाल्याशिवाय असा सल्ला देणे आणि घेणे दोन्ही चुक.
असा सल्ला जर कोणी देत असेल, तर ते ही चूकच.....
आपल्या परिसरातील, जमिन विषयक केसेस सांभाळणारा वकिल करावा, हे उचित..

जर नवीन खरेदीदार सर्व लेटीगेशंस सहित घायला तयार असेल तर मी ही जागा विक्री करू शकतो का?>>> समोरची पार्टी जर ग्यायला तयार असेल तर बिंन्धास्त देउन टाका. पण लेटीगेशनमधील जागा अक्षरशः थ्रो अवे प्राइज ला जाते. आमच्या कडे काही लोक फक्त आणि फक्त लेटीगेशनवाल्या जागातच काम करतात Wink

विकताना कोणती काळजी घ्यावी.>>> पैसे घेण्याची Wink