ढोबळी मिरचीचं रायतं:
हिरवी ढोबळी मिरची, दही, मीठ, साखर, धणेपूड, भिजवून घेतलेली खारी बुंदी, डाळिंबाचे दाणे, कोथिबीर
भेंडी रायतं:
भेंडी, तेल, चाट मसाला, तिखट, दही, मीठ, जिरंपूड,हिंग, मोहरी, कोथिबीर/पुदिना
ढोबळी मिरचीचं रायतं:
हिरवी ढोबळी मिरची गॅसवर वांग्याप्रमाणे भाजून घ्या. नंतर सालं काढून त्याचे बारीक तुकडे करा.
Bowl मध्ये दही, मीठ, साखर, धणेपूड, भिजवून घेतलेली खारी बुंदी घाला. मिक्स करा.
त्यात ढोबळी मिरचीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे घाला. कोथिबीर घाला.
फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.
भेंडी रायतं:
भेंडीच्या पातळ चकत्या करा. तेलात डीप फ्राय करून घ्या. त्यावर चिमूटभर चाट मसाला, तिखट घाला.
Bowl मध्ये दही घेऊन फेटा. त्यात मीठ, जिरंपूड, तिखट घालून मिक्स करा. त्यात तळलेली भेंडी घाला.
तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी घाला व ही फोडणी रायत्यावर ओता. कोथिबीर/पुदिना घाला.
फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.
पहिली छान आहे. दुसरी, भेंडी
पहिली छान आहे. दुसरी, भेंडी तळल्यामुळे टेस्टी लागत असणार ह्यात शंकाच नको. पहिली करुन पाहणेत येईल, दुसरीला वेळ आहे अजुन
छान
छान