Submitted by मंजूताई on 5 November, 2013 - 08:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
वांगी - पाव किलो(एका वांग्याच्या ४ उभे काप करुन) , गवार -अर्धापाव किलो (आखूड असतील तर तश्याच अथवा एकाचे दोन तुकडे करुन), बटाटे - पाव किलो(उभे काप करुन), भेंडी - अर्धा पाव(बुड व देठ कापून), २ शेवग्याच्या शेंगा( लांब कापून), पाच मोठ्या टोमॅटो प्युरी, ४ टीस्पून बेसन, मीठ व तिखट चवीनुसार
फोडणीसाठी - ४ मोठे चमचे तेल, जिरे, मोहरी व १/२ चमचा मेथ्या, आलं व हिरवी मिरची बारीक चिरुन व कढीपत्ता, हिंग
क्रमवार पाककृती:
एका कुकरमध्ये फोडणी करुन त्यात बेसन टाकावे व लाल होईपर्यंत खमंग भाजून घ्यावे त्यात टोमॅटो प्युरी टाकून चांगले परतून घ्यावे. त्यात चिरलेल्या भाज्या, मीठ, तिखट, ४ कप पाणी टाकावे व कुकरची एक शिट्टी काढावी.
वाढणी/प्रमाण:
आवडीनुसार
अधिक टिपा:
भाजीत हळद घालू नये. पावा किंवा भाताबरोबर खावी.
माहितीचा स्रोत:
पायल
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इन्टरेस्टींग! पण ही भाजीच
इन्टरेस्टींग! पण ही भाजीच झाली ना, कढी का म्हणतात याला?
मी याचं नाव जालावर 'सिंधी
मी याचं नाव जालावर 'सिंधी करी' असं पण वाचलं आहे!! टोमॅटो प्युरीला बेसन लावलं आहे म्हणून कढी म्हणत असावेत कदाचित!!!
curry म्हणजे रस्सा होईल
curry म्हणजे रस्सा होईल ना.......कढी कशी काय? कढी सारखी दिसत पण नाही ती भाजी.
सिंधी मैत्रिणिकडे कितीवेळा
सिंधी मैत्रिणिकडे कितीवेळा खाल्लीये ही. मस्त लागते.
!! टोमॅटो प्युरीला बेसन लावलं
!! टोमॅटो प्युरीला बेसन लावलं आहे म्हणून कढी म्हणत असावेत कदाचित!!!..>> मलाही असंच वाटतं भाजी-वरण करण्यापेक्षा ही एकच भाजी/कढी शॉर्टकट चांगला आहे.
कूकरमधे छान झटपट होणारी कृति
कूकरमधे छान झटपट होणारी कृति आहे.माझी सिंधी मैत्रीण आंबट चवीसाठी चिंचेचे पाणी वापरायची.व भाज्या षिजल्या कि टोमॅटो फोडी--खास चवीसाठी- घालायची.सिंधी स्पेशल अल्युमिनियम च्या मडकेवजा बुड जाड असलेल्या भांडयात करायची.तिच्याकडे ५ किलो ते १ किलो जिन्नस करता येईल असे या आकाराच्या देगचीचे "सेट" होते.स्पेशल बिर्याणी,चिकन्,जिरा राईस ,मीठे चावल ,खीर ,स्पेशल चना-उरद दाल,राजमाअसे सगळे जिन्नस देगचीमधे "दम"वरच करायची..
छान आहे पदार्थ. करून बघायला
छान आहे पदार्थ. करून बघायला हवी ही कढी. तू त्यातल्या त्यातही साहित्य ज्या पध्दतीने मांडून ठेवलंयस ते आवडलं.
भेंडी न घालता करून बघेन
भेंडी न घालता करून बघेन
सिंधी लोकांची आवडती डिश
सिंधी लोकांची आवडती डिश आहे... अगदी एक दिवसाआड पण करतात .
मला भाताबरोबर खूपच आवडते.
छान पदार्थ ….फ़क्त एक शंका
छान पदार्थ ….फ़क्त एक शंका आहे…. इतके tomato घातल्यावर हे फार आंबट नाही का होत? चवीला थोडा गूळ किंवा साखर नसते का ह्यात?