अभिप्राय

Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्‍याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१३

दिवाळी अंक अतिशय सुरेख व वैविध्यतेने बहरलेला आहे. वाचायलाही भरपूर दिसतेय. वरवर झर्र्कन चाळलाय आत्ता. वाचून प्रतिक्रिया देतेच. Happy

संपादक मंडळाचे खूप कौतुक.

प्रकाशनाबद्दल मंडळाचं अभिनंदन. खूप कमी वेळात धावपळ करून अंक काढलात याचं कौतुक. Happy

व्यक्तिशः मला मुखपृष्ठ, सजावट, एकूण रंगसंगती आवडली नाही. साहित्य वाचेन तसतसे अभिप्राय त्या त्या ठिकाणी देईनच.

व्यक्तिशः मला मुखपृष्ठ, सजावट, एकूण रंगसंगती आवडली नाही.
>>
सहमत!
पण फारच कमी वेळ मिळाल्याने झालं असेल का असं?
बाकी अंक खुप मस्त आहे... काही काही लेख, कथा, कविता तर अतिशयच ऑसम आहेत.

बाकी एकही विडिओ पहाता आला नाही कारण ती साईट ऑफिसात ब्लॉक आहे
याबाबत काही करता येईल का?

अंक मस्त झालाय एकदम Happy

भरगच्च झालाय अंक Happy भरपूर मटेरिअल आहे वाचायला.

संपादकीय छान आहे.
बाकी हळूहळू वाचून तिथे अभिप्राय देईनच. Happy

संपादक मंडळ, तुम्हा सर्वांचे अभिनंदन!
अंक छान झाला आहे. मुखपृष्ठ पाहून दिवाळीच्या, "रंगोत्सव व प्रकाशोत्सवाचा" जबरदस्त फील येतो आहे.
तसंच अंकाच्या पानांवर रंग व कलाकुसरीची खिचडी न करता जो साधेपणा ठेवला आहे तोही खूप आवड्ला.
वाचल्याचर अभिप्राय देईनच.
संपादक मंडळ व समस्त मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खूप मेहनत घेऊन अंक काढल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन.
------------------------------------------------------------------------------------------------------------
व्यक्तिशः मला मुखपृष्ठ, सजावट, एकूण रंगसंगती आवडली नाही. >>> स्वाती आंबोळेंशी सहमत.

हे सर्व अपेक्षेइतके ग्रेसफुल झाले नाही हे वैम.

अंकाचं फक्त बाह्य प्रथमदर्शन घेतलं आहे,ते साधेपणातही मस्त उत्सवी मूड आणणारं वाटलं. संपादक मंडळ आणि अंकासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करून आता वाचायला सुरुवात करते.. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईनच.

विमान अपहरणाची गोष्ट वाचली. आवडली. बाकिचा अंक चाळला. मायबोलीवरचे लोकप्रिय लेखक बेफिकीर (अन्य कुणाची नावं राहून गेली असल्यास सॉरी ) यांची अनुपस्थिती जाणवली.

व्यक्तिशः मला मुखपृष्ठ, सजावट, एकूण रंगसंगती आवडली नाही. >>> स्वाती आंबोळेंशी सहमत.
हे सर्व अपेक्षेइतके ग्रेसफुल झाले नाही हे वैम.>> +१..

परंतू कंटेंट आवडतोय. लेख्/ललितं छान आहेत.. Happy

मस्त झालाय अंक! एक एक वाचतोय... मुख्यम्हण्जे टॅबवर सुद्धा छान वाचता येतोय! अभिनंदन Happy

आश्चिग (आशीष महाबळ),
लिनस पॉलींगची बायको, हेलेन पॉलींग, हिला पित्ताशयाच्या cancer झाला होता. prostate cancer बायकांना बहुदा होत नसतो, रे बाबा!! त्यांना prostate glands च्या ऐवजी Skene's gland असतात.

बाकी लेख उत्तम.

संपादक मंडळ, सर्व लेखक, कलाकार आणि इतर पडद्यामागचे कलाकार - सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन !!
बाकी अंकाबद्दल प्रतिक्रिया एकेक वाचून सावकाश देईन
>>>>+११११

कमी अवधी मिळाला असतानाही सुरेख अंक सादर केल्याबद्दल संपादक मंडळाचे विशेष कौतुक आणि आभार!
मुखपृष्ठाबद्दल स्वातीशी सहमत. एकंदर सजावट तेवढी कॅची नाही वाटली.
एकूण साहित्य पण कमी वाटलं यंदा.
बाकी लेख, कथा यांच्या प्रतिक्रिया त्या त्या ठिकाणी देईनच.

Pages