गाजर, फ्लॉवर, कांदा, फरसबी, बटाटा, वाटाणा, हिरवी मिरची, लवंगा, वेलची, दालचिनी, मेथी, मिरी, नारळाचं दूध, मीठ, हळद, पाणी, गरम मसाला, कोथींबिर, तेल, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची
गाजराचे आणि बटाट्याचे चौकोनी तुकडे करा. फ्लॉवरचे तुकडे करा. हिरवी मिरची, कांदा, फरसबी बारीक चिरून घ्या.
पाण्यात गाजर, फ्लॉवर, कांदा, फरसबी, हिरवी मिरची, बटाटा, मीठ आणि हळद घाला. कुकरमधून एक शिट्टी काढून शिजवून घ्या.
मग त्यात २ लवंगा, १ वेलची, दालचिनीचा तुकडा, अर्धवट कुटून मेथी, अर्धवट कुटून मिरी घाला. आणि पाणी आटेपर्यत शिजवा.
त्यात शिजवलेले मटारचे दाणे घाला. मिक्स करा.
नारळाचं दूध घालून ढवळा. हवं तर मीठ घाला. गरम मसाला घाला.
तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीची फोडणी करा. ती Stew वर ओता. कोथिंबीर घाला.
तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.
काजू पेस्ट अथवा खसखस पेस्ट घातल्यास Stew अधिक rich होतो.
छान प्रकार आहे. स्ट्यू हा
छान प्रकार आहे. स्ट्यू हा प्रकार आपल्याकडे युरपमधून आला. तिथे दाटपणासाठी नारळाचे दूध न वापरता कणीक किंवा मैदा वापरतात. फोडणीही नसते आणि तो शक्यतो ब्रेड्बरोबर खातात.
हे भारतीय व्हर्जनही चांगले आहे.
हो दिनेशदा, हा स्ट्यू खूप छान
हो दिनेशदा, हा स्ट्यू खूप छान लागतो. विशेषतः थंडीच्या दिवसात. पण ह्या रेसिपीकडे कोणी फिरकलेलं दिसत नाही![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हा केरळी प्रकार आहे. अप्पम
हा केरळी प्रकार आहे. अप्पम बरोबर खातात. ह्यात स्टार अनिस, जुलियन केलेले आलं घालून बघा, मस्त चव येते. प्लेटमध्ये अप्पम (मी उत्तपा करते) घेऊन, वरून दोन-तीन डाव हा स्ट्यू ओतायचा. स्ट्यूमध्ये भिजलेल्य अप्पमला भाज्या लावून खायच्या. कोथींबिर, हळद, गरम मसाला, कढीपत्ता, लाल मिरची, मेथी केरळी वर्जनमध्ये नसते.
स्वप्ना.... क्याक्या मस्त
स्वप्ना.... क्याक्या मस्त मस्त रेसिपीज टाकते आहेस...:)
संपर्कातून एक्मेल टाक बरं...
मस्त आहे, करायला नो कटकट
मस्त आहे, करायला नो कटकट स्टु.. करुन बघेन मीही. ऑफिसात अप्पम बरोबर खाल्लाय.
>>ह्यात स्टार अनिस, जुलियन
>>ह्यात स्टार अनिस, जुलियन केलेले आलं घालून बघा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढल्या वेळी नक्की.
साधना, खर्ंच करुन बघ. वर्षा मेल करतेच.