नारबा मासा किंवा त्याच्या तुकड्या कोळणीकडूनच कापून आणायच्या. (आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते. :स्मित:)
तुकड्यांना मिठ, मसाला, हळद लावून घ्या.
तवा चांगला गरम करा (अन्यथा तुकड्या चिकटतील) त्यावर शॅलो फ्राय करण्यासाठी तेल टाका. आता त्यावर जर आवडत असेल तर लसुण परवा. नंतर तुकड्या तळण्यासाठी सोडा.
५-६ मिनीटे मिडीयम गॅस वर शिजवून पलटवा व ती ही बाजू ४-५ मिनीटे शिजवून तुकड्या खरपूस तळून घ्या.
आता कोणी तुम्हाला विचारल की आज जेवायला काय? उपवास का? तर सांगा ना र बा
नारबा माश्याला सौम्य खवले असतात. मध्ये काटा. साधारण जिताडा, सुरमई ह्या गटामध्ये बसणारा. चवीला चांगला लागतो. रस्साही चांगला होतो.
लसूण तेलात तळल्याने तुकड्यंना लसूण फ्लेवर येतो थोडा. लसुण नाही टाकला तळलेल्या माश्यांना तरी चालतो. काही जण आल-लसुण पेस्टही मुरवतात व वरुन पिठ किंवा रवा लावतात. मासे कसेही केले तरी चविष्टच लागतात.
इतर माश्यांच्या रेसिपीस - http://www.maayboli.com/node/23836
अ रे.....बा प रे ...आ ता
अ रे.....बा प रे ...आ ता अजुन.. जागु अग दिवाळी करतेस कि नाहि ?
म स्त
जागू अगं बये किती त्या
जागू अगं बये किती त्या लोकांच्या जीभा चाळवशील्.:फिदी:
लोक हे पाहुन दिवाळीचा फराळ पण विसरतील्.:फिदी:
आख्खा आणुन घरी कापण्याचा
आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते. >>>>> कौतुकास्पद आहे हे
तोंपासु नेहमीप्रमाणेच...
तोंपासू
तोंपासू
अरे बापरे! हा मासा पहिल्यांदा
अरे बापरे! हा मासा पहिल्यांदा पाहिला + ऐकला.____/\____
मस्त! हा मासा पहिल्यांदा
मस्त!
हा मासा पहिल्यांदा पाहिला + ऐकला. >>>+१
धत्त तेरी! हा तर मासा आहे
धत्त तेरी! हा तर मासा आहे होय!
मला नारबाची वाडीतला नारबा आठवला.
मस्तच. 'नारबाच्या फोडी' भारीच
मस्तच. 'नारबाच्या फोडी' भारीच दिसतायत.
बाकी <<मासे कसेही केले तरी चविष्टच लागतात.>> २००% सहमत.
राहुल१२३ सेम पिंच. मलाही.
राहुल१२३ सेम पिंच. मलाही.
मासे ४६) नारबा >>> मी ते
मासे ४६) नारबा >>> मी ते वाचलं ' नानबा'
बाकी फोटो नेहमीप्रमाणेच टेम्टींग .
निव्वळ माशाचा ४६ वा प्रकार?
निव्वळ माशाचा ४६ वा प्रकार? कमाल आहे जागू तुझ्या चिकाटाची. तो मासा आणा, करा, फोटो काढा, इथे लिहा, (जेवणाच्या वेळी स्वतःच्या डब्यातला/ताटातला मिळमिळीत पदार्थ खात किंवा भुकेच्या वेळी धागा बघणार्यांचा रोष पत्करा ), इथल्या प्रतिक्रियांना उत्तरे द्या! किती तो पेशन्स!
मी जर कधी मासा/ त्याचे पदार्थ करु लागले तर तुझ्या या लेखांचा फार उपयोग होईल. लिहीत रहा! (मासे बनवत रहा आणि खात रहा!)
जागु ताई, ईथे आम्हि फार तर
जागु ताई, ईथे आम्हि फार तर ३-४ प्रकारात्ले मासे खातो, पण तुम्हि एथे तर सगळ्या प्रकारातलि मासळि आम्हाला खाय्ला घातलित.
ना र बा.. फक्त मधला काटा..
ना र बा..
फक्त मधला काटा.. वेरी गुड वेरी गुड..मग चालेल आम्हाला...
जागु मुळे कित्तीत्ती मासे कळतात.. जियो!!!
हाफ सेंच्युरी मार्राच आता!
हाफ सेंच्युरी मार्राच आता! काय मस्त दिसतंय ते. मी बहुधा बटाट्याच्या करीन... :धूम पळून जाणारा बाहुला:
जागू, इतकी मेहनत करण्यापेक्षा
जागू, इतकी मेहनत करण्यापेक्षा कोळीणी कडेच फोटो काढायचे. अक्खा, मग चिरताना वगैरे वगैरे.
घरी आणून साफ करणे, कापणे जिकरीचे काम आहे.
कसा लागतो हा मासा चवीला?.... माहित नसलेले मासे आणायला भिती वाटते. कारण काही माश्यांना चवच नसते. एकदम बेचव.... पांचट... मग सगळा मालमसाला फुकट.
कातिल
कातिल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
झंपी मासा चांगला आहे चविला.
बाजारात फोटो काढत बसणे शक्य नसते. एकतर गर्दी वर कोळणीला घाई.
आता कोणी तुम्हाला विचारल की
आता कोणी तुम्हाला विचारल की आज जेवायला काय? उपवास का? तर सांगा ना र बा >>>
कुठले कुठले मासे माहित आहेत तुला जागू! मस्त दिसतोय. अबतक ४६!!!
>>> कसा लागतो हा मासा चवीला?.... माहित नसलेले मासे आणायला भिती वाटते. कारण काही माश्यांना चवच नसते. एकदम बेचव.... पांचट... मग सगळा मालमसाला फुकट. >>>>> झंपी, जागू तर असल्या कोणत्याही माशांनाही चविष्ट बनवू शकते. बिंदास बनव तूही.
जागूतै, आतापर्यंत ज्या
जागूतै, आतापर्यंत ज्या माश्याच्या रेस्प्या मी वाच्ल्या त्यात बहुतेक ठिकाणी तू २ चमचे 'मसाला' असं दिलं आहे. या मसाल्यातच सगळी गोम असणार. त्याची ही कृती दे ना. कारण बाकी तसं मग काहीही विशेष तू वापरत नाहीस!
तेल, हळद, मीठ, स्पे. जागू मसाला, लसूण अन ४६ प्रकारचे मासे... = ४६ डिशेस!!
हा मासा पण सिझनल दिसतोय.
हा मासा पण सिझनल दिसतोय.
जागुले आत्ता आहे का
जागुले आत्ता आहे का बाजारात... तुझ्यामुळे बरंय नावं कळतात.. म्हंजे कोळणींसमोर भावबिव खायला बरं पडतं..
हां तिलाच काढून द्यायला सांगेन नाही तर उसन्या आणलेल्या ज्ञानाचं पितळ...
योगेश.. हि घ्या जागुच्या
योगेश.. हि घ्या जागुच्या मसाल्याची लिंक
http://www.maayboli.com/node/25739
धन्स योगिता. माझ काम हलक
धन्स योगिता. माझ काम हलक केल्याबद्दल.
योगेश मसाला तुम्ही थोड्या प्रमाणात घरी करू शकता.
मामी
हो वर्षूतै आत्ता आहे बाजारात नारबा. बिनधास्त भाव खाऊन घे. तुझा जागू सप्ताह संपला का?
तुकड्या छान दिसतायत.. पण
तुकड्या छान दिसतायत.. पण एकंदरीत दिसायला आवडला नाही हा फारसा.. !
हा मासा बघितलाय मी बाजारात.
हा मासा बघितलाय मी बाजारात. नारबा..... मला तर तो पिक्चरच आठवला एकदम.
जागू मस्तच आता हाच मासा
जागू मस्तच आता हाच मासा आणावा लागेल.
पराग आपण त्याला मेकअप करुया.
पराग आपण त्याला मेकअप करुया.
नुतन, साधना
नारबाची तुकडी या माश्यांची
नारबाची तुकडी
या माश्यांची असली चित्रविचित्र नावे जागुमुळे समजली आहेत.
जागु काल रात्रीच मी सुरमई चा
जागु
काल रात्रीच मी सुरमई चा एक तुकडा (चांगला मोठ्ठा) खाल्लाय.
तुझ्यामुळे, तुझ्यामुळे झालं हे सगळं
नारबा मासा किंवा त्याच्या
नारबा मासा किंवा त्याच्या तुकड्या कोळणीकडूनच कापून आणायच्या. (आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते.
कमाल आहे तुमची
इतके मासे आहेत हि माहिती मला तुझ्या मुळेच झाली
Pages