कल्याण-डोंबिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत बिल्डिंगमध्ये flat विकत घ्यायचा आहे.

Submitted by दिनेश चिले on 25 October, 2013 - 05:09

मला कल्याण-डोंबिवली या भागात बिल्डिंगमध्ये flat विकत घ्यायचा. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.
flat घेताना कोणती काळजी घ्यावी? बिल्डरची कोणती कागदपत्रे तपासावीत? जेणेकरून फसवणूक होणार नाही.
तसेच अशा भागात बिल्डर तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो. (१ वर्ष महानगर पालिकेकडून पाण्याची permission इ.) नंतर हात वर करतो, असा माझ्या मित्राचा अनुभव आहे. मला कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे. तसेच असा flat विकताना काही अडचणी येतात का? धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कल्याण-डोंबिवली या भागात बिल्डिंगमध्ये flat विकत घ्यायचा. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.>>>> दिनेशजी मला नाही वाटत की कल्याण-डोंबिवली मधील कुठलाही भाग आता ग्रामपंचयतीच्या हद्दीत येतो कारण कल्याण-डोंबिवली ही महानगरपालिका अस्तित्त्वात येउन बरीच वर्ष झाली आहेत. तुम्ही कोणत्या भागाबद्दल बोलत आहात ते स्पष्टपणे इथे नमुद केलत तर अधिक माहिती देता येईल.

१. श्रीगणेश नगर, मानपाडा रोड (डोंबिवली)
२. शंखेश्वर (डोंबिवली)
३. चिंचपाडा (कल्याण पूर्वे)
४. डोंबिवली इस्ट परिसर

१. श्रीगणेश नगर, मानपाडा रोड (डोंबिवली)
२. शंखेश्वर (डोंबिवली)
३. चिंचपाडा (कल्याण पूर्वे)
४. डोंबिवली इस्ट परिसर
हे सगळे भाग ग्रामपंचायतीत येतात? Uhoh
बाकीची माहिती तुम्हाला इतर माबोकर देतीलच परंतु मला अस वाटत की वरील भाग नक्की कोणाच्या अखत्यारित येतात हे नक्की माहित करुन घ्याव तुम्ही आधी. मला जितक माहित आहे त्याप्रमाणे वरील भाग ग्रामपंचायतीत येत नाहीत.

उल्लेख केलेले सगळे विभाग कडोंमपा मध्ये येतात. ग्रामपंचायतीत नाही.
आणि लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी कोणती तरी एकच स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असते.जिथे ग्राप असते तिथे मनपा नसते.

हो मुग्धा, डोंबिवलीचे बरेचसे भाग ग्रामपंचायत हद्दीत आहेत. MIDC, गांधीनगर, नांदिवली. इस्टला स्टेशनपासून स्टार कॉलनी आणि पाथर्ली वगैरेपर्यंत महानगरपालिका आहे.

गणेशनगरचे माहिती नाही पण शंखेश्वर नगर भाग ग्रामपंचायतीत येतो, गणेशनगर पुढचा भाग बहुतेक ग्रामपंचायत हद्दीत येतो. गांधीनगरचा अर्धा भाग महानगरपालिकेत येतो आणि पुढचा भाग आणि P & T कॉलनी ग्रामपंचायत हद्दीत येतो. गणेशनगर बहुतेक महानगरपालिकेत असेल.

अशा बिल्डिंगमध्ये flat घेताना कोणती काळजी घ्यावी. म्हणजे
१. बिल्डिंग १००% अधिकृत की अनधिकृत हे ओळखण्यासाठी बिल्डरकडून कोणत्या documents ची मागणी करावी.
२. कोणत्या documents बरोबर असल्याशिवाय flat विकत घेऊ नये.
कृपया मार्गदर्शन करावे.

दिनेश,

तुमचे प्रश्न पाहता तुम्हाला एखाद्या चांगल्या कायदेतज्ञाची गरज आहे.

इथे लोक सल्ले देतात ते त्यांच्या किंवा इतरांच्या अनुभवावरुन. त्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान असेलच असे नाही.

दिनेश, खरंच तुमच्या प्रश्नांची उत्तरे कायद्याचे जाणकार देऊ शकतात, पण मानपाडा-रोड भागात राहत असल्याने साधारण महानगरपालिकेची हद्द स्टार कॉलनीपर्यंत आहे हे माहितेय.

दोन गोष्टी विचारा

स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम सुरु करण्याचा दाखला (सी.सी.) आहे का?

काम पूर्ण झाले असल्यास भोगवटा प्रमाणपत्र (ओ.सी. )आहे का?

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मनपा किंवा जिल्हा परिषद.

हे दोन असल्यास इमारत अधिकृत असल्याची खात्री बाळगा.