सोन्याच्या खजिन्याचा शोध

Submitted by माशा on 17 October, 2013 - 11:02

सध्या रोज बातमी पत्रे देणा-या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून सोन्याच्या खजिन्याची बातमी सतत दिली जात आहे. लहानपणी वाचलेल्या खजिन्यांच्या गोष्टींची आठवण काढून आपण चकित व्हावे अशीच परिस्थिती.

थोडक्यात कळालेली माहिती अशी -
उत्तर प्रदेशातील उन्नाव या किल्ल्यात राव राम बक्श सिंह पुर्वी (१७ वे शतक ) राज्य करत होते.
कानपुर गावातील एक साधु शोभन सरकार यांचा असा दावा आहे की त्यांना स्वप्नात उन्नाव चे दिवंगत राजे राव बख्श सिंह दिसले. आणि किल्ल्याखाली १००० टन सोने ( सध्याच्या बाजारभावाने किंमत ३ लाख कोटी रु) आहे असे सांगितले. ( काही वाहिन्यांवर असे ही सांगत होते की स्वतः राव राम राजा घोड्यावरून फिरतो व स्वामींना भेटून खोद्काम करून खजिना ताब्यात घ्या व आपल्याला मुक्त करा असेही सांगतो )
स्वामींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. मंत्री चरण महंत दास व राज्यसभा सदस्य ब्रजेश पाठक शोभन सरकार यांचे शिष्य स्वामी ओम यांना भेटले.काही चाचण्या केल्यानंतर भूगर्भात काही धातुसदृश्य असल्याचा पुरावा भूगर्भ वैज्ञानिक व पुरातत्व खात्याला मिळाला आहे .
(हे धातुसदृश्य सोनेच असेल असे नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.) Sad
पुरातत्व विभागाने व सरकारने आता खोदण्याची सर्व तयारी केली आहे.
१८ ऑक्टोबर पासून खोदकाम चालू होईल.

या भावी १००० टन सोन्याच्या मालकी हक्कासाठी आत्तापासूनच वाद चालू झालेत.
राजाचे वंशज तिथे पोचले आहेत. काही गावांनी मालकी हक्कचे ठराव केले आहेत. अंतिमतः हा खजिना भारत सरकारचा असेल हे काल कोणतेतरी मंत्री एका वाहिनीवर सांगत होते.(नाव लक्षात नाही).
काहीजण दिल्लीतल्या नोक-या सोडून गावी परत आले आहेत. कारण आता गावाचा कायापालट होणार आहे.
शोभन सरकार यांनी असंही सांगितलं आहे की त्या जागी जर सोन्याचा खजिना मिळाला नाही तर
सरकार त्यांच्यावर देशद्रोहा चा खटला चालवू शकते.

हे सोने मिळाले की डॉलर व पौंडस ला रुपया खाली ढकलेल असं ही आज त्या साधूंचे शिष्य सांगत होते.
व भारत अमेरिका व ब्रिटन यांना मागे टाकेल.
एकूणच भारताची सर्व ददात मिटेल असं दिसतंय.:स्मित: मालामाल पर्मंनंटली Happy

प्रश्न असा आहे की एका स्वप्नाच्या आधारे सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे व खोदकाम चालू करणार आहेत.एरवी ' सरकारी काम आणि ६ महिने थांब 'अशी प्रवृत्ती असलेली यंत्रणा या मोहिमेला लगेच सिद्ध होते तेही एका स्वप्नावर विश्वास ठेवून. हे अचंबित करणारे आहे.
एकीकडे चंद्रावरच्या , मंगळाव्ररच्या मोहिमा केल्या जातात,आखल्या जातात.
तांत्रिकदृष्ट्या किती प्रगती होते आहे आणि दुसरीकडे एका स्वप्नाच्या आधारे अशी 'सोन्याच्या खजिन्याची शोध मोहीम' ही सरकारी खर्चाने हाती घेतली जाते.:अओ:

असा हा विरोधाभास. तुम्हाला काय वाटतं ?

काही लिंक्स -

http://hindi.pardaphash.com/news/--745180/745180.html

http://aajtak.intoday.in/story/spokesperson-of-baba-shobhan-sarkar-om-ba...

(तपशीलात काही त्रुटी असतील तर चुकभूल देणेघेणे).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरी सोनं मिळालच तरी त्याचा, भारताला सक्षम बनवण्यासाठी किती उपयोग होईल व राजकारण्यांना किती हा प्रश्नच आहे.

अगदीच कायच्या काय बातम्या आहेत याबद्दल येणार्‍या. आत्ता चॅनल सर्फिंगमध्ये एक न्युज चॅनलवाले त्या बाबा /महाराज/ साधु जे कोण आहेत त्यांनी सरकारला लष्कराला बोलवून लष्कराच्या मदतीने १०-१२ तासात खोदकाम करायला सांगितलंय म्हणे. Lol

अरे उत्खनन करताय ना, मग ते करायचं का आणि करायचं असल्यास कसं करायचं /कधी करायचं ते त्यातल्या तज्ञांना ठरवू दे की. हे असं ८-१० तासात उत्खनन कधी ऐकलं नव्हतं.

सोनं मिळो न मिळो, या निमित्ताने गावाचा कायापालट झाला तर छानच. खोदकाम करून त्यानंतर काय करायचे-म्हणजे शेती किंवा इतर विकास योजना ई. वर सरकारचा फोकस राहीलेला बरा.

माशा....

खरंच.... काय चमत्कारीक देश आहे. हा १००० टन सोन्याचा आकडा कसा काय अधिकृत मानला गेलाय याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा कुणी दिला ? तर १७ व्या शतकातील उन्नाव चे दिवंगत राजे राव बख्श यानी साधू शोभन सरकार यांच्या स्वप्नात येऊन दिला....आणि शोभन सरकारने सार्‍या यंत्रणेला कामी लावल्याचे चित्र दिसत आहे.

धमाल आहे सारा प्रकार....किती दिवस चालणार तेच पाहात बसायचे.

आता तर २५०० ट्न असल्याचे वाचले. अमेरिका पण वरुन लक्ष ठेवुन असेल काय गावतय काय नाही करत. मग कोर्टात पुढचे ५० एक वर्षे कोणाचा खजिना कोणाला द्ययचा तोपर्यंत अजुन एक स्वप्न....

काल सांगत होते, त्या साधूने मला स्वप्नं पडलं होतं असं मी म्हणालो नाही असा दावा केलाय. त्यांच्याकडे अस्सल कागदपत्रे, खजिन्याचा नकाशा आहे. हा खजिना १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात लपवला होता. तो नानासाहेब पेशवे यांच्या मालकीचा असून नकाशात दाखवल्याप्रमाणे तळघराची जागा आणि तिकडे जायचा रस्ता दिसून आलाय. ऐकावे ते नवलच असले तरी यात अविश्वास दाखवण्यासारखेही काही दिसत नाही म्हणूनच उत्खननाचे काम सुरू झाले असेल. स्वप्नाची अफवा हा खोडसाळपणा असावा. अशा स्वप्नावर आधारीत पुरातत्त्व खाते कसं काय काम हाती घेऊ शकेल हा साधा विचार आहे.
नानासाहेब पेशवे १८५७ ला भूमिगत झाल्यानंतर धारण केलेल्या अवताराबद्दल काही समजते तोच ही दुसरी रंजक आणि धक्कादायक माहिती कानी पडलीय. घोडामैदान जवळच असल्याने थांबूयात.

नानासाहेब पेशवे १८५७ ला भूमिगत झाल्यानंतर धारण केलेल्या अवताराबद्दल काही समजते तोच ही दुसरी रंजक आणि धक्कादायक माहिती कानी पडलीय.

>>

भुमिगत झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी कोणता अवतार धारण केला? म्हणजे पुढे त्यांचे काय झाले?

गमभन... जरा थांबा हो स्टोरी तयार होतेय (लिहताहेत लोकं... मग तो इतिहास वगैरे होइल) . हि फक्त स्टोरी लाइन आहे. Wink

MacKenna's Gold तसे ..peshava's Gold...

सगळा देश खणून काढा …. बरेच काही बाहेर येइल. …. लोकांचे मेंदू मशागत करायची वेळ आली आहे. … धमाल आहे सारा प्रकार....किती दिवस चालणार तेच पाहात बसायचे.

त्यांना स्वप्नात उन्नाव चे दिवंगत राजे राव बख्श सिंह दिसले.
>>

त्यांनी कसे ओळखले की हेच ते म्हाराज? काय आय डी प्रुफ दाखवले का त्यांनी स्वप्नात?

माझ्या स्वप्नात माझे पणजोबा, खापर पणजोबा वगैरे आले तरी मी त्यांना ओळखू शकत नाही कारण प्रत्यक्ष कधी पाहिलेच नाही ना त्यांना.
हे साधू मात्र काहीचा काही दावा करतात.

१००० टन मिळो किंवा १,००,००० टन सोने मिळो, आमच्या राजकारण्यांना ते कमीच पडणार.

"सरकार बताए, अर्थव्यवस्था सुधारने के लिए कितना चाहिए, शोभन सरकार उतना सोना पैदा कर देंगे"

एक अजुन आसाराम

भुमिगत झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी कोणता अवतार धारण केला? म्हणजे पुढे त्यांचे काय झाले? >>

नमस्कार गमभन.
आपल्याला माझी पोस्ट संपूर्ण वाचता येणे शक्य आहे का ? असेल तर या प्रश्नाचं उत्तर का द्यावं हे समजेल का ? म्हणजे तुम्ही हा प्रश्न का विचारलाय हे थोडंफार लक्षात येईल.

असो,

मी तुमची पोस्ट परत एकदा वाचली. माझा प्रश्न या खालील वाक्याशी संबंधित आहे.

"नानासाहेब पेशवे १८५७ ला भूमिगत झाल्यानंतर धारण केलेल्या अवताराबद्दल काही समजते तोच"

नानासाहेब पेशवे भुमिगत झाल्यानंतर त्यांचे काय झाले? याविषयी काही माहिती मिळाली आहे का?
यावर काही संशोधन झाले आहे का?

आपणास काही माहिती असेल तर सांगाल का?

कुठल्याच वादात पडण्याची किंवा ओढवून घेण्याची इच्छा नसल्याने उल्लेख केलेला नाही. असं काही तरी गेल्या आठवड्यात कानी आलं आणि अचानक ही बातमी या योगायोगाचं नवल वाटलं हेच फक्त सांगायचं होतं. जर काही लिखीत स्वरूपात असतं तर उल्लेख केला असता. त्या विषयी एक पुस्तक पण आहे असं ऐकून आहे. पण इथं एक ओळ लिहायची, मग कुणीतरी सिद्ध करा म्हणणार, मग हातातली महत्वाची कामं सोडून शोधाशोध.. एव्हढं करूनही भिंग घेऊन चुकतंय कुठं हे तपासणा-यांच्या पोष्टी, मग त्यांच्या मल्लिनाथ्या ! केव्हढं रामायण होतं ना ? त्यापेक्षा नकोच ते ! म्हणूनच घोडामैदान जवळच असल्याने थांबूयात असं म्हटलं होतं..

उत्तर प्रदेशात व केंद्रात दोन्ही ठिकाणी चक्क "सेक्युलर" सरकार असूनही अशा स्वप्नांवर विश्वास ठेवायला लागले?अंधश्रद्धा रे, अंधश्रद्धा !!! Light 1 Wink Proud Lol Biggrin Rofl

सर्वांचे धन्यवाद.

चला, पहिली कुदळ मारलेली आहे.
आता साधुमहाराज म्हणतात की सोने नाही मिळाले तर आपले डोके उडवा.:अओ:
उन्नाव गावात जत्रासदृश्य स्थिती झाली आहे.ठिकठिकाणी खाण्यापिण्याचे स्टॉल्स (जिलबी,
गुलाब जाम,ब्रेड पकौडे Happy ) जोरात चालू आहेत.

परदेशी मिडिया ही दाखल. (जर खजिना नाही मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा काय होईल ? )
१४४ कलम लागू केले आहे. सोने सापडावे म्हणून वेगवेगळे होम/पुजाअर्चा सुरु आहेत. खजिन्याची नुसती झलक जरी मिळाली तरी २०० मीटर चा परिसर 'नो मॅन्स लॅन्ड' घोषित होणार आहे म्हणे.

अजून २५०० टन सोन्याचे आज कळाले (अबॉबॉबॉ ! काय खरं नाही भारताचं आता :हाहा:).
असो, मी ही आज वाचले ते नकाशाचे. पण सगळीकडे स्वप्नाचेच सांगत आहेत.

>> ऐकावे ते नवलच असले तरी यात अविश्वास दाखवण्यासारखेही काही दिसत नाही म्हणूनच उत्खननाचे काम सुरू झाले असेल. >> Lol

जरी नकाशा असला तरी किल्ल्याखाली सोने आहेच याचा तो पुरावा ठरतो का ? नेमके १००० टन आहे हे कसे कळले ? जर नाही मिळाले तर कुणावर कारवाई होणार का ? पुरातत्व खाते संबधितांकडून खर्चाची नुकसान भरपाई घेणार का ? नाही मिळाले तर सरकारची , पुरातत्व खात्याची आणि भाबडया जनतेची फसवणूकच नाही काय ?

आणि साधू महाराज आजपर्यंत का गप्प बसले होते? राजाच्या वंशजांना काहीच माहिती नव्हती का?
राजाने आपल्या मुले ,नातवडांना सोडून यांनाच कसे सांगितले ?

पुरातत्व खाते असे स्वप्नावर विश्वास ठेवून काम करते का ? (वरदाताई अधिक माहिती देऊ शकतील :स्मित:)

जरी नकाशा असला तरी किल्ल्याखाली सोने आहेच याचा तो पुरावा ठरतो का ? नेमके १००० टन आहे हे कसे कळले ? जर नाही मिळाले तर कुणावर कारवाई होणार का ? पुरातत्व खाते संबधितांकडून खर्चाची नुकसान भरपाई घेणार का ? नाही मिळाले तर सरकारची , पुरातत्व खात्याची आणि भाबडया जनतेची फसवणूकच नाही काय ? >>>

किमान माझ्या प्रतिसादात तरी नकाशा आहे हा सोने असण्याचा पुरावा आहे असं म्हटलंय का ?
नेमके १००० टन आहे हे कसे कळले ? >> उत्खननाशिवाय या दाव्याची सत्यता कळणार आहे का ? असल्यास सुचवणार का प्लीज ?
जर नाही मिळाले तर कुणावर कारवाई होणार का ? >> पुरातत्व खाते जेव्हां एखादी मोहीम हाती घेते तेव्हां प्रत्येक वेळी काही न काही सापडतेच असं म्हणायचंय का ? तसं असल्यास त्यांनी हे काम का हाती घेतलं ?
कालच्या स्टार न्यूजच्या वार्तांकनाप्रमाणे नकाशा आणि इतर अस्सल कागदपत्रे त्यांच्याकडे असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. असं असेल तर मोहीमेसाठी हा बेस नाही का होऊ शकत ?

जरा दम धरा. समजून घ्या आणि मग तुटून पडा ना... घाईच खूप. सगळ्यांनाच ! Lol

हे खरं आहे काय?? माझ्याकडे टिवी नाहीय सध्या त्यामुळॅ असल्या सुरस आणि चमत्कारीक बातम्या मला पाहायला मिळत नाहीयेत..... खरेच खरं आहे हे सगळं?????

१००० टन सोनं आणि तेही नानासाहेब पेशव्यांनी लपून ठेवलेले वा. छानच. सापडले तर बरे, नाही तर निदान त्या किल्याची डागडुजी तरी करा त्यानिमित्ताने. पुण्यातही अनेक पेशवेकालीन वाड्यांखाली खजिना असल्याचे सांगतात. महाराजांना पुण्यातील काही स्वप्न पडतात की नाही टिव्ही चॅनलवाल्यांनी विचारायला पाहिजे.
Biggrin

आयला, आम्हाला गुंजभर सोनं कुठं सापडत नाही. उलट आहे ते किडूक मिडूक हरवल्याची स्वप्ने पडतात. आणि लोकांना बघा स्वप्नात हजार हजार टन सोन्याचे दृष्टांत होतात, तेही दोन दोन वेळा...
Happy

मागे रामदेवबाबांना देखील स्वप्न पडले होते की स्विझ बँकेत देशाचे लाखो-करोडो रुपये पडले आहेत. त्याचे काय झाले?

ते पैसे परत येणार का?

माज्या बी स्वपनात एक लय भारी म्हाराज्जा आलेला काल् च्या रात्च्या टाईम्ला .. त्यो म्हण्तुया त्यांच्या अत्ताच्या "योनीत" एप्रिल फुल्ल नावाच कायतरी कार्यक्रम चालु आहे बघा.. तवा कार्यक्रमामंदी त्यो त्या सरकार्ला की फरकार ला फुल्ल एप्रिल फुल्ल बनवले

Pages