शिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का?

Submitted by खोचाकराव on 17 October, 2013 - 09:13

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझे जे काही थोडे फार वाचन झाले आहे त्या वरून असे लक्षात येते की महाराज हे देवभक्त होते. ते ज्या मोहिमेवर जात तेथे जाताना मार्गातील देवी देवतांचे दर्शन घेत. पण महाराज पन्हाळ्याला जात येत असता ते कधी अंबाबाईच्या दर्शनाला आल्याचे वाचनात आले नाही.
म्हणून हे प्रश्न माझ्या मनात आले ..

१. शिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का?
२. पन्हाळ्याला जाण्याची वाट वेगळीकडून होती का (कराड - वारणा वगैरे )

माझ्या या शंकांचे कोणी निरसन करेल का.........

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी महाराज कदाचित आले ही असावेत पण पन्हाळ्याला जायला कोल्हापूरवरूनच जावे असे नाही. पन्हाळा -विशाळगड - रायगड / राजगड असाही रस्ता आहे. शिवाय विश्रांतीसाठी ग्राउंडलेवलला राहण्याऐवजी किल्यावरच राहने जास्त असायचे. (सिक्युरिटी) त्यामुळे भेट दिली असली तरी ती फक्त देवीला वगैरे असावी.

कोल्हापूरचे महत्व वाढले व एक पाती तिकडे गेली.

हो केदार
पण महाराज देवीला येऊन गेलेत याचा इतिहासात कुठे उल्लेख आहे का हे मला विचारायचे होते.

>>>> पण महाराज देवीला येऊन गेलेत याचा इतिहासात कुठे उल्लेख आहे का हे मला विचारायचे होते. <<<<<
तत्कालिन बखरकारान्ना/सचिवान्ना कदाचित कल्पना आली नसेल तेव्हा की तिनशेसाडेतिनशे वर्षानंतर कुणी खोचकराव, अंबाबाईच्या दर्शनाला शिवाजी महाराज आले की नाही याची वास्तपुस्त घेईल, त्यान्ना तशी भविष्याचि कल्पना आली असति तर त्यान्नी शिलालेखच लिहून ठेवला अस्ता, नै का? Wink
बायदिवे, मागल्याच महिन्यात "थोरले साहेब" कुठेकुठे गेले, कुणाकुणाला भेटले, याची काही खबरबात आहे का तुमच्याकडे? असेल तर द्या बोवा, बिनविरोधाचे रहस्य तरी उलगडेल म्हण्तो मी! Proud

कृपया डॉ. रा. चिं. ढेरे यांचं 'करवीरवासिनी श्रीमहालक्ष्मी' हे पुस्तक वाचा.
मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Karavirnivasinee-Shreemahalakshmi.html

भारतात तीनशे रुपयांहून अधिक खरेदीवर शिपिंग मोफत.

अंबामाता म्हाराजांच्या हृदयात होती आणि ते तिच्या हृदयात होते.

मग आता ते भेटले की नाही, याची चिंता बाकीच्या पामरांनी का करावी?

लिंबूटिंबू,
मला माहिती हितेक की आशा काही प्रतिक्रिया येणार....
पण मला खरोखर जिज्ञासा आहे म्हणून का खटाटोप....
बाकी तुमचे चालुद्या ..... Happy

limbutimbu Proud