Submitted by HemangiPurohit on 16 October, 2013 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
ब्रेड, custered पावडर , थोडेसे तूप, दूध साखर
क्रमवार पाककृती:
ब्रेडच्या कडा काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. अगदी थोड्या तुपावर परतून घ्यावेत. खुसखुशीत झाले की डिशमध्ये काढावेत.
दुध तापत ठेवावे. जरासे कोमट झाल्यावर त्यात हळूहळू custered पावडर मिक्स करावी. सतत हलवत राहावे नाहीतर गुठळ्या होतात. साखर घालून ढवळावे. थोडेसे घट्ट झाले की खाली उतरवावे.
एका बाउलमध्ये ब्रेडचे तुकडे घालून त्यावर तयार custered हळूहळू घालावे.
अधिक टिपा:
३ जणांसाठी साधारण अर्धा लिटर दुध पुरेसे आहे.
माहितीचा स्रोत:
लहान असल्यापासून आई बनवून द्यायची. आता मी बनवते.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह, करुन बघणार. फ्रिजात बरीच
वाह, करुन बघणार. फ्रिजात बरीच कस्टर्ड पावडर आहे.
छान.
छान.
छान आहे, शाही तुकडा म्हणतात
छान आहे, शाही तुकडा म्हणतात ती हिच रेसिपी का? ती पण अशीच असते अस वाटतय.
सोपी आणि मस्त
सोपी आणि मस्त
छान. करुन बघते आता.
छान. करुन बघते आता.
रेसिपी छान सोपी दिसत
रेसिपी छान सोपी दिसत आहे...
करून बघीतल्या जाईल...
सर्वांना धन्यवाद. @ अनुश्री
सर्वांना धन्यवाद. @ अनुश्री :- शाही तुकडा पण म्हणतात पण पहिल्यापासून आम्ही याला custered ब्रेडच म्हणतो.
हेमांगी, छान आहे. करुन बघायला
हेमांगी, छान आहे. करुन बघायला हवी.
शाही तुकडा करतांना आटवलेले
शाही तुकडा करतांना आटवलेले दूध सुकामेवा घालून पण करतात.
Custard. सोपी आहे. शाही तुकडा
Custard.
सोपी आहे. शाही तुकडा मध्ये साखरेचा पाक वापरतात.