ओल्या वालाचे दाणे पाव कि.
प्रत्येकी ५ ते ६ फोडी रताळी, कोनफळ, बटाटे, वांगी, अलकोल
५ ते ६ शेवग्यांच्या शेंगा
टोमॅटो (कच्चे अजुन चांगले),
मिरची, कोथिंबिर, आले, लसुन, मिरच्या (५-६) ओल खोबर्याचे वाटण
दाण्याचा कुट
तेल ३ पळ्या
चवीपुरते मिठ
आवडत असल्यास थोडासा गुळ.
१ चमचा गरम मसाला.
फोडणी साठी राइ, जिर, हिंग, हळद
पातेल्यात तेल गरम करावे. त्यात वरील फोडणी टाकुन वाटण टाकावे. त्यावर वालाचे दाणे टाकुन सर्व भाज्या टाकाव्यात, गरम मसाला टाकावा. व पातेल्यावर झाकण ठेउन वर पाणी ठेवावे म्हणजे वाफेवर ही भाजी शिजते. मधुन मधुन भाजी ढवळावी. गरज वाटल्यास थोडे पाणी टाकावे. जरा शिजत आल्यावर टोमॅटो टाकावेत. मग मिठ गुळ व दाण्याचा कुट टाकावा. वालाचे दाणे शिजले का बघावे व गॅस बंद करावा.
ह्या भाजीसाठे पातेले जरा मोठेच घ्यावे म्हणजे ढवळायला चांगले मिळते.
मसाला टाकत नसल्यामुळे वाटणात मिरच्या जास्त घ्याव्यात.
ही भाजी माझ्या माहेरच्या एरियामध्ये महाशिवरात्रिच्या दिवशी सगळ्या घरात असते. ह्या दिवशी भात व चपाती करत नाहीत. मोठे पातेले भरुन भाजी करतात व नुसतीच खातात.
माझ्या सासरी ह्या दिवशी उपवास असतो. पण केवळ भाजी खायची असते माहेरी जाउन म्हणुन मी उपवास करत नाही. खुपच चविष्ट लागते ही भाजी. भाकरी बरोबर पण छानच लागते.
मी आज केली आहे.
जागु,
जागु, मस्तच आहे गं भाजी.
पण महाशिवरात्रीसाठी भाजी पहिल्यांदाच ऐकतेय. शिवरात्रीचा उपास दुस-याच दिवशी सोडतात असे ऐकलेय.
साधारण अशीच कृती उंधियोची आहे. आता येतोय उंधियो सिजन.. माझा खुप आवडता प्रकार आहे.
अग उपवासच
अग उपवासच असतो सगळीकडे पण माझ्या माहेरच्या गावची ही प्रथा आहे.