माझा portfolio कसा तयार करु?
माझ्या मित्राच्या मित्राने मला एक प्रश्न विचारला.
किती रु. गुंतविल्यावर तो शेअर बाजारात नफा कमवु शकेल? माझा portfolio कसा तयार करु?
पहील्या प्रश्नाचे माझे उत्तर कितीही अगदी १००० रु पासुन ते करोडो रु. पर्यंत. खरे तर मला ही ह्याचे उत्तर माहीत नाही. पण एक विचार असा की जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती ही सर्व शेअर्स घेउ शकत नाही. त्यामुळे आपल्या limits ओळखुनच शेअर बाजारात उतरावे.
एकदा का लिमीटस सेट केल्या की how much is enough? हा प्रश्न राहात नाही.
Ideal Portfolio कसा असावा ह्या साठी मात्र मी त्याला खालील सल्ला दिला.
त्या साठी त्याला काही प्रश्न विचारले, जसे की समजा त्याचे १००० रु. पाकीटातुन कुठेतरी पडले तर त्याला काय वाटेल. तो त्याचा गुंतनुकीच्या किती टक्के घालवायला तयार आहे. ( Risk taking ability , त्याचा शेअर मार्केट मध्ये येन्याचा उद्देश काय आहे? ( सट्टेबाजी की गुंतवनुक). त्याला बाजारातुन मिळनारा परतावा परत गुंतवायचा आहे की काढुन घ्यायचा आहे. हे सर्व प्रश्न विचारल्यावर तो म्हनाला तु income tax officer आहेस का? मी त्याला म्हनालो बाजार तेजीत आहे तो पर्यंत तु मला मी सांगीतलेल्या शेअर्स साठी thanks म्हनशील पण एकदा का बाजार पडला, तु मला शिव्या देशील म्हनुन ही विचारना.
आपण किती विचार करतो आपल्या investments चा? पण मग investment करने म्हनजे पोटाला चिमटा काढुन पैसे वाचविने का? तर नाही. (माझ्या बायकोलाच विचारा मी किती उधळा आहे ते, बिचारी परेशान असते माझ्यामुळे.)
परत विषया कडे वळुयात. portfolio strategy किती जण करतात?
investors हे साधारण तिन प्रकारचे असतात.
१. रिस्क टेकर
२. मिडियम रिस्क टेकर
३. लो रिस्क टेकर.
पहीला प्रकारात गुंतवनुक कशी असावी. ह्या प्रकारच्या व्यक्तींना एकाच दिवशी खुप मोठा तोटा झाला तरी त्यांना काही वाटत नाही कारण त्यांचा बाजार या प्रक्रिये वर विश्वास असतो.
साधारण ७० ते ८० टक्के शेअर्स व २०ते ३० टक्के mutual funds अशी यांचा पैशांची वाटनी असते. असनारे MF पण equity diversified किंवा sectoral MF असतात.
दुसर्या प्रकारात ही विभागनी ४० टक्के शेअर्स, ४० टक्के Mutual funds व २० टक्के Fixed deposits असते. तर तिसर्यात साधारण ३० टक्के MF , ६० टक्के fixed व जमले तर शेअर बाजार थोडेफार पैसे अशा वृतीचा हा गुंतवनुकदार असतो.
शेअर पोर्टफोलीओ कसा असावा यावर बर्याच जनांनी मत दिले आहेत, मला तो असा असावा वाटते. आपल्या जवळील असनारे भाडंवल असे गुंतवावे.
१. IT companies सुज्ञास सांगने नको.
२. Financial कंपन्या जसे की banks . एखादी तरी बैन्क असायलाच पाहीजे. Interest rate hike झाले तरी फायदा नाही झाले तरी फायदा (खुप लोक लोन घेतील).
३. oil compnay पेट्रोल व गैस चे भाव कमी झालेले ऐकले आहे का?
४. Power- Utilities . अमेरिकेत हे शेअर घेउ नका पण भारतात portfolio त power असायलाच पाहीजे, अजुन खुप growth आहे ह्या क्षेत्रात.
५. FMCG जसे की ITC लोक सिगरेट पिने थांबनार नाहीत. somebody has to make money why not you.
6. auto परत एकदा भारतात auto industry अजुन mature नाहीये त्यामुळे खुप growth आहे.
७. Infra. stocks जसे की स्टील, सिंमेट वैगरे. कालच मनमोहनसिंगानी घोषना केली की १० की १२००० कोटी रु रस्त्यांसाठी दिले जातील. ह्याचाच दुसरा अर्थ हा आहे की cement, metels ची demand वाढनार आहे.
portfolio हा diversified असावा.सगळ्या sectors चे शेअर्स असावेत. तसेच portfolio नेहेमी balance करावा जेने करुन sectoral imbalance टाळता येईल.
छान माहिती.
छान माहिती.
अरे वा.. हा असा धागा होता हे
अरे वा.. हा असा धागा होता हे माहितच नव्हते. वर मनमोहनसिंगांचे नावच्वाचुन बुचकळ्यात पडले आणि नंतर तारिख बघितली
>>oil compnay पेट्रोल व गैस
>>oil compnay पेट्रोल व गैस चे भाव कमी झालेले ऐकले आहे का>><<
पहा, हे सुद्धा आक्रित घडलय आता.
पोर्ट फोलिओ बद्दल आणखी काही अपडेट्स देता येतील का?
२००६ चा धागा २०१५ ला वर?
२००६ चा धागा २०१५ ला वर? प्रभअगाद्ग्ध्लीला अगाध है