व्हेज लसान्ये - ओव्हनशिवाय

Submitted by इडली on 13 October, 2013 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) लसान्ये Sheets - ६
२) पालक - १ जुडी
३) ब्रोकोली - १
४) लसुण - ४ पाकळ्या
५) टोमॅटो - १
६) कांदा -१
७) चीज (Mozzarella, Parmesan आवडीप्रमाणे )
८) मिरपुड
९) बसिल (dried basil )
१०) Parsley
११) टोमॅटो केचप
१२) तेल (olive oil )
१३) मीठ

क्रमवार पाककृती: 

सॉस बनविण्याकरता -

तेल गरम करुन चिरलेला लसुण, कांदा थोडा परतून घ्या. त्यात चिरलेला टोमॅटो, मिरपुड, बसिल ,Parsley , मीठ आणि टोमॅटो केचप घालून परतून सॉस तयार करा.

------------------------------------------------------------------------------------------

मुख्य पाककृती

एका पॅनमधे भरपूर पाणी घालून लसान्ये Sheets उकडून घ्या. Sheets मऊ झाल्या की गार पाण्यात घालून ठेवा म्हणजे Sheets एकमेकांना चिकटत नाहीत.

दुसर्‍या एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेला लसूण थोडा परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला पालक परतून घ्या. (पालक पूर्ण शिजवायची गरज नाही.) पालक वेगळा काढून ठेवून त्याच पॅनमधे तेल गरम करुन ब्रोकोली परतून घ्या.

तयार केलेला सॉस एका मोठ्या Non-stick पॅनमधे, २ चमचे पसरवा आणि त्यावर २ लसान्ये Sheets ठेवा. त्या Sheets वर परत थोडा सॉस लावून त्यावर ब्रोकोली घाला. ब्रोकोलीवर किसलेले चीज घाला. त्याच्यावर अजून २ लसान्ये Sheets ठेवा. २ चमचे सॉस लावून त्यावर पालक घाला. पालकावर किसलेले चीज घाला. त्याच्यावर अजून २ लसान्ये Sheets ठेवा.या Sheets वर थोडासे सॉस लावून चीज, थोडी मिरपूड, dried basil, Parsley घाला.

पॅन नीट झाकुन गॅस वर १०-१५ मिनिट गरम करत ठेवा. २-३ मिनिट पॅन तसाच झाकुन ठेवा.

लसान्ये नीट कापुन लगेचच खा.....

- आवडीप्रमाणे Sheets आणि इतर भाज्या कमीजास्त करू शकता.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. हे वेज लसान्ये शीट्स कुठे मिळतील, डोंबिवलीत मिळतील का? काहीच माहिती नाही मला म्हणून विचारते.

chhan. thoDyaa pramaaNaat karaayache asel tar mala oven vaaparaNe gairasoyeeche hote. haa prakaar chhaan aahe.

छान दिसतोय Happy

इथे पस्ता ची रेसिपी आहे त्याप्रमाणे पास्ता डो बनवुन लाटुन त्याच्या बारीक पट्ट्या कापायच्या ऐवजी आयताकृती कापुन (२ इंच X ३ इंच ) लसान्या
शीट्स बनवता येतिल.