उपवासाचे आप्पे

Submitted by मुग्धटली on 12 October, 2013 - 03:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या भगर/ वरईचे तांदुळ
१/२ वाटी साबुदाणा
हिरवी मिरची पेस्ट
जिरे
दाण्याचा कुट
मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम भगर व साबुदाणा वेगवेगळ्या भांड्यात ७-८ तास भिजवुन ठेवा. नंतर भगर व साबुदाणा एकत्रितपणे मिक्सरमधुन वाटुन घ्या व रात्रभर आंबण्यासाठी ठेउन द्या. तयार मिश्रणात हिरवी मिरची पेस्ट, दाण्याचा कुट, मीठ, आवडत असल्यास जिरे घाला.
Photo0083.jpg

आप्पेपात्र गरम झाल्यावर त्यात तेल/तुप सोडुन आप्पे लावुन घ्या. आप्पेपात्रावर झाकण ठेउन सुरुवातीला थोडा वेळ आप्पे तयार होउ द्या. थोड्या वेळाने झाकण काढुन सुरीच्या सहायाने अलगद आप्पे उलटुन घ्या.
Photo0084.jpg
आप्प्यांच्या बाजुने थोड तेल/तुप सोडा.
सोनेरी रंग आल्यावर तयार आप्पे चटणी बरोबर सर्व्ह करा.
Photo0085.jpg

वाढणी/प्रमाण: 
पोटभर आप्पे तयार होतात
माहितीचा स्रोत: 
आंतरजाल अर्थात इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरमँगनेट झाल्यावर हिरवी मिरची पेस्ट, दाण्याचा कुट, मीठ आणि जिरे घातलेल मिश्रण
Photo0083.jpg

आप्पेपात्रात एका बाजुने तयार झालेले आप्पे
Photo0084.jpg

या रे सगळेजण आप्पे खायला ओल्या नारळाच्या चटणी बरोबर
Photo0085.jpg

पाकृमध्ये फोटो देता आले नाही म्हणुन प्रतिसादात दिले आहेत. पाकृ कसे टाकायचे ते सांगा प्लिज

@ मुग्धा ताई...

लेखात शक्यतो इंग्रजी शब्द कमीत कमी वापरावे असे मला वाटते...

उदा. : फरमँगनेट (ह्याला आंबवणे हा चांगला शब्द आहे की)

माबोच्या आप्पे सीरीज मधे आणखी एक चविष्ट भर Happy

फरमॅंगनेट?? Uhoh असा काही शब्द नाहीये हो इंग्लिशमधे. तुम्हाला फर्मेन्ट म्हणायचंय बहुदा (आंबवणे)

पून्हा आप्पे?>>>> याआधी कोणी दिले होते का? मी माबोच्या या बाफवर शोधले पण मला नाही मिळाले कुठेही.....

.

मुग्धा, जसे प्रतिसादात दिले तसेच फोटो लेखात देता येतात. ते HTML Tags कॉपी करा प्रतिसादातून आणि लेखात टाका.

प्रतिसादातले फोटो काढुन टाकायचे आहेत कुणाला सांगायच??? उत्तर देताना ती उपयुक्त लिंकसुद्धा द्यावी हि विनंती