Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
लोणचे आहे. आठवडाभर अगदी फ्रीजबाहेरही टिकेल.. तेव्हा..
माहितीचा स्रोत:
गोव्यातला पारंपारीक पदार्थ.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सॉलीड लोणचे आहे, तोंडाला
किती सॉलीड लोणचे आहे, तोंडाला पाणी सुटले फोटो बघून, करायला हवं. दिनेशदा तुम्हाला खरंच --^--
तुमच्या पोतडीत काय एकेक पदार्थ असतात.
चते चहीका चंगलेचा चगतला
चते चहीका चंगलेचा चगतला चहीना..
<<
चनेशदि, चम्हांलातु चसेक चहितीमा ? चकूनऐ ?
हे म्हणजे तुकड्यांच्या आकारातलं भरीत नाहीये का ?
चटणाचेम चकडेतु चळूनत चनचछा
चटणाचेम चकडेतु चळूनत चनचछा चगतला चसतीलअ. चच्यातत्या चखरसा चंवाकी चळगू चलूघा चयेन. चहितरना चक्कारबे चगणारचला. चत्या चडाच्याचगो क्षविनेचच चचित्या क्षवच चर्लीमा चलीगे चसेलअ.
फोटो भारी आहे. (मला मुळात
फोटो भारी आहे.
(मला मुळात लोणचे हे आंबट फळांचेच असते आणि असावे हे डोक्यात/जिभेवर पक्के बसले आहे आणि तेच पटते त्यामुळे गाजर किंवा अन्य कोणत्याही अआंबट गोष्टींचे लोणचे काही आजवर रुचलेले नाही.)
आणि आता नीट बोला सगळे. ही काही चायबोलीमा आहे का?
फोटो वरून तर फारच भारी दिसतंय
फोटो वरून तर फारच भारी दिसतंय हे प्रकरण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंग्रो मध्ये पाठकचे ब्रिंजल
इंग्रो मध्ये पाठकचे ब्रिंजल रेलिश मिळते ते पण फार मस्त लागते.
मिलिंदा, मी ४ वर्षांचा
मिलिंदा, मी ४ वर्षांचा असेपर्यंत नॉन व्हेज खात होतो. सगळ्या चवी लक्षात आहेत. ( कुणी फसवू शकत नाही. )
इब्लिस, व्हीनीगरसोबत थोडी साखर वा गूळ वापरला तर स्वाद खुलतो. हॉटेलमधे मॅरीनेट करताना मध वापरतात.
गजानन, शांकली.. या प्रकारे करून बघाच.
वॉव... किती अमेझिंग दिस्तंय
वॉव... किती अमेझिंग दिस्तंय लोणचं...
घसा लायनीएवर आला कि नक्की करुन पाहणार..
दिनेश धन्य आहेस!!! ___/\___
मस्तंच दिसतंय. करून बघायला
मस्तंच दिसतंय.
करून बघायला हवं.
चनेशदि, चम्हांलातु चसेक
चनेशदि, चम्हांलातु चसेक चहितीमा ? चकूनऐ ? >> मी हेच विचारणार होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या सा.बा करतात. आता मी पण या पद्धतीने करुन बघते.
भारी प्रकरण दिसतय फोटोवरून
भारी प्रकरण दिसतय फोटोवरून
कशाला हो करता तुम्ही इतके
कशाला हो करता तुम्ही इतके पदार्थ? करता ते करता, वर आम्हाला का बरं सांगता आणि दाखवता? नसता त्रास उगीच! काही चांगलंबिंगलं लागत नसेत ते, करूनच बघणार नाही म्हणा... पण इकडे याल तेव्हा चवीपुरतं बरणीत घेऊन या थोडं, बरं वाटलं, आवडलं तर करीन.
मस्तच लागत असेल... नक्की
मस्तच लागत असेल...
नक्की करून बघीन..
आभार दोस्तांनो. सई, इथे
आभार दोस्तांनो.
सई, इथे दाखवलं नाही तर माझ्या पोटात दुखतं ना !
आई गं..........नक्कीच करुन
आई गं..........नक्कीच करुन बघावं लागेल इतकं पाणी सुटलंय तोंडाला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भारीच एकदम! फोटो तर लय म्हणजे
भारीच एकदम! फोटो तर लय म्हणजे लयच भारी.
व्वा! तों.पा.सु.
व्वा! तों.पा.सु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वांगं ? आणि लोणच्यात? (वांग
वांगं ? आणि लोणच्यात? (वांग फक्त भरतातच आवडणारा बाहुला) केलॉग्जच्या जाहीरातीच्या चालीवर वाचावे हे वाक्य.
दिनेश, फोटो मस्त आलाय पण तो बघून तोंडाला अजिबात पाणी सुटलं नाही. असं पहिल्यांदाच घडत असावं तुमच्या पाकृच्या बाबतीत
(कारण वर दिलंच आहे)
तुमच्या फोटोमध्ये किती छान
तुमच्या फोटोमध्ये किती छान दिसते, पण हेच पदार्थ मी घरी केले की वेगळेच दिसतात (अशक्त, मरगळलेले वै.)
नवर्याच्या हातात टाकलेल्या तारा काढल्या की करून बघणार.
रच्याकने- जखम असेल किवा हाडात रॉड, तारा घातलेल्या असतील तर वांग, वाल ई. सारखे पदार्थ खात नाही ना वातुड असतात म्हणून.
काल ती रोटीकी टोकरी आणी आज हे
काल ती रोटीकी टोकरी आणी आज हे चटकदार लोणचे. तोंपासु. मला भरले वांगे पण आवडते. करणार्.:स्मित:
फोटो तोपासु. मस्त आहे लोणचे.
फोटो तोपासु.
मस्त आहे लोणचे. करुन बघेन.
हे म्हणजे तुकड्यांच्या
हे म्हणजे तुकड्यांच्या आकारातलं भरीत नाहीये का ?>>>
आणि तीळ, व्हिनेगर भरीताच्या रेसीपीमध्ये????
मिलिंदा, भरताला वांगी भाजून घेतात, तळून नाही.
दिनेश, रेसीपी फार आवडली. मी वांग्याच लोणच बेंगलोरला असताना कॅफेटेरियात बरेचदा खाल्लेल.
वांग अति प्रिय आहे. त्यामुळ या w/e ला करेनच.
सीमा, वांगी तेलावर परता असं
सीमा, वांगी तेलावर परता असं लिहीलं आहे. त्यामुळे त्याला तळलेलं असं म्हणता येणार नाही (गोव्याकडे तळून घेतात, दिनेश यांनी घेतलेले नाही) आणि भरीत केलं तर त्याला फोडणी घालताना बघितलं आहे.
१-२ घटक बदलले तर रेसिपी बदलते ? माझ्या अनुभवात,मायबोलीवर, मूळ कृतीतले सगळे घटक बदलूनही ती कृती मूळ कृतीबरोबरच गणली जाते. त्यामुळे माझे विधान फारसे अतिरंजित नसावे.
अर्थात, दिनेश यांनी त्याला लोणचं (किंवा सॉस /मांस विरहीत मुसाका किंवा झालंच तर चिनी-पोर्तुगीज पद्धतीने तैलधूत भरडा..
) म्हटल्याने मला प्रॉब्लेम नाही. तो केवळ त्यांना विचारलेला एक अनुत्तरीत प्रश्न आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश, दिवा घ्या.
मिलिंदा, या रेसीपीचा भरिताशी
मिलिंदा, या रेसीपीचा भरिताशी कुठेतरी संबध आहे का? हो भरिताला फोडणी घालतात. पण माझ्या मते भरितात मुख्य गोष्ट म्हणजे वांगी भाजून घेतात. जे इथे केले नाहीये. एक दोन घटक बदलणे वेगळे आणि पदार्थाचा मुख्य "गाभा" बदलणे वेगणे. भरीत म्हटल कि माझ्यासमोर तरी वांगी भाजणे हेच येत.
आणि घटक बदलण्या विषयी , कुठले घटक बदलतोय हे पण बघितले पाहिजे. व्हिनेगर , भरितात? मायबोलीत मी तरी हे कुठ पाहिलं नाहीये.
उगाचच चिरफाड केल्यासारखे होतय हे, आणि मला त्याचा कंटाळा येतो. त्यामुळ इथेच थांबते.
>>व्हिनेगर , भरितात? मायबोलीत
>>व्हिनेगर , भरितात? मायबोलीत मी तरी हे कुठ पाहिलं नाहीये.
दिनेश. यांच्या मायबोलीवरच्याच 'वांग्याचे सुदानी भरीत' या पाककृतीत व्हिनेगर आहे. हा पदार्थ करून बघितल्यामुळे व्यवस्थीत लक्षात राहिलं.
तिथे भरीत म्हटलंय तरी चकत्या
तिथे भरीत म्हटलंय तरी चकत्या करून तळल्या आहेत.
पण पंजाब्यांच्यात तर न लाजता
पण पंजाब्यांच्यात तर न लाजता वांगी सालासकट उकडून भरता करतात ना?
आमची एक पंजाबी फॅमिली फ्रेंड तसच करायची. त्यात त्यांचं नेहेमीचं कांदा-टोमॅटो-आलं-लसूण परतून वगैरे.
सीमा, चिरफाडीचा विषय
सीमा,
चिरफाडीचा विषय काढल्याने, मला आता पोस्ट टाकणे भाग पडले.
सर्वप्रथम, माझं पोस्ट (स्ट्स) नीट वाचल्याबद्दल आणि किमान तेवढं तरी मला गंभीरतेने घेतल्याबद्दल धन्यवाद.
विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट,
१.
एक दोन घटक बदलणे वेगळे आणि पदार्थाचा मुख्य "गाभा" बदलणे वेगणे.
आणि घटक बदलण्या विषयी , कुठले घटक बदलतोय हे पण बघितले पाहिजे
<<
खालील बाफ वर जाऊन बघावे असे मी सुचवू इच्छितो.
१अ. लसूणी पालक : दिनेश म्हणतात "मी अशीच भाजी करतो, पण लसूण घालत नाही". माझ्या मते लसूण त्या कृतीचा गाभा आहे.
१ब. उम्म अली : दिनेश म्हणतात "घटक बदललेले (जे मिळतील ते घातलेले) चालतील"
१क. खतखतं : दिनेश म्हणतात " खतखतं करताना.... या भाज्या घेतात". पुढे प्रतिसादात ते म्हणतात "इथे (आफ्रिकेत) या भाज्या मिळत नसल्याने मी ... या भाज्या घेतो"
ही तीन उदाहरणं हे सिद्ध करतात की पदार्थाचा मुख्य गाभा बदलणे हे अनयुज्वल नाही. दिनेश यांचंच उदाहरण द्यायचं कारण की ते नेहमी अनेक पदार्थ एकत्र करुन/ बदलून प्रयोग करतात, जे इन्टरेस्टिंग असतं. अन्यथा असे (गाभा बदलणे) बरेच जण येथे करतात.
इन हाईन्ड साईट मी कदाचित तो प्रश्न "ही वान्ग्याची भाजीच नाहीये का ?" असा विचारेन. पण मूळ मुद्दा हाच राहतो की या कृतीत असे काय वेगळेपण आहे ? आणि पुन्हा एकदा, हे विचारले कारण मला त्यात इन्टरेस्ट आहे.
माझ्या पोस्ट मध्ये येथे स्मायली नाही, यावरुन कळू शकते की हा प्रश्न एकदम गंभीरतेने विचारला आहे.
याचा अर्थ असा नाही की मी दिनेश यांची थट्टा करत नाही किंवा करणार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण त्याचा अर्थ मी कायम थट्टाच करतो असा काढणे चूक आहे. कृ. गै. न.
दिनेश, या सगळ्यांत तुम्हांला काही बोलणे उद्देश नाहीये, तेव्हा कृपया या ठिकाणी तसे वाटून घेऊ नका.
अप्रतिम दिसतय, लोणचं! वांगं
अप्रतिम दिसतय, लोणचं! वांगं भयंकर आवडतं त्यामुळे नक्की करणार!
तेल, व्हीनेगर व मीठ यांचा सढळ
तेल, व्हीनेगर व मीठ यांचा सढळ वापर करुन या पदार्थाचा टिकाऊपणा भाजीच्या मानानी बराच वाढवला आहे, हाच मुख्य फरक मला वाटतोय,
लिंबू लोणच्याच्या एका प्रकारात लिंबं शिजवून घेतात. पण साखर/गूळ व मीठ वापरुन त्याचा टिकाऊपणा बराच वाढवल्यामुळे त्याला लिंबाची भाजी न म्हणता लोणचेच म्हणतात.
मूळ रेसीपीतला एखाद-दुसरा घटक असत्याचा नसता करुन वा नसत्याचा असता करुन आणि पुढल्या प्रोसेसिंगच्या अदलाबदल करुन तर नवनव्या रेसीपीज तयार होतात. असो. हेमावैम. ह्याला माझ्या अनुभवांशिवाय कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
दिनेशदा, लोणचं तोंपासू दिसतंय. नक्की करणार. मात्र कमी तेल व कमी मीठ घालून फ्रीजमधे ठेवणार!
Pages