परदेशी पैसा, भारतीय मार्केट व गरीब गुंतवणुकदार.

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

शिर्षक बघुन लगेच मला communitst समजु नका.

गेल्या महीन्याभरात ३५०० पॉईंटसने भारतीय मार्केट पडले. फक्त भारतीय शेअर बाजार नाहीतर जगातील सर्व emerging economies चे शेअर मार्केट पडले. या सर्व पडाझडीत अमेरीकन ईकॉनॉमी व FII ने हातभार लावला असे कारण दिले जाते व ते खुप मोठ्या प्रमानात खरे आहे.
परदेशी गुंतवनूकदारांनी FII खूप मोठ्या प्रमानात विक्री केली व मार्केट पाडले. Rather ह्याच वाक्याला थोडे twist केले तर त्यांनी आणखी मार्केट वर जायच्या आधी मोठ्या प्रमानावर Profit Booking केले. मग हे सर्व होताना Indian Mutual Funds / retail investors झोपले होते का? की त्यांना काही कळायचा आतच हे सर्व घडले.
मे च्या मध्यात US मधे Inflation वाढेल व Feds Interest rate वाढवतील अशी अफवा होती. २००१ चा अनुभव असल्यामूळे लगेच FII (बहुतेक सर्व FII अमेरिकन आहेत) लगेच पैसे काढुन घ्यायला सुरुवात केली. ज्या दिवशी ८२६ ने मार्केट पडले त्या दिवशी सर्वात मोठी विक्री FII नी केली व सर्वात मोठी खरेदी भारतीय म्यूचवल फडांनी केली. मार्केट रोज पडत आहे, अनेक punters नी आपला गाशा गूंडाळला आहे. BSE, NSE त अनेक दुकान बंद पडली आहेत.

दिवसेंदिवस अमेरिकन मार्केट पडत आहे व त्या भितीने भारतीय बाजार कोसळत आहे. ह्या वाक्याला मी असे मांडेल की अमेरीकी FII ईतर कुठल्याही market ला अमेरिकन view नी पहातात व थोडे काही ईकडे-तिकडे झाले की लगेच पैसे काढतात. २००१ मधे अमेरिकेत जे झाले ते अमेरिकी FII विसरु शकले नाहीत.

110793.gif

वरिल तक्त्यात असे दिसेल की ( investment column एप्रिल मधे FII नी खरेदी केली नाही, मे मधे जोरदार विक्री FII नी केली व जुन मधे परत invest करायला पण सुरु केली.

बाजार परत वर जानार आहेच. आज Indian mutual funds कडे invest करायला पैसे नाहीत कारण ते Fully invested आहेत. उलट FII कडे भरपुर पैसे आहेत आणी त्यांनी allready थोड्या प्रमानात invest करायला सुरु केले आहे. बाजार आणखी कोसळेल कारण individual investor mutual funds मधुन पैसे काढुन घेत आहे त्यामुळे MFs वर selling presuare आहे. त्यामूळे मार्केट पडन्याची शक्यता आहे. त्या वेळेस परत FII खुप मोठी खरेदी करतील व शेवटी त्यांनाच जास्त नफा होईल.

ह्या वेळेस कुठलाही घपला scam न्हवता तरी हे झाले. FII वर आता जास्त tax लावायची सुवर्णसंधी आहे ती दवडायला नको.

जेव्हा market rally होत असते तेव्हा small investor त्यात कुठेही नसतो, market peak ला गेल्यावर त्याला बाजारातील पैशांची हाव सूटते व तो पैसे गुंतवीतो त्यानंतर काही दिवसात शेअर बाजार कोसळतो. तसेच जेव्हा market bottom ला जात असते तेव्हा small investor ला भिती वाटुन तो पैसे invest करत नाही, बाजार वर जान्याची वाट पहात बसतो व market peak कडे जाताना पैसे गुंतवीतो. आतातरी शहाने होउन market bottom ला पैसे गुंतवावेत म्हनजे नफा मिळेल.

पडत्या बाजारात पैसे गुंतविताना एक काळजी घ्यावी. एकाच वेळेस सर्व गुंतवनूक करु नये. समजा तुम्हाला WIPRO चे १०० शेअर घ्यायचे आहेत तर त्यातील २० टक्के आज घ्यावेत, ३० टक्के बाजार थोडा कोसळल्यावर व ५० टक्के आणखी थोडा कोसळल्यावर. ह्यात bottom ला average out होते व नफा जास्त होतो.

प्रकार: