न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मधे महाराष्ट्राचा महोत्सव

Submitted by अजय on 24 September, 2013 - 00:44

या रविवारी (दि. २२ सप्टेंबर) न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमधे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून प्रायोजीत, दिपोत्सव साजरा झाला. जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या या चौकात या दिवशी महाराष्ट्राची संस्कृती झगमगली. लावणीपासून गोविंदापर्यंत आणि मेंदी पासून ताज्या भज्यांच्या खमंग वासापर्यंत मराठी संस्कृतीनं, तिथे जमलेल्या साडेतीन लाख देशी विदेशी पाहुण्यांना आपलंसं केलं. या कार्यक्रमात सहभागी झालेले बृहन्महाराष्ट्रमंडळाचे विश्वस्त श्री आशिष चौघुले यांच्याकडून यांच्याकडून मराठी माणसाला अभिमान वाटावी आणि कायम स्मरणात रहावी अशी ही प्रकाशचित्रे

१. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा. सर्व छायाचित्रे श्री आशिष चौघुले
photo_00.jpg

२. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा
photo_01.jpg

३. व्यासपीठावर मान्यवर
Photo1.jpg

४. श्री छगन भुजबळ आणि श्री आशिष चौघुले
Photo2.jpg

५. अस्सल मराठमोळ्या वेषात न्यूयॉर्कचे श्री सतीश वारे आणि श्री मुकंद खिस्ती, श्री आशिष चौघुले यांच्या बरोबर.
Photo3.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अजय, आजच्या मटामध्येही अगदी मुख्यपृष्ठावर फोटो आहे.. अभिनंदन मप महामंडळाचे आणि शुभेच्छा .

साडेतीन लाख >>. अहो मी पण तिथे होतो. हा आकडा शक्य नाही.

दिपोत्सव साजरा झाला >>> मला आधी खरेच वाटले की अनेक दिप लावून टाईम्स स्वेअर मध्ये आणखी थोडा उजेड पाडू, पण तो जे झाले तो दिपोत्सव नव्हता.

काही गमती जमती -

छगनरावांना नीट इंग्लिश बोलता आले नाही. त्यांचे इंग्रजी ऐकून हहपुवा झाली. त्यापेक्षा त्यांनी मराठी /हिंदीत भाषन दिले असते आणि दुभाषा घेतला असता तर बरे झाले असते.

शंकरची काही गाणी / गोंविंदा / काही चांगले नृत्य सोडले तर हा कार्यक्रम बकवास होता. महराष्ट्र टुरिझमला अजून चांगला कार्यक्रम नक्कीच करता आला असता.

बरचं लिहिता येईल, पण जाऊदे. मधील काही कार्यक्रमांना इतके बोअर झाले की लोकांनी तर (लोकल गायक मंडळी, कल्चरल शॉट, पंजाबी गायक वगैरे) हुर्यो उडवली. पण संचालक मंडळाला दुसरा पर्याय नव्हता. लोकं गणपती बाप्पा मोरया म्हणून तो कार्यक्रम हाणून पाडत होते.

फक्त एकदाच खूप चांगले वाटले ते म्हणजे शंकरचे शेवटचे सुनो जोरसे दुनियावालो हे गाणे. त्यामुळे माफ. असो.

अगदी खरं आहे,केदार. मी पण गेले होते. दिपोत्सव वगैरे अजिबात नव्हता तो. जाहिरातबाजी जेवढी केली त्यामानाने कार्यक्रम काहीचं चांगला नव्हता.

माफ करा, मी जे काही जेमतेम तासभर तिथे थांबू शकलो तेंव्हा मला तरी नियोजनशून्य गोंधळ बघायला मिळाला. स्टॉल्स मांडलेल्या टीचभर जागेत तीन साडेतीनहजार माणसंची भयंकर रेटारेटी, धक्काबुक्कीच एवढी भीषण होती, की खरच साडेतीन लाख लोक आले असते तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.

भजी व जिलबी घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती त्या सर्वांना ती भजी व जिलबी तळत असलेल्या मोठ्या कढईत स्वतःच पडण्याची खास सोय आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती.

गणपतीनंतर दहा दिवसात दिवाळी साजरी करून त्यात दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम नक्की कोणी व का केला होता? त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले ? छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील ? असे काही प्रश्न मला पाच डॉलरचा एक सामोसा खाताना पडले. Happy

भजी व जिलबी तळत असलेल्या मोठ्या कढईत स्वतःच पडण्याची खास सोय आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती. Lol

आणि ती भजी इतकी बकवास होती की बास. मी फेकून दिली. आणि मिनिमम काही पण $५ ला Uhoh

सगळंच बकवास होतं.

अरे जीस भाऊ मग पार्ल्यात मी येण्याचे आवाहन केले होते तर तू येणार आहेस हे सांगायचे की? भेट झाली असती.

tathye n jaanoon ghetaa, phusharakya maarane , Marathi manasalaa nehemech nadate Sad

वाचून वाटतंय गेले नाही ते बरं झालं तेही २ मुलांना घेऊन.
फेबुवर एक फेटेवाला स्पायडरमॅन पाहिला या ईव्हेंटमधला. Happy

अभिनंदनाबद्दल धन्यवाद. ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.
केदार, अरे मी नव्हते वाचले तुझे आवाहन. तू पण फसलास हे वाचून माझे दु:ख जरा हलके झाले Proud
त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की मी गर्दी आहे म्हणून आधीच खूप कूपन्स विकत घेतली होती, ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली.

केदार, अरे मी नव्हते वाचले तुझे आवाहन. तू पण फसलास हे वाचून माझे दु:ख जरा हलके झाले फिदीफिदी
त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की मी गर्दी आहे म्हणून आधीच खूप कूपन्स विकत घेतली होती, ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली. >> Lol

>> ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली.
तरीच केदार म्हणत होता की गर्दीत एकजण 'दस का पाँच' करत फिरत होता. त्याला वाटलं वातावरणनिर्मितीसाठी. Proud

Lol

एकजण मलाही कुपन हवे का? असं विचारत होता संध्याकाळी, पण मी दुपारी राजभोग मध्येच भोग लावला असल्याकारणाने (काय करणारं हॉटेलखाली राजभोगचा स्टॉल होता) संध्याकाळी त्या भयंकर चांगल्या अन्नापासून स्वतःला दुर ठेवले.

गणपतीनंतर दहा दिवसात दिवाळी साजरी करून त्यात दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम नक्की कोणी व का केला होता? त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले ? छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील ? असे काही प्रश्न मला पाच डॉलरचा एक सामोसा खाताना पडले.

>> :हहपुवा:

छे गेले नाही हे बरं झालं असे होऊ शकत नाही. यु मिस्ड द रिअल फन. ते जे फालतू कार्यक्रम चालू होते त्याला बू करायला त्या कार्यक्रमापेक्षा जास्त मजा आली. सगळं पब्लिक त्याची मजा जास्त घेत होते. Happy त्या कल्चरल शॉट वाल्याने इतका शॉट दिला पब्लिकला की, मोरया मोरया ऐकूण गणपती बाप्पाचे कान पण थकले असतील.

छे गेले नाही हे बरं झालं असे होऊ शकत नाही. यु मिस्ड द रिअल फन. ते जे फालतू कार्यक्रम चालू होते त्याला बू करायला त्या कार्यक्रमापेक्षा जास्त मजा आली. सगळं पब्लिक त्याची मजा जास्त घेत होते. Proud

>>ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.
Lol

>>ह्या कार्यक्रमाबद्दल खुप उत्सुकता होती.
का? Proud

>> ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.

न तळता परत आल्याबद्दल अभिनंदन. जान बची लाखो पाये. आता 'दार ठोठावून परतलो' च्या धर्तीवर 'तळता तळता बचावलो' हा बाफ उघडा. या मंत्री लोकांना सरकारी खर्चाने अमेरिकेत येऊन फाडफाड इंग्रजीत भाषण करायची फार हौस असते.

Pages