मुख्य पदार्थ :-
मका पिठ --१ वाटी .[सपाट भरुन घ्यावी .]
कॉर्न फ्लोअर --१/२ वाटी.
चीज --२ लहान क्युब.
फळे --१ किवी फ्रुट आणि अर्धे सफरचंद .
उप-पदार्थ :-
साखर : ३ टेबलस्पून.
लोणी :--१ टेबलस्पून .
दालचिनी पूड :--१ टी स्पून.
काजु :--१० ते १२ नग.
१] मका पिठ मायक्रोवेव्ह मधे ३० सेकंद -फुल पॉवर- वर ठेवुन थोडेसे भाजुन घ्या.
[मायक्रोवेव्ह नसल्यास ,कढईत हे पिठ हाताला गरम लागेल इतपत परतुन घ्या .]
२]एक किवी व अर्ध्या सफरचंदाची साले काढुन अगदी बारीक फोडी चिरुन घ्या.
३]एका कढईत एक टेबलस्पून साखरेचे कॅरेमल --बिन पाण्याचा पाक- तयार करा त्यात काजु घालुन परता.एका लहान प्लेट ला तूप लावुन त्यात मध्ये हे मिश्रण काढुन घ्या.थंड झाल्यावर या काजुचे भाजी कापायच्या कात्रीने किंवा हाताने लहान-लहान तुकडे करा.
४]त्याच कढईत आणखी २ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल तयार करा.कॅरेमल मध्ये किवी-सफरचंदाचे तुकडे घाला व परता.फळांना थोडेसे पाणी सुटल्याने मिश्रण थोडेसे पातळ होईल. दालचिनी पूड घाला .चमच्याने सतत ढवळा.मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करा्ए मिश्रण एका बाउल मध्ये काढुन घ्या.त्यात काजु तुकडे मिक्स करा.
हे आहे कॅरेमलाइज काजु व फळांचेमिश्रण :-
५]एका जाड प्लास्टीक शीट ला बटर /तूपाचा हात लावुन कोटींग करुन घ्या.
६]एका पातेलीत २ वाट्या पाणी गरम करा. एका कढई गॅसवर तापायला ठेवा . कढई गरम झाली कि त्यात पातेलीतील १ १/२ वाटी पाणी ओता. पाणी उकळु लागले कि त्यात १ टेबलस्पून बटर घाला .लगेच भाजलेले मका पिठ थोडे थोडे टाकत एका चमच्याने सतत ढवळत रहा .त्यानंतर कॉर्न फ्लोअर टाकुन तेही छान ढवळा.गॅस बंद करुन किसलेले चीज घालुन मिश्रण व्यवस्थित ढवळुन घ्या.मिश्रणाचा मऊसर गोळा तयार होईल.
७]प्लास्टीक शीट वर हा गोळा ठेवुन लाटण्याने लाटुन घ्या.एक मोठा चौकोनी आकार -पराठा इतपत जाड---लाटा.करंजीच्या कातण्याने किंवा सुरीने चौकोनी पोलेन्टो [वड्या] कापा.
पोलेन्टो :--
८]एका नॉन-स्टीक पॅन गॅसवर गरम करुन मंद आचेवर त्यामधे १/२-१/२ टी स्पून बटर घालुन सगळे पोलेन्टो खरपुस भाजुन घ्या.
९] या खरपुस भाजलेल्या पोलेन्टो वर १-१ टी स्पून फ्रुटी कॅरेमल पसरा.
१०] प्लेट मधे सर्व करताना ,.एका पोलेन्टोवर फ्रुटी कॅरेमल पसरुन त्यावर दुसरा पोलेन्टो ठेवावा.किंवा एकेरी पोलेन्टो वर फ्रुटी कॅरेमल पसरुन ही सर्व करता येईल.
असे हे खरपूस "स्वीट फ्रुटी पोलेन्टो " तयार आहेंत.
१] मकापिठ बोटशेके भाजुन घेतल्याने पिठातील कच्चे पणा जातो.त्यात कॉर्न फ्लोअर घातल्याने उकडलेल्या पिठाची पोळी छान लाटता येते.
२]या उकडीत चीज किसुन घातल्याने पोलेन्टो ला खूप छान चव येते.
सफरचंद गोड व किवी आंबट गोड असल्याने दोन्हीची चव मिळुन येते.२ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल पुरते. कॅरेमल मधे काजु घातल्याने ते क्रिस्पी होतात.
३]आंतरजालावर पोलेन्टो म्हणजे मक्याचा जाड रवा असे लिहीले व प्रत्यक्ष पाककृती मध्ये दाखवले आहे.त्यामुळे आपल्याकडे मिळणारे मका पिठ व कॉर्न फ्लोअर वापरुन त्याची चीज मिश्रीत उकड काढुन पोळी लाटुन बटरवर खरपुस भाजण्याचा विचार केला .
फोटो नाहीये का माझ्या कडे बॅन
फोटो नाहीये का माझ्या कडे बॅन असल्याने मला दिसत नाहीये?
भारी!
भारी!
वेगळा आणि छान प्रयोग! काकु,
वेगळा आणि छान प्रयोग!
काकु, तयार पोलेन्टोचा फोटो दिसत नाहीये.
भारी आहे हे!!
भारी आहे हे!!
रिया,चिन्नु,वत्सला --पोलेन्टो
रिया,चिन्नु,वत्सला --पोलेन्टो फोटो आत्ताच अपलोड केले आहेत.[इंटर-नेट नव्हते.]
ओकेज मस्त आहे मी हे पोलेंटो
ओकेज

मस्त आहे
मी हे पोलेंटो का काय ते कधी खाल्लेलं नाहीये ... कृती वाचुन तरी ऑसम वाटतय
रिया, मी पण आजच खाल्लं.पण मूळ
रिया,
मी पण आजच खाल्लं.पण मूळ पोलेन्टो कृतीनुसार नुसती शिजवलेली उकड खाण्यापेक्षा हे खरपूस भाजलेले चीजी-पोलेन्टो खूपच छान आहे चवीला.
छान दिसतंय... पण पहावेच
छान दिसतंय... पण पहावेच लागणारे...
एवढा 'आटा'पिटा कोण करणार!
वॉव एकदम वेगळीच रेसिपी
वॉव एकदम वेगळीच रेसिपी
मस्त दिसतेय पाकृ!
मस्त दिसतेय पाकृ!
सुलेखा १-२ वड्या माझ्या
सुलेखा १-२ वड्या माझ्या नावाने बाजूला काढून ठेव,
नाहीतर तुमच्या पोटात नक्की दुखेल.
छान प्रकार. आपल्याकडे तयार
छान प्रकार.
आपल्याकडे तयार पोलेंटो मिळत नाही बहुतेक. आमच्याकडे तर ते शिजवलेले पण मिळतो.
पोलॅन्टो मस्तं दिसतायत. मी
पोलॅन्टो मस्तं दिसतायत.
मी मका- चीजचा बेस तरी नक्की करून बघेन.
सुलेखा १-२ वड्या माझ्या
सुलेखा १-२ वड्या माझ्या नावाने बाजूला काढून ठेव,
नाहीतर तुमच्या पोटात नक्की दुखेल.
सहीये
सहीये
भारी!! मस्त दिसतंय एकूण
भारी!!
मस्त दिसतंय एकूण प्रकरण.
भारी दिसतयं
भारी दिसतयं
मस्त दिसतेय...
मस्त दिसतेय...
ते पोलेन्टो/ट/टा नुसतेच खायला
ते पोलेन्टो/ट/टा नुसतेच खायला आवडतील
वेगळी रेसेपी. छान वाटतेय.
वेगळी रेसेपी. छान वाटतेय.
वा! मस्त दिसतोय प्रकार! फोटो
वा! मस्त दिसतोय प्रकार! फोटो बघुन तोंपासु!
भारी!
भारी!
यम्मी फोटो आहेत.
यम्मी फोटो आहेत.
अरे वा .. नेहेमीप्रमाणे
अरे वा .. नेहेमीप्रमाणे कल्पक!
मक्याचं पीठ एकदम बारीक घेतलं आहे का? इकडच्या पोलेन्टात मक्याचा रवा असतो सहसा ..
तोंपासू!
तोंपासू!
अहा.. पुन्हा मस्त.
अहा.. पुन्हा मस्त.
सशल, इथे मका पिठ बारीकच
सशल, इथे मका पिठ बारीकच मिळते--भाकरीसाठी.त्यामुळे त्यात कॉर्न फ्लोअर व चीज घातले आहे व उकड काडुन लाटले आहेंत.हे नुसते खायलाही छान लागत आहेंत.
छान आहे.
छान आहे.
>>१] मका पिठ मायक्रोवेव्ह मधे
>>१] मका पिठ मायक्रोवेव्ह मधे ३० सेकंद -फुल पॉवर- वर ठेवुन थोडेसे भाजुन घ्या.<<
>>८]एका नॉन-स्टीक पॅन गॅसवर गरम करुन मंद आचेवर त्यामधे १/२-१/२ टी स्पून बटर घालुन खरपुस भाजुन घ्या.<<
हे मक्याचे पीठ नुसते भाजून घेतलेय? मग त्याला का पोलेंटो म्हणताय? मला ते भाजून उकडल्यासारखे का दिसतेय?
एक प्रामाणिक मत, पोलेंटोचा गिच्च गोळा मला अजिबात आवडत नसल्याने... करणे कठीण आहे.
पण सुलेखा, कल्पना छान आहे.
सुलेखा, कृपया
सुलेखा,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पुर्णब्रह्म' असं लिहा.
Pages