जिन्नस १:
१ वाटी शिजवलेला किन्वा,
१ वाटी उकडलेले हिरवे मूग,
पाव वाटी आपापल्या आवडीचे कोणतेहीखिसलेले/क्रम्ब्ल्ड चीज,
पाव वाटी उकडून ठेचलेले मक्याचे दाणे,
२ मोठे टेबल्स्पून जरासे भाजलेले ओटचे पीठ,
पाव वाटी क्रिस्पी खिसलेले सफरचंद आवडत असेल तर( ऑप्शनल),
इतर जिन्नस २:
आवडीप्रमाणे कुठल्याही भाजी/कडधान्य/मूळं ह्याचा उकडलेला लगदा/खिस:
फरसबी, कॉलीफ्लॉवर्,बटाटा,राजमा,छोले,गाजर,भोपळी मिरची,भोपळा,हिरवे/पांढरे वाटाणे,पालकचा लगदा,कोबी खिसलेला वगैरे वगैरे.
खमंग पणा वाढवायला:
राजमा /छोले उकडल्या वर लगेच रगडून घ्यायचे व आमचूर्/छोले मसाला घालायचा. छान चव येते.
मासांहारी सुद्धा करु शकतो, किम्चित कोलंबी उकडून्/चिकन खिमा परतू. (इथे मासांहारी नकोय हे माहित आहे.)
इतर जिन्नस ३:
कुठल्याही सीरियलचा चुरा( राईस क्रिस्पी, कॉर्न सीरीयल, कशी सीरीयल वगैरे)
चवीला:
बारीक चिरलेली मिरची
बारीक कापलेली कोथींबीर,
बारीक चिरलेला कांदा,
रोजचा मसाला,
जीरापूड,धणापूड,
मीठ
शॅलो फ्रायः तेल
१) जिन्नस १ एकत्र करून लगदा करावा. पाणी टाकू नये.
२) जिन्नस इतर २ मधील जे काही आवडते ते घ्यावे. त्याचे गोळे बनवून वेगळे ठेवा जर पॅटीस बनवायचे असतील तर. ह्या आतल्या गोळ्यात मीठ फक्त टाका.नाहीतर जिन्नस १ व २ एकत्र करून ठेवा.
३) चवीचे जिन्नस टाकून जिन्नस १ तयार करा.
४)जर पॅटीस बनवायचे असतील तर जिन्नस १ चा उंडा बनवून जिन्नस २ चा गोळा ठेवून चपट्या आकाराचे पॅटीस बनवा व सीरीयलच्या चुर्यात घोळा.
५) कटलेट करत असाल तर जिन्नस १ व २ एकत्र करून चपटे थापून सीरीयलच्या चुर्यात घोळा.
६)जरासे तेल टाकून दोन्ही बाजू प्रत्येकी ४ मिनीटे भाजून घ्या. पुदीना चटणी लावून सॅडविचमध्ये ठेवून खाउ शकता. नुसतेही छान लागतात.
१)भाज्या/कडधान्य घेत असाल तर उकडताना पाणी खूप असू नये. मीठ किंचित घालून उकडवा व त्यानुसार मीठ नंतर टाका.
२)किन्वा मोकळा शिजवा.
३)कांदा टाकला तर लगेच कटलेट्/पॅटीस बनवा.
४)खूपच आहाराचा विचार असेल तर अवन मध्ये ५०० फॅरेन्हाईट वर ठेवून ब्रॉईल करा दोन्ही बाजूने प्रत्येकी ४ मिनीटे.
५) ह्यात जमवाजमव भरपूर असली तरी उरलेला किन्वा, उरलेली पालकची भाजी, उरलेली मूगाची उसळ असली तरी खूप. फक्त किन्वा ज्यास्त करून ठेवला की मग काहीही अॅड करू शकता.
६)ओटचे पीठ नसले तरी चालू शकते जर बटाटा वगैरे घालत असाल तर.
किन्वा ???
किन्वा ???
फोटु?
फोटु?
हेल्दी रेसिपी आहे.
हेल्दी रेसिपी आहे.
व्हॉट अ कोइंसिडन्स! माझ्या
व्हॉट अ कोइंसिडन्स! माझ्या फ्रीजमध्ये उरलेला किन्वा, उरलेले मूठभर मोडाचे शिजवलेले मूग आणि उकडलेला १ बटाटा आहे. हे आजच करणार.
अरे वा .. एकदम पौस्टिक ..
अरे वा .. एकदम पौस्टिक .. फोटो नाही का?
अरे वा , किन्वा पॅटीस ..
अरे वा , किन्वा पॅटीस .. मस्तं !!
मी परवाच एके ठिकाणी किन्वा
मी परवाच एके ठिकाणी किन्वा बर्गर्स पाहीले. तेव्हापासून होते डोक्यात करायचे. आता ही रेसीपि वापरून नक्की करणार!!
अरे वा. एकदम हेल्दी कृती. मी
अरे वा. एकदम हेल्दी कृती.
मी नेहमी किन्वा खिचडी आणि किन्वा पुलाव करते भाज्या घालून आता हा पदार्थ पण करून बघेन.
शॅलो फ्राय बर्गर ऐवजी थालीपीठ
शॅलो फ्राय बर्गर ऐवजी थालीपीठ ट्राय करेन म्हणते !
अरे देवा.... मी किन्वा हे
अरे देवा.... मी किन्वा हे "किंवा" चं टायपो म्हणून वाचतेय. (:कपाळावर हात मारून घेणारी बाहुली:)
हे एक सुपरफुड का काय म्हणतात ते?
सोप्पी आहे रेसिपी. करून बघणार.
किनवा,मुग ह्याचे मिश्रण
किनवा,मुग ह्याचे मिश्रण सिरियल्चा चुरा नीट धरुन ठेवतं का? तुकडे पडत नाही का फ्राय करताना?
बुवा ओटचे पीठ आहे ना त्यामुळे
बुवा ओटचे पीठ आहे ना त्यामुळे सगळे मिळून येत असेल
हे मी आजच केलं होतं. फोटो पण
हे मी आजच केलं होतं. फोटो पण काढला आहे. उद्या टाकीन.

माझ्याकडे किन्वाचा कोबी, गाजर घलून केलेला उपमा शिल्लक होता. मोडाची मूग शिजवलेले अर्धी वाटी होते. १ उकडलेला बटाटा पण होता. त्यात मग थोडा कांदा, लसूण, थोडी मिरची कोथिंबीरीची चटणी, गरम मसाला, मीठ, २ चमचे थालीपीठ भाजणी आणि २ चमचे कॉर्न मील असं घालून छोटे छोटे पॅटिस बनवून तव्यावर अगदी कमी तेलात भाजले. हिट आयटम आहे.
हे छान आहे आणि हेल्दी आहे.
हे छान आहे आणि हेल्दी आहे. करून बघेन कारण किनवा आवडते. पण मयेकर यांना विचारला तोच प्रश्न तुम्हालाही - मुख्य पदार्थ कशाला म्हणायचं? प्रमाणाने जास्त की चवीने जास्त की स्वयपाक करणारा ठरवेल तस?? संयोजक खुलासा करतील.
देविका,
देविका,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
पाकृ. आवडली...
पाकृ. आवडली...
एकदम हेल्थफुल रेसिपी आहे.
एकदम हेल्थफुल रेसिपी आहे.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
छान आहे पदार्थ. करून बघायला
छान आहे पदार्थ.
करून बघायला हवा.
कुरकुरीत दिसताहेत. वाटत नाही
कुरकुरीत दिसताहेत. वाटत नाही शॅलो फ्राय केलेले.
सॉरी, इथे यायला वेळ झाला
सॉरी, इथे यायला वेळ झाला नाही.
सर्वांना मनापासून धन्यवाद मत देण्यबद्दल व प्रतिसाद दिल्याबद्दल.